Tuesday, September 20, 2011

मनी लॉंड्रिंग एन्जिओ- काळा पैसा पांढरा करणार्‍या स्वयंसेवी संस्था!

अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आता व्यक्तींसोबत अशा क्षेत्रांकडेही बोट दाखवले जात आहे की जेथे भ्रष्टाचार फळफळतो आणि ज्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पैसा मिळवून समाजात आपली प्रतिष्ठा वाढवतात. यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे कुठली तरी सामाजिक संस्था स्थापन करणे. अशी एखादी संस्था स्थापन केल्यानंतर त्यासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे ही पहिली गरज बनते. त्यावेळी अशा संस्थांचे संस्थापक आपली शक्ती आणि पदाचा वापर करून पैसा जमवण्यास सुरुवात करतात. यात त्यांना सरकारचे सहकार्य मिळाले तर त्यांच्यासाठी दुधात साखर पडल्यासारखे होते. हिंदुस्थानी राज्यघटनेअंतर्गत ज्याप्रमाणे राजकीय पक्ष बनविण्याचा लोकांना अधिकार आहे, त्याचप्रमाणे सामाजिक संस्था बनविणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचीही तरतूद आहे. याला सर्वसाधारणपणे ‘एनजीओ’ ( अशासकीय किंवा स्वयंसेवी संस्था) असे म्हटले जाते.

सध्या देशात ३ कोटी ४० लाख एनजीओ (स्वयंसेवी संस्था) नोंदणीकृत आहेत. या नोंदणीकृत संस्थांवर एक दृष्टिक्षेप टाकला तर असे दिसून येते की, त्यांच्या संख्येत इ.स. २००० नंतर प्रचंड वाढ झाली आहे. सूक्ष्मपणे अभ्यास केला तर बहुतांश स्वयंसेवी संस्था या नेते, अधिकारी आणि त्यांच्याभोवती फिरणार्‍या लोकांच्याच असतात. त्यांच्या डोक्यावर ज्याचा वरदहस्त असतो तो सरकारात उच्चस्तरीय पदावर विराजमान व्यक्तीशी संबंधित असतो. वास्तविक तो त्यांच्या नावावर कारभार करतो. स्वातंत्र्यापूर्वी अशा स्वयंसेवी संस्था नव्हत्या अशातला भाग नाही. प्रत्येक शहरात कुणी पाण्याची पाणपोयी चालवत होता, मंदिरात भंडारे होत होते आणि श्रीमंत लोक आपल्यातर्फे गरीबांसाठी थंडीमध्ये गरम कपड्यांची व्यवस्था करत होते. शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य सर्वाधिक होते. आपल्या आसपासच्या गावांमध्ये ही हिंदुस्थानी परंपरा आजही थोड्याफार प्रमाणात पाहावयास मिळते. थोडेफार सुखी असणारे लोक गरीबांची मदत करत असत. त्यामुळे आदिवासी आणि वनवासी क्षेत्रात जाऊन काम करणारे असंख्य लोक आपापली संस्था बनवून हे काम करत होते. जागतिक स्तरावर सांगायचे तर लायन्स आणि रोटरी अशाच प्रकारच्या संस्था होत्या. या संस्थांना सरकारच्या पैशाविषयी काहीही देणेघेणे नव्हते. त्यांच्याकडे पैशांचा जास्त ओघही नव्हता, जेणेकरून कुणी त्यात घोटाळा करू शकेल.

परंतु जेव्हा अशा प्रकारच्या संस्था राजकीय आणि संवैधानिक आधारावर अस्तित्वात आल्या तेव्हा त्या ‘एनजीओ’मध्ये परिवर्तीत झाल्या. केंद्र सरकारकडूनच तसेच राज्य सरकारकडूनही त्यांना मदतीसाठी पैसा मिळू लागला, शिवाय समाजसेवा आणि मानवसेवेच्या नावावरही परदेशातून पैसा मिळू लागला, तेव्हा यांच्यामध्ये आर्थिक घोटाळे वाढले. अमेरिकेची आर्थिक परिस्थिती दुबळी आहे, तरीही एनजीओला सहाय्य करण्यासाठी ती मागे राहिली नाही. २००८ मध्ये हिंदुस्थानातील स्वयंसेवी संस्थांना अमेरिकेकडून दोन अब्ज १५ कोटी डॉलर्सची मदत मिळाली.

यूपीए सरकार शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाही, परंतु या सरकारने या स्वयंसेवी संस्थांच्या रकमेत २००५-०६ मध्ये ५५ टक्के वाढ केली. म्हणजे फिरून फिरून हा पैसा खासदार, आमदार, मंत्री आणि नोकरशहांच्या खिशात अप्रत्यक्षपणे पोहोचला. त्यांचे काळे कारनामे जाणण्यासाठी एवढेच पुरेसे आहे की, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कौन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट तथा पीपल्स ऑफ ऍक्शन ऍण्ड टेक्नॉलॉजी जिला संक्षेपात ‘कपार्ट’ म्हटले जाते. तिने आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपात एक हजार स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर प्रतिबंध लादले आहेत.

चिकण्या चेहर्‍याचे ज्या स्वयंसेवी संस्थांचे संचालन करवितात ते वर्षात एक-दोनदा आपल्या चाहत्यांना कुठल्या न् कुठल्या उद्देशाने विदेशात पाठवत असतात. त्यातील कुणी एखाद्या परिषदेला जातो, तर कुणी चर्चासत्राला. एका डाव्या विचारसरणीच्या महिलेने हिंदुस्थानच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या एका सदस्याला मोठ्या अभिमानाने सांगितले की, मी आमच्या ‘एनजीओ’च्या कृपेने जगातील जवळपास सर्व मुख्य शहरांत फिरले आहे. कुणी विज्ञान क्षेत्रात एनजीओ चालवत असेल तर तो संशोधनाच्या निमित्ताने अमेरिका आणि युरोपची वारी करून येतो. ‘एनजीओ’ची लीला अपरंपार आहे. बिचार्‍या प्रामाणिक आणि खरोखर सेवाभावी ‘एनजीओ’ आहेत, त्यांच्या माथी मात्र बदनामीचे भांडे फोडले जाते.

या ‘एनजीओ’ सरकार आणि खासगी संस्थांकडून जो पैसा मिळवतात त्याचा उपयोग कसा केला जातो, ते या पैशाचा हिशेब कशाप्रकारे ठेवतात, यावर तर चर्चा नेहमीच होत असते. परंतु सर्वाधिक खळबळजनक बाब म्हणजे या ‘एनजीओ’ काळा पैसा पांढरा करून ज्याप्रकारे देशद्रोही कारवाया करतात तो सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे. सध्या देशात दडलेल्या काळ्या पैशाची चर्चा सर्वत्र होत आहे. स्वीस बँकेत ठेवलेला काळा पैसा सरकारने हिंदुस्थानात कसा आणावा या मुद्यावर सार्‍या देशाने सरकारवर दबाव टाकला आहे.

फारच थोड्या लोकांना हे माहिती असेल की, ज्या एनजीओंना (स्वयंसेवी संस्थांना) आपण समाजसेवेचा स्तंभ समजतो, वास्तविक त्यांचा वापर मनी लॉंड्रिंगसाठी केला जातो. काळा पैसा पांढरा करण्यात या संस्थांना भरपूर लाभ मिळतो. त्या वाट्टेल तेवढे मानधन वसूल करू शकतात आणि आपले भविष्य सुरक्षित बनवू शकतात. एनजीओंकडे जाणार्‍या लोकांचीही कमी नाही. असे लोक विचारतात की, आम्ही तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून अन्नधान्य, कपडे, औषधी, कांबळी आणि तुमच्या वापरात येणारी स्टेशनरी देऊ केली, तर तुम्ही आम्हाला किती कमिशन द्याल?

जी व्यक्ती आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी एनजीओकडे जाते, ती साधीसुधी तर नसणारच. कोट्यवधीत खेळणार्‍यांचा काळा पैसा याप्रकारे ‘एनजीओ’ पांढरा करत असतील तर त्यांना फायदाच फायदा आहे. ‘एनजीओ’वाल्यांना त्या श्रीमंताकडून मागेल तितकी मदत आणि वस्तूही मोफत मिळतात आणि काळा पैसा पांढरा करण्याचे मागाल तेवढे बक्षीसही! त्यामुळे ‘एनजीओ’ हे असे एक दुकान आहे ज्यात कुणालाही तोटा होत नाही. या एनजीओंकडून काम करवून घेण्यातही कसली भीती नाही. कारण या एनजीओंचे खरे मालक मंत्रालय आणि सरकारमध्येच बसलेले असतात. खोट्या पावत्या देऊन ते काळा पैसा पांढरा करत असतील याची आकडेवारी मिळविणे अशक्य नसले तरी कठीण नक्कीच आहे.

सरकारने अशा एनजीओंना कसा लगाम घालावा याचा विचार करणे आवश्यक आहे. सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्‍न हा आहे की, धोकेबाजीची ही दुकानदारी बंद करण्यामुळे कुणाचे नुकसान होणार आहे?

जर ३ कोटी ४० लाख स्वयंसेवी संस्था भारतात आहेत ह्याचाच अर्थ १२० कोटी जनतेच्या मध्ये प्रत्येक ३५ लोकांच्या पाठी १ स्वयंसेवी संस्था आहे.तरी देशातले प्रश्न का सुटत नाहीत? आज दुर्गम भागात आज किती एन्जिओ पोहोचल्या आहेत? अशा ठिकाणी जिथे खरच गरज आहे तिथे पोहोचणे हे खरच ह्यांचे उद्दिष्ट आहे का? कि थोडफार काम करून, निरनिराळे टी शर्ट,टोप्या घालून मिरवणे आणि फोटो काढून पेपरात छापून आणणे आणि निधी गोळा करणे एवढेच ह्यांचे काम आहे का? नक्कीच आहे.

काही संस्था काम करतही आहेत.पण एवढ्या मोठ्या संख्येने ज्या एन्जिओ दिसतात त्यातील अर्ध्याहून अधिक ह्या काळा पैसा पांढरा करणे-मनी लॉंड्रिंग च्याच कामात आहेत.नाहीतर वर मी जे लोकसंख्या आणिस्वयंसेवी संस्था ह्यांची जी आकडेवारी दिली आहे त्यानुसार तर सगळे प्रश्न सुटायला हवे होते.तसे काही होताना दिसत नाही.

!!जय महाराष्ट्र!!

Monday, September 19, 2011

दिलगिरी


गेले काही महिने जो वाद माझ्यात आणि मुक्तपीठ (सकाळ ओर्कुट समूह) नियंत्रिका सौ.श्रद्धा सौंधीकर ह्यांच्यात चालू होता त्या बद्धल मी मनापासून दिलगीर आहे व माझे सर्व आरोप मी विनाशर्त मागे घेत आहे.आज त्यांनी फोन केला.बोलण झाल जे वाद शंका होत्या ते दूर झाले आहेत.
आता जरा विस्तृतपणे काही गोष्टी सांगतो- कबूल करतो.

रस्त्यावरची म्हणा किंवा ओर्कुट वरची भांडण मूळ कशातून सुरु होतात हे बाजूला राहत.मुद्दे,विचार,किंवा काही वैयक्तिक कारण ह्यावरून सुरु होणारी भांडण त्या मुद्द्यापुरती न राहता त्या व्यक्तीचा द्वेष चालू होतो व त्या व्यक्तीचे सर्वच चूक,दिसेल तिथे विरोध करण,एका पूर्व ग्रह दुषित नजरेतून बघण चालू होत.सुरुवातीला माझा हेतू त्या मुद्द्य्वरून जाब विचारणे एवढाच होता. माझा जो वाद श्रद्धा ह्यांच्याशी झाला त्याचा मूळ विषय हा शब्दांकित वरच्या काही स्पर्धांच्या बाबत होता,तो झाला त्यांनी समूह सोडला मग मी हि माझी बाजू कशी खरी हे दोन चार दिवस लोकांना सांगितलं हे तिथच संमपायला हव होत आणि संम्पल पण होत.पण ह्या झालेल्या वादाचा फायदा घेत त्याच्या जवळ जवळ एक महिन्यांनी काही लोकांनी मला एक लेख टाकायला सांगितला.ह्यात सर्व होते.म्हणजे सर्व विचाराचे,जातीचे(श्रद्धा ह्यांचाही पण अन्य पोट जातीतील),महाराष्ट्रात वेग वेगळ्या ठिकाणी राहणारे असे सर्व श्रद्धा ह्यांचे विरोधक होते.आणि माझा राग थोडा होताच(कि समूह का सोडला?) त्याला पुन्हा हवा मिळाली.मग मी तो लेख (सांस्कृतिक दहशतवाद)टाकला.ह्या श्रद्धा विरोधकात पुणे सहित पश्चिम महाराष्ट्र,मुंबई व उपनगरे,आणि उत्तर महाराष्ट्रातील काही मंडळी अशी जवळ जवळ ९ जण होती.

मग तो पर्दाफाश समूह आला.त्यावर मी पुन्हा स्पर्धेचा मुद्दा काढून भांडलो.मी हा मुद्दा तिथे आणणार न्हवतो.आठवा.मी त्या धाग्यावर जवळ जवळ ३०० पोस्ट नंतर तो मुद्दा काढला.तेव्हा पण ह्या ९ जणांनी मला लिहायला सांगितलं.
"सगळ्यांसमोर येईल.तुझ्या बद्धल अजूनही गैरसमज आहेत ते लोकांचे दूर झाले पाहिजे.असे सांगितलं"
ते पटल.सर्व जण ते वाचत आणि त्यावर लिहित होते. त्यातून हेच सिद्ध झाल कि त्या स्पर्धेची मूळ कल्पना ना त्यांची होती न माझी.आधी कारण अशा स्पर्धा ठीक ठिकाणी झाल्या होत्या.

आता सगळ्यात मुख्य मुद्दा त्यावर येतो.जातीय उद्गार-उद्धार मी कधी कोणाचाच केला न्हवता.जिथे कधीच दंगली झाल्या नाहीत व आमच्या पक्षाचे आमच्या येथील शिल्पकार एक मुस्लीम होते व सध्याचे लोकप्रिय आमदार दलित आहेत अशा खऱ्या अर्थाने सेकुलर वातावरणात मी वाढलो.मी आजवर कधीच कोणाची जात पाहून टीका केली न्हवती.पण गोष्टी अशा घडत होत्या,काही कळत होत्या काहींचा अर्थ कळत न्हवता मग ह्या मंडळीनी मला काही मुद्दे घेवून (माझ्या बाबतचे व इतरांचे) मला त्यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जातीवाद होत आहे हे दाखवले.त्यावेळी त्यांच्या बोलण्यावर विश्वास सहज बसला,परिस्थिती तशी होती.म्हणून तो लेख(पूर्ण पणे त्यांनी दिलेला-सांस्कृतिक दहशतवाद)मी टाकला.नंतर मला बायकोने(माझ्या नवे.स्टील सिंगल) पण जातीय टीकेवरून मला चांगले सुनावले.तिने माझ्या हून चार पावसाळे जास्तच पाहिले आहेत.व तू हे का केल हे लोकांसमोर यायला पाहिजे असे सांगितले.मला पटल. तीच बोलण मी कस टाळणार? मग मी तो दुसरा लेख लिहिला.पण त्यातून अजून चुकीचा अर्थ घेतला गेला जसा मी एका समाजाच्या पोट जाती-जातीत भांडणे लावतोय. पण ती वस्तुस्थिती आहे.मान्य करा अथवा नका करू.

परवा जो लेख लिहिला तो श्वेता(ज्यांचा द्वेष्टा असा उल्लेख होता) त्यांना श्रद्धा ह्या फेवर करत आहेत अशा समजुतीने लिहिला.त्याच स्पष्टीकरण आज मला फोनवर श्रद्धा ह्यांच्याकडून मिळाल आहे.मी कुठेही मुक्तपीठ अथवा श्रद्धा ह्यांचे नाव न घेता लिहील होत पण माझा रोख त्यांच्यावरच होता.हे सगळ्यांनाच माहिती होत.(कायद्यापासून वाचयची ती पळवाट होती.जी अनुभवाने येते)

आता वाद संम्पले आहेत.पण काही प्रश्न अनुत्तरीत राहतात.पण ते अनुत्तरीत राहिलेले चांगले.
ते ९ जण कोण?
हे मी कधीच नाही सांगणार.करण त्यांना मी तुमच नाव गुप्त ठेवीन अस वचन दिल आहे. एकदा मी कमीटमेंट केली कि मी कितीही हवेत(टल्ली) असलो तरी ते तोंडातून बाहेर काढत नाही.ती लोक मुक्तपीठ कडून दुखावली गेली आहेत.काही तिथे खऱ्या नावाने आहेत आणि काही फेक ने.खऱ्या नावापेक्षा फेक ने(म्हणजे झुरळ- पाल- कुत्रा- डुक्कर नाव नवे.माणसाचाच नाव पण स्वताचे नाही) जे आहेत ते मुक्तीपीठ मध्ये चांगले योगदान देत आहेत.लिहित आहेत.लिहू देत.त्याचा शोध श्रद्धा ह्यांनीच घ्याचा आहे.पण मी सल्ला देईल कि त्यांनी त्या फंदात पडू नये.त्यांना जास्त महत्व देवू नये.

आता माझे काहीही वाद श्रद्धा ह्यांच्याशी उरले नाहीत किंवा त्यांचेही.आणि मुक्तपीठ बाबत तर वाद कधीच न्हवते.मुक्तपीठ हा माझा आवडता समूह होता आहे आणि राहील.श्रद्धा आणि मुक्तपीठ नियंत्रका श्रद्धा ह्यात एक धूसर रेषा आहे.मी परवा पर्यंत त्यात फरक ठेवला.पण परवा दोन्हीत गल्लत झाली.आपण पण त्यांचाशी बोलताना श्रद्धा आणि मुक्तपीठ नियंत्रिका श्रद्धा ह्यात फरक करयला शिकले पाहिजे. ह्या वादात कळत नकळत मी ज्यांना दुखावले आहे त्यांचा बाबत हि मी दिलगीर आहे. चला मुक्तपीठ ला जुने दिवस आणुयात.(आणि जमल तर फेसबुक वर पण मुक्तपीठ नेवूयात)

!!जय महाराष्ट्र!!

Friday, September 2, 2011

ओर्कुट comunity च्या राड्यातून ब्लॉग युद्ध रंगले!

गेले काही दिवस खालील दोन ब्लॉग मध्ये ब्लॉग युध्द रंगले आहे.पैकी एक आहेत खबर मराठी नेटीझंसची.आणि ह्या व्यक्तीचे ओर्कुट प्रोफयाल -"आम्ही ओर्कुट चे बातमीदार २४* " आहे.आणि प्रोफयाल एका स्त्रीचे आहे.(म्हणजे तस लिहील आहे)

तर दुसरा ब्लॉग हा बातमीदाराचे बाप आहे. वरील ब्लॉग ला उत्तर म्हुणन हा ब्लॉग आहे त्यांचे ओर्कुट खाते " ...आम्ही बातमीदाराचे बाप" आहे.

तसेच "ओर्कुट चेहर्यांचा पर्दाफाश" नावाचा एक समूह हि चालू झाला आहे.

वरील सगळेच जण असे बोलतात कि आम्ही एकेकाची लफडी,बातम्या बाहेर काढू,कोण कोणाचे फेक ते सांगू.
त्यांना काय करयचे ते करू द्या पण माझा उल्लेख त्या ब्लॉगस मध्ये झाल्यामुळे मला स्पष्टीकरण देणे भाग आहे.स्पष्टीकरण देण्याची काही गरज न्हवती.उलट अस करून मी त्याना मोठा करतोय.पण जे मी केल नाही ते माझ्या नावावर खपवल जात असेल तर मला माझी बाजू मांडवी लागेल.(उद्या भविष्यात आमदार झालो कि प्रेस नोट काढण्याची प्र्याक्तीस ह्या निमित्ताने होत आहे)

१)खबर मराठी नेटीझंसची
हे एका बाईचे खाते आहे (असे लिहील आहे).ह्या बाईंची माहिती काढण्याचे खबरी नेटवर्क सादिक चिकना आणि असलम हटेला पेक्षा सोलिड आहे.
ह्या मला आंतरजालावरील प्रती ठाकरे म्हणाले आहे.हा सन्मान आहे कि उपहास ते मला अजून कळलेले नाही.

मी शिवसेना ओर्कुट समुदाय आणि फेसबुक पेज वरच्या ज्या काही उठाठेवी केल्या त्या त्यांनी लिहिल्या आहेत.
त्या बाबत मी त्या त्या व्यक्तींशी प्रत्यक्ष भेटून बोललो.मुळात समाजातील राडेबाज नेतृत्व आणि नेट वरील सुसंस्कृत उच्च शिक्षित समाज ह्यांचे नेतृत्व असा तो संघर्ष होता. आणि आम्ही सगळे आपल्या आपल्या जागी योग्यच होतो.ग्रेट माणसे आहेत ती.निष्ठावान आहेत.ह्यांनी मॉड केला किंवा त्यांनी दारू पाजली तर समूहावर तली उचलणारे वाटले काय?

मी त्या कोणालाही आणि ते कोणी मलाही एका मर्यादेत राहूनच,परस्पर सन्मान ठेवून वाद,चर्चा करत होतो.जे लिहील ते खरय पण ती एकच बाजू आहे.हा संघटनेतील वाद आहे आणि ते होताच राहणार.म्हणून ते चव्हाट्या वर आणणे कितीपत योग्य आहे? त्या आमच्या १५ जणांच्या टीम पैकी एक कोनि तरी फुटला त्यांनी टीप दिली हे मान्य कराव लागेल.म्हणून मी सगळ्यांना दोष देणार नाही.आता लवकरच बैठक होणार आहे त्यात मी प्रत्यक्ष चर्चा ह्या मुद्द्यावर करीन.

त्यांनी जे दुसर लिहील कि अन्य समूहावर अमुक केल इकडे तमुक केल.हो लिहील.पक्षाचा विचार मांडला.उगाच कोण नडला तर त्याला फोडला.त्यावर मी ठाम आहे.

२) बातमीदाराचे बाप
ह्याने म्हंटले कि मी एका समूहाची वाट लावली.नियंत्रक अधिकाराचा गैरवापर केला.त्यांना एकच सांगीन -टाळी एका हाताने वाजत नसते.पहिल्या लेखावरील माझी प्रतिक्रिया- "मला तुलना नाही करयाची पण हे म्हणजे अस झाल न-

जेव्हा देशात कुठेही बॉम्ब फुटतो आणि ट्रेस लागत नाही तेव्हा डॉग विजय सिंघ सारखी कोन्ग्रेजी पिलावळ कोकालते कि ह्यात "संघाचा हाथ" आहे

तस हे सगळ चालू आहे.सायबर सेल मुंबई पुणे मी खिशात घालून फिरतो.किती तक्रारी आजवर केल्या,किती तरी प्रोफायाल,मजकूर आणि व्हिदिओ काढायला लावले, किती तरी लोकांवर गुन्हे नोंद करायला लावले.मला जर एखाद्याची बदनामी करयाची असेल तर ती मी माझ्या ब्लॉग वर करीन.फेक नावानी कशाला.पण हा simple common sense which is very un common असल्याने हे पादरे पावटे माझ्या नावाने बांग देत फिरत आहेत."

दुसर्या लेखात त्यांनी मला म्हंटले आहे-"के.जी स्त्री सदस्यांना जो त्रास देत होता. त्या त्रासातून बऱ्याच स्त्रियांची सुटका झाली.अर्थात तसे मेसेज मला आले आहे."
तसेच हा बाई का बुवा हे कन्फर्म नसल्याने मी त्याला खालील प्रतिक्रिया त्याच्या दुसर्या लेखावर दिली आहे
"काय रे पाद्र्या,
काल पर्यंत तू पुरुष होतास ना रे पावट्या .आणि आजच्या ब्लॉग मध्ये महत्वाचे "सांगते" म्हणत सांगत्ये ऐका वाली कधी झालीस तू? एवढ्या जलद लिंग बदल शस्त्रक्रिया मफतलाल च्या पोराची पण झाली न्हवती.तू तर कमाल केलीस.

आणि मी स्वताच्या बायकांना -आजवर ज्या ज्या (GF) होत्या त्यांना त्रास दिला नाही तर नेट वर कोणत्या बाई ला त्रास दिल? "

३)ओर्कुट चेहर्यांचा पर्दाफाश
ह्यावर आज तरी जास्त बोलण्यासारखे नाही.पण खरच गरज होती अशा समूहाची.फेक वरून शंका घेणे हे सगळीकडेच चालू असत.त्यासाठी हे व्यासपीठ असेल तर चांगलाच म्हणव लागेल.ह्यांनी सध्या तरी सगळ्यांना प्रवेश द्यावा.म्हणजे खरे खोटे सगळ्यांना.आणि एक एक माणसास उघडे पाडावे.

उलट ह्या सगळ्यांमुळे मराठी ओर्कुट विश्व चर्चेत आल आहे.एक नवा प्राण फुंकला गेला आहे.मध्ये एकानी मुपिवर धागा काढला होता-"मराठी समूह ओर्कुट चालवत आहेत का?" त्याच म्हणन अस कि इतर राज्यात जिथे तो गेला ओर्कुट ची एवढी चर्चा नाही,तिथ लोक फेसबुक वैगेरे वापरतात. आज हे ब्लॉग युद्ध बघून तो टोपीक आठवला.
आपल्या मराठी माणसाची एकमेक्नाची पाय खेचायची खेकडा वृत्ती मुळे हे सगळ होतंय.आणि गुगल व ओर्कुट कमवतय.

तुम्ही काय तो राडा करा.मला शिव्या घाला मी पण तुम्हाला शिव्या घालीन.पण कारण नसताना चुकीचे संदर्भ मला चिकटवले उगाच माझा उल्लेख आला आणि जरुरी वाटल तर मी माझ्या ब्लॉग च्या माध्यमातून अथवा "ओर्कुट चेहर्यांचा पर्दाफाश" ह्या नव्या व्यासपीठाने संधी दिल्यास ह्या दोन्ही ठिकाणी माझी बाजूं मांडीन.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

(आता दहा दिवस मी घरचा गणपती आणि जुगारात बिझी असीन.त्यामुळे काहीतरी अळणी प्रतिक्रिया टाकून माझ्या फोडणीची वाट बघू नये.आणि प्रतिक्रिया नाही आली तर मी घाबरलो अशी बांग देवू नये.जमेल तस उत्तर देईन.)

अतृप्त आत्म्यानो!

पोर्णिमे पर्यंत मजा करा.पितृ पक्षात एकेकाचे श्राद्ध घालतो