Monday, September 19, 2011

दिलगिरी


गेले काही महिने जो वाद माझ्यात आणि मुक्तपीठ (सकाळ ओर्कुट समूह) नियंत्रिका सौ.श्रद्धा सौंधीकर ह्यांच्यात चालू होता त्या बद्धल मी मनापासून दिलगीर आहे व माझे सर्व आरोप मी विनाशर्त मागे घेत आहे.आज त्यांनी फोन केला.बोलण झाल जे वाद शंका होत्या ते दूर झाले आहेत.
आता जरा विस्तृतपणे काही गोष्टी सांगतो- कबूल करतो.

रस्त्यावरची म्हणा किंवा ओर्कुट वरची भांडण मूळ कशातून सुरु होतात हे बाजूला राहत.मुद्दे,विचार,किंवा काही वैयक्तिक कारण ह्यावरून सुरु होणारी भांडण त्या मुद्द्यापुरती न राहता त्या व्यक्तीचा द्वेष चालू होतो व त्या व्यक्तीचे सर्वच चूक,दिसेल तिथे विरोध करण,एका पूर्व ग्रह दुषित नजरेतून बघण चालू होत.सुरुवातीला माझा हेतू त्या मुद्द्य्वरून जाब विचारणे एवढाच होता. माझा जो वाद श्रद्धा ह्यांच्याशी झाला त्याचा मूळ विषय हा शब्दांकित वरच्या काही स्पर्धांच्या बाबत होता,तो झाला त्यांनी समूह सोडला मग मी हि माझी बाजू कशी खरी हे दोन चार दिवस लोकांना सांगितलं हे तिथच संमपायला हव होत आणि संम्पल पण होत.पण ह्या झालेल्या वादाचा फायदा घेत त्याच्या जवळ जवळ एक महिन्यांनी काही लोकांनी मला एक लेख टाकायला सांगितला.ह्यात सर्व होते.म्हणजे सर्व विचाराचे,जातीचे(श्रद्धा ह्यांचाही पण अन्य पोट जातीतील),महाराष्ट्रात वेग वेगळ्या ठिकाणी राहणारे असे सर्व श्रद्धा ह्यांचे विरोधक होते.आणि माझा राग थोडा होताच(कि समूह का सोडला?) त्याला पुन्हा हवा मिळाली.मग मी तो लेख (सांस्कृतिक दहशतवाद)टाकला.ह्या श्रद्धा विरोधकात पुणे सहित पश्चिम महाराष्ट्र,मुंबई व उपनगरे,आणि उत्तर महाराष्ट्रातील काही मंडळी अशी जवळ जवळ ९ जण होती.

मग तो पर्दाफाश समूह आला.त्यावर मी पुन्हा स्पर्धेचा मुद्दा काढून भांडलो.मी हा मुद्दा तिथे आणणार न्हवतो.आठवा.मी त्या धाग्यावर जवळ जवळ ३०० पोस्ट नंतर तो मुद्दा काढला.तेव्हा पण ह्या ९ जणांनी मला लिहायला सांगितलं.
"सगळ्यांसमोर येईल.तुझ्या बद्धल अजूनही गैरसमज आहेत ते लोकांचे दूर झाले पाहिजे.असे सांगितलं"
ते पटल.सर्व जण ते वाचत आणि त्यावर लिहित होते. त्यातून हेच सिद्ध झाल कि त्या स्पर्धेची मूळ कल्पना ना त्यांची होती न माझी.आधी कारण अशा स्पर्धा ठीक ठिकाणी झाल्या होत्या.

आता सगळ्यात मुख्य मुद्दा त्यावर येतो.जातीय उद्गार-उद्धार मी कधी कोणाचाच केला न्हवता.जिथे कधीच दंगली झाल्या नाहीत व आमच्या पक्षाचे आमच्या येथील शिल्पकार एक मुस्लीम होते व सध्याचे लोकप्रिय आमदार दलित आहेत अशा खऱ्या अर्थाने सेकुलर वातावरणात मी वाढलो.मी आजवर कधीच कोणाची जात पाहून टीका केली न्हवती.पण गोष्टी अशा घडत होत्या,काही कळत होत्या काहींचा अर्थ कळत न्हवता मग ह्या मंडळीनी मला काही मुद्दे घेवून (माझ्या बाबतचे व इतरांचे) मला त्यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जातीवाद होत आहे हे दाखवले.त्यावेळी त्यांच्या बोलण्यावर विश्वास सहज बसला,परिस्थिती तशी होती.म्हणून तो लेख(पूर्ण पणे त्यांनी दिलेला-सांस्कृतिक दहशतवाद)मी टाकला.नंतर मला बायकोने(माझ्या नवे.स्टील सिंगल) पण जातीय टीकेवरून मला चांगले सुनावले.तिने माझ्या हून चार पावसाळे जास्तच पाहिले आहेत.व तू हे का केल हे लोकांसमोर यायला पाहिजे असे सांगितले.मला पटल. तीच बोलण मी कस टाळणार? मग मी तो दुसरा लेख लिहिला.पण त्यातून अजून चुकीचा अर्थ घेतला गेला जसा मी एका समाजाच्या पोट जाती-जातीत भांडणे लावतोय. पण ती वस्तुस्थिती आहे.मान्य करा अथवा नका करू.

परवा जो लेख लिहिला तो श्वेता(ज्यांचा द्वेष्टा असा उल्लेख होता) त्यांना श्रद्धा ह्या फेवर करत आहेत अशा समजुतीने लिहिला.त्याच स्पष्टीकरण आज मला फोनवर श्रद्धा ह्यांच्याकडून मिळाल आहे.मी कुठेही मुक्तपीठ अथवा श्रद्धा ह्यांचे नाव न घेता लिहील होत पण माझा रोख त्यांच्यावरच होता.हे सगळ्यांनाच माहिती होत.(कायद्यापासून वाचयची ती पळवाट होती.जी अनुभवाने येते)

आता वाद संम्पले आहेत.पण काही प्रश्न अनुत्तरीत राहतात.पण ते अनुत्तरीत राहिलेले चांगले.
ते ९ जण कोण?
हे मी कधीच नाही सांगणार.करण त्यांना मी तुमच नाव गुप्त ठेवीन अस वचन दिल आहे. एकदा मी कमीटमेंट केली कि मी कितीही हवेत(टल्ली) असलो तरी ते तोंडातून बाहेर काढत नाही.ती लोक मुक्तपीठ कडून दुखावली गेली आहेत.काही तिथे खऱ्या नावाने आहेत आणि काही फेक ने.खऱ्या नावापेक्षा फेक ने(म्हणजे झुरळ- पाल- कुत्रा- डुक्कर नाव नवे.माणसाचाच नाव पण स्वताचे नाही) जे आहेत ते मुक्तीपीठ मध्ये चांगले योगदान देत आहेत.लिहित आहेत.लिहू देत.त्याचा शोध श्रद्धा ह्यांनीच घ्याचा आहे.पण मी सल्ला देईल कि त्यांनी त्या फंदात पडू नये.त्यांना जास्त महत्व देवू नये.

आता माझे काहीही वाद श्रद्धा ह्यांच्याशी उरले नाहीत किंवा त्यांचेही.आणि मुक्तपीठ बाबत तर वाद कधीच न्हवते.मुक्तपीठ हा माझा आवडता समूह होता आहे आणि राहील.श्रद्धा आणि मुक्तपीठ नियंत्रका श्रद्धा ह्यात एक धूसर रेषा आहे.मी परवा पर्यंत त्यात फरक ठेवला.पण परवा दोन्हीत गल्लत झाली.आपण पण त्यांचाशी बोलताना श्रद्धा आणि मुक्तपीठ नियंत्रिका श्रद्धा ह्यात फरक करयला शिकले पाहिजे. ह्या वादात कळत नकळत मी ज्यांना दुखावले आहे त्यांचा बाबत हि मी दिलगीर आहे. चला मुक्तपीठ ला जुने दिवस आणुयात.(आणि जमल तर फेसबुक वर पण मुक्तपीठ नेवूयात)

!!जय महाराष्ट्र!!

10 comments:

  1. धन्यवाद कौस्तुभ.... मी पण तुझ्यावरचा राग सोडलाय... मुपी नव्याने बहरत नेउया...

    ReplyDelete
  2. धन्यवाद श्रद्धा काकू , सतीश

    ReplyDelete
  3. चला, आता भाग दोन येणार नाही याची काळजी घ्या. ऑनलाईन आणि ऑफलाईन लाईफ वेगळं असतं, सतत मी बरोबर का तु अशा स्वरुपाचे वाद होऊच नयेत.

    ReplyDelete
  4. तुझा स्वभाव, बिनधास्त बोलण्याची पद्धत, जे मनात तेच तोंडात..
    स्वताला जे पटत ते बोलुन मोकळा होतोस...
    याच सर्व कारणामुळे मला कधी तुझा द्वेष करावासा वाटला नाही. तुझ्याबरोबर कैकदा भांडलो तरी ती भांडण वैचारिकच ठेवली, व्ययक्तिक कधीच केली नाहीत...याच कारण म्हणजे वर नमूद केलेले तुझ्यातले गुण..
    पण याच तुझ्या स्वभावाचा गैरफायदा काही लोकांनी घेतला आणि तुझ्या खांद्यावर बंदुक ठेवून गोळी मारली..परत या गोष्टी होणार नाही याची खात्री बाळगणारा...
    तुझा आवडता मनसैनिक...:P

    ReplyDelete
  5. ब्लॉग वाचून वाल्याचा वाल्मिकी झाल्यासारखे वाटले ..........राईटिंग स्कील चांगले आहे !

    ReplyDelete
  6. नाशिकचा पुणेकर

    मला माझ्या मित्र आणि माझ्या आयुष्यातील स्त्रियांपेक्षा माझ्या वैचारिक शत्रू नेच समजून घेतले.आज त्यात तुझी भर पडली.धन्यवाद.

    ReplyDelete
  7. अभीनंदन, चांगला नीर्णय. कौस्तुभ, तुझे काही पोस्ट खरच चांगले अभ्यासपूर्ण असतात पण प्रत्येकाला तुझा वीचार पटतीलच असे शक्य नाही. वीचार आहेत तर वीरोध ही आहेच. वीरोध ही पचवायला शीक. तुझ वय गरम रक्ताचच आहे पण त्या गरमीला योग्य ठीकाणी वापरायला शीक. समाजात वावरतांना चांगला हेतू असणेच शेवट नाही, तो अंमलात आणने शक्य झाले पाहीजे. Best Luck

    अनंत साळवे

    ReplyDelete