Saturday, June 18, 2011

बहुजन समाज म्हणजे काय?मला तरी हा शब्द फसवा वाटतो.

हल्ली जो कोणी सोम्या गोम्या उठतो तो बहुजन समाज, बहुजन समाजावर अन्याय झाला हो अशी बांग देतो.मग मला प्रश्न पडतो कि बहुजन म्हणजे काय? मग मी जरा विचार केला.ह्या शब्दाचा मराठी-हिंदी भाषेतील अर्थ व बहुजन बहुजन म्हणून ओरडणारे ह्यांची जात लक्षात घेण्याचा यत्न केला असता मी गोंधळलो.

हा शब्द बहुतेक ब्राम्हण(धर्म सत्ता) ,मराठा(राज सत्ता) व्यतिरिक्त उरलेले जे समाज -जाती आहेत त्यासाठी वापरला जात असावा अशी माझी धारणा होती.पण इथे ओर्कुटवर-फेसबुकावर काही मराठा लोकांना स्वतःला बहुजन म्हणवून घेताना पहिले आहे.त्यामुळे गोंधळ उडाला आहे.

जर मराठी भाषा म्हणून बहुजन शब्दाचा अर्थ शोधण्याचा यत्न केला. तर ह्या शब्दात एखादी जात किंवा काही जातींचा समूह अपेक्षित असावा असे त्या ओरडणाऱ्या लोकांकडे पाहून वाटत होते.मग मी भाषेतील त्या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला.तर तो असा-

बहु = मोठा आणि जन = लोक

म्हणजे ज्यांची संख्या मोठी ते लोक.मग त्यातून जात कशी काय अपेक्षित असेल?

उदा. क्रिकेट वेडी मंडळी.देशात फार थोड्या लोकांना क्रिकेट आवडत नाही.मग ज्यांना आवडते ते बहुजन झाले नाहीत काय? ह्यात सगळेच आले ना.हिंदू धर्मातील जातीच कशाला? त्या तर आहेच शिवाय अन्य धर्मीय व पंथीय पण आलेच ना?

मुंबईत बरीच लोक लोकल ने प्रवास करतात मग ते बहु- जन लोकल ने प्रवास करतात म्हंटल तर त्यात व्याकरण शास्त्रानुसार त्यात वावगे ते काय?ह्यात कुठे आली जात?

अजून खोलात विचार केला तर:

जास्त संख्या असणे म्हणजे बहुजन तर मग केवळ मराठा समाज हाच बहुजन असणार नाही का?कारण मराठा व कुणबी धरून हा समाज जवळजवळ ३०-३५ टक्के आहे असे बर्याच ठिकाणी उल्लेख आहे. मग बाकी जातींचे काय?मग ते कसे काय स्वतला बहुजन म्हणवून घेतात.

किती गोंधळाचा शब्द आहे.मला तरी हा शब्द फसवा वाटतो. ह्यावर चर्चा व्हायला पाहिजे.