Thursday, April 28, 2011

तळीरामांचे बजेट हलेडुले!हुई महंगी बहुत ही शराब...

नाशिक, दि. २७ (प्रतिनिधी ) - एकावर एक दारूचे पेग रिचवत बारमध्ये रात्र-रात्र गप्पांचे फड रंगविणार्‍या तळीरामांच्या बैठकीचे बजेट आता पुरते हलेडुले झाले आहे. कारण देशी आणि विदेशी दारू आता ४० ते ६० रुपयांनी महाग झाली आहे. हे चढलेले दर बघून अनेकांची ‘चढलेली’ उतरू लागली असून त्यांच्यावर ‘हुई महंगी बहुत ही शराब के... थोडी थोडी पिया करो’ म्हणण्याची वेळ आली आहे.

देशी व विदेशी मद्यावर पंचवीस टक्के विक्रीवर आकारला जातो. १ एप्रिलपासून देशी मद्याच्या ७५० मिलीच्या एका बाटलीवर सुमारे १७ रुपये उत्पादन शुल्क वाढला आहे. विदेशीच्या एका बाटलीवर सुमारे ३४ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे वाईनशॉपमध्ये चाळीस ते साठ टक्के, तर बिअरबारमध्ये दुप्पट भाववाढ झाली आहे. वाईन शॉपमधील दर पाहता डीएसपीची क्वार्टर ६५ रुपयांहून ९५ रुपयांना झाली आहे. मॅकडॉल, ऑफीसर चॉईस, बॅगपायपर आदींची एक क्वार्टर शंभर रुपयांहून १४५ ते १५० रुपयांवर पोहोचली आहे. ब्लेंडरर्स प्राईड, सिग्नेचर, आरसी, ऍन्टीकुन्टी यांची एक क्वार्टर १६५ ऐवजी २२० रुपये झाली आहे. डीएसपी ब्लॅकची क्वार्टर ७०हून ११० रुपये, तर आयबीची ८०हून १२५ रुपये झाली आहे. स्कॉचचे वाढीव दर व पुरवठा आलेला नसल्याचे वाईनशॉप मालक सांगतात.

देशीत संत्रा, लिंबू, टँगो, बडीसोपच्या क्वार्टरची किंमत २६ रुपयांहून ३५ रुपये झाली आहे. काहींनी तर विदेशीला दूर सारून देशीला जवळ केले आहे. बिअरबार, हॉटेलऐवजी चायनीज, अंडाभुर्जीच्या गाड्यांवर व अनधिकृतपणे दारू पिण्यास परवानगी देणारे हॉटेल, ढाब्यांच्या अड्ड्यांवरही गर्दी वाढली आहेे. अनेकांनी स्वत:च्या वाहनात बसून दारू पिण्याचा मार्ग शोधला आहे. भाव वाढले असले तरी पिणार्‍यांचे प्रमाण कमी झालेले नाही. ‘पियो लेकीन.. रखो हीसाब’वर जास्त भर आहे.
(^^Saamna 28/4/2011)

बेवड्या इतका महसूल सरकारला कोणीच देत नाही.आणि दर वेळेला तिजोरीत खड खडात झाला कि अर्थ खात्याची वक्र दृष्टी पडते ती दारूवर.आणि तंबाखू जाण्य उत्पादने -सिगरेट ,गुटखा ह्यावर!
का? का? का?महगाई आहे ठीक आहे पण काहीतरी प्रमाण हवे ना.एकदम चाळीस टक्के वाढ कोणत्या वस्तूची होते?

दारू पिणे चांगले कि वाएत हा मुदा नाही.पण आज मद्य हे क्षेत्र फार मोठे आहे.मद्य उत्पादक,होल्सेलर,रिटेलर अनेक आहेत.अनेक बार परमिट रूम आहेत.ह्यात हजारो लोक काम करतात.मद्याची ने आण करणे-वाहतूक ह्यात पण काम करणारी लोक आहेत.

बार ला जावून पिलो तर सरकारचा जो कर आहे तो मिळणारच.शिवाय बार वर आकाराला जाणारा विक्रीकर ह्यातून पण महसूल मिळतो.बार-परमिट रूम मालकांना विक्रीची नोंदणी ठेवावी लागते व त्यावर त्यांना विक्रीकर भरावा लागतो.(ह्यात पळवाट आहे.रोजच्या ग्राहकांचे स्वतःच परमिट काढायचे व त्यांच्या नावावर विक्री दाखवायची.बाकी चा हिशोब नाही तो ब्ल्याक)
बार मध्ये काम करणारी कितीतरी जण आहेत.अनेक संसार आहेत.दारू संसार उधवस्त करते पण दारू आणि बार वर बरेच संसार चालतात.त्यांचा विचार कोणी करणार आहे कि नाही?

खोट्या दारूचा धोका!

आज ब्रांडेड लेबल चिट कवुन त्यात हलक्या दर्जाची दारू विकली जाते.ही मोठी साखळी आहे.त्याचा धोका पूर्वी होताच आता तो वाढला आहे.दमन-दिव वरून चोरटी आयत करणे व त्यावरील "केवल दिव दमण" हा शिक्का/स्टीकर बदलवून "केवल महाराष्ट्र करीता" हा शिक्का लावणे.हा एक प्रकार झाला.

दूसरा भंगार वल्यांकडून मद्याच्या रिकाम्या बाटल्या- क्वार्टरच्या-१८० मिली गोला करायच्या. उत्पादक कंम्पनी च्या प्रमुख वितरकाना हाताशी धरून त्यांच्याकडून अस्सल मद्याच्या बाटल्या-मोठी बाटली- खंबा-७५० मिली मिलवाच्या किंवा विकत घ्याच्या.त्यानातर त्यातल्या मद्यात स्पिरिट टाकायचे.एक खम्ब्याचे किमान ६ क्वार्टर हे लोक स्पिरिट टाकुन बनवतात.आणि वाइन शॉप किंवा बार ला विकतात.बरेचसे अधिकृत वितरक-होलसेलर पण हयात सामिल असतात.
ही दारू शरीराला घातक आहे.पिनारा लगेच ओलखु शकतो.ह्याने सकाळी डोका पकड़ते.मलमल होते.रक्तदाब वाढतो.(तसाही पिवून वाढतो ह्याने जास्त वाढतो) जरा वेळ चढली असे वाटते पण एकदा लघवी करून आलो की लगेच उतरली असे वाटते.म्हणून मानुस जास्त पितो.आता हा धोका वाढणार.बार मालक स्वताचा नफा वाढवन्या करीता अशीच दारू विकयाची शक्यता आहे.


बड़ी महंगी हुई शराब के थोड थोड़ी थोड़ी पिया करो,
पियो लेखी रखो हिसाब के तोड़ी थोड़ी पिया करो.


सल्ला:वाइन शॉप मधून आण आणि आता घरीच बसा! उगाच बाहेर पिऊन लफडी होतात,वाहन चालवून अपघात होतात.


Monday, April 25, 2011

सत्य साई बाबा


हे काल दिनांक २४ एप्रिल रोजी वारले.गेले महिनाभर आजारी होते.त्यांच्याच ट्रस्ट च्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.सर्व अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले.आंध्रात ४ दिवसाचा व कर्नाटकात २ दिवसाचा दुखावता जाहीर करण्यात आला. त्यामुळे पहा काय काय झाले. आशा भोसले ह्यांनी एक जावई शोध लावला म्हणे हा मृत्यू नाही तर समाधी आहे. सचिन ने वाढ दिवस साजरा केला नाही.आज त्याने साईंच्या पार्थिवाचे दर्शन कुटुंबासहित घेतले. जे नेते गेले तिथे ते सगळे सत्ताधारी पक्षाचे कसे काय? (अशोकरावांचा आधार गेला.पुनर्वसन होत नाही बहुतेक) तिकडे भक्तांची रीघ लागलीये. ह्या बाबांनी बरीच समाज उपयोगी कामे केली असे सांगितले जाते.आता ती कामे त्यांच्या ट्रस्ट च्या माध्यमातून केली गेली.ह्या ट्रस्ट मध्ये आर्थिक अनियमितता असल्याचे आरोप झाले.आंध्र सरकारची पाच सदस्यीय समिती पण ह्यासाठी गठीत केली होती पुढे त्याचे काय झाले? क्लीन चीट.कोन्ग्रेस कडे काही असो व नसो क्लीन चीट मात्र ढिगाने असतात. बाबांची भोंदुगिरी! सर्वज्ञानी असतानासुध्दा "सत्यनारायन राजू" (जे त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले होते.) शाळेत जायला लागला. थोड्याच दिवसात त्याच्या अगाध लीलांचा अनुभव सर्वांना येऊ लागला. मुलांना तो त्याच्या जादूच्या शक्तीमुळे आवडू लागला तर शिक्षक त्याला घाबरु लागले. का ते माहीत नाही. १९४० साली तो जेव्हा १५ वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या वेडावरच्या इलाजांना कंटाळून सत्यनारायण राजूने जगाला तो अवतार असल्याचे सांगितले आणि स्वत:ला सत्यसाईबाबा हे नाव घेतले. त्यांनी घोषणा केली "येशू, महंमद, बुध्द आणि इतर हे काही परमेश्वराचे अवतार नव्हते. त्यांच्याकडे फक्त काही दैवी शक्ती होत्या. मीच परमेश्वर आहे. माझी अगाध आहे आणि त्याला अंत नाही. ह्या पृथ्वीतलावर सत्य आणि प्रेमाने मानवता आणणे हे माझे काम आहे. २०२२ साली ह्या अवतारानंतर मी कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यात प्रेमसाई म्हणून जन्म घेणार आहे."(???)

बाबांचे चमत्कार :-
"चमत्कार ही माझी ओळख आहे" हे शिर्षक आहे हॅरॉल्डसन नावाच्या लेखकाने जे बाबांच्या चमत्कारांविषयी लिहिले आहे त्यातील एका प्रकरणाचे. बाबांनीच त्यांच्या एका मुलाखतीत हे वाक्य उच्चारले होते. थोड्याच दिवसात सत्यसाईबाबा त्यांच्या चमत्कारांमुळे जगभर प्रसिध्द झाले. त्या काळात मान्यता पावलेल्या एका मासिकात म्हणजे "रिडर्स डायजेस्ट" मधे त्याबद्दल लिहून आले होते. फक्त त्यात त्यांनी सत्यसाईबाबांना परमेश्वर म्हणायच्याऐवजी चुकून गुरु म्हटले होते. त्यांनी लिहिले होते "ते हवेतून सोन्याच्या अंगठ्या , नाणी काढतात. दगडाचे चॉकलेटमधे रुपांतर करतात. आजारी लोकांना विभूती देऊन बरे करतात. ही त्यांच्या हातात कुठून येते हे कोणालाही कळत नाही. सगळ्यात कहर झाला जेव्हा त्यांनी १९५० साली एका मुलाला ज्याचे शरीर कुजत चालले होते त्याला परत जिवंत केले तेव्हा. १९७१ साली डॉ. जॉन हिस्लॉप जो अमेरिकन साई फौंडेशनचा अध्यक्ष होता त्याने तर असे जाहीर केले की वॉल्टर कोवान – ज्याचा ह्रदय बंद पडून मृत्यू झाला होता, - त्याला बाबांनी परत जिवंत केले.
कै. सुरी भगवंतम जे इंडियन इन्स्टीट्यूटचे प्रमुख होते आणि भारत सरकारचे विज्ञान सल्लागार होते त्यांनीपण एक चमत्कार सांगितला आहे की एक दिवस बाबांनी एकदम हवेतून भगवतगीता काढून दाखवली. ह्या माणसांनीच बाबांना पुढे आणले असणार ह्यात शंकाच नाही. पुढे काय घडले असणार हे सूज्ञास सांगणे नलगे. त्यांच्या ह्या चमत्कारांच्या मालिका तरी बघा – एकदा पाण्यात त्यांचे बोट बुचकळ्यावर त्याचे पेट्रोल झाले, चिंचेच्या झाडावरुन त्यांनी आंबे काढले, एवढेच काय चीनच्या हल्ल्यात त्यांनीच चीनच्या सैन्याला पिटाळून लावले असे अनेक चमत्कार त्यांच्या पदरी आहेत. ते स्वत: असा दावा करतात की ते कधीच झोपत नाहीत. गंमत म्हणजे डॉ. सॅम्युएल सॅंडवाईज ह्यांना बाबांनी सांगितले की मीच परमेश्वर आहे आणि मी सर्वशक्तिमान आहे आणि मी सर्व ठिकाणी असतो तेव्हा त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. मग त्यांना हिस्लॉप विचारतात सर्व जगाचा कारभार चालवण्याचे काम असल्यामुळे बाबांना आपल्याशी बोलायला कसे परवडते ? बाबा त्यांना खात्री देतात की ते सर्वत्र असतात परमेश्वराला कसली सीमा ?

हिस्लॉपचे ह्या उत्तराने म्हणे लागलीच समाधान झाले.

ह्या अशा वातावरणात श्री. अब्राहम कोवूर आणि श्री. डॉ. नरसिंहन ( बेंगलोर विद्यापीठाचे उपकुलगुरु ) ह्यांनी सत्यसाईबाबांच्या विरोधात त्यांचे पितळ उघडे पाडण्याची मोहीम मोठ्या धैर्याने चालवली. डॉ.कोवूर ह्यांनी त्यांनीच लिहिलेल्या "Begone Godmen" ह्या पुस्तकात डॉ. भगवंतम ह्यांनी वॄत्तपत्रात केलेल्या दाव्यासंदर्भात लिहिले आहे. हे भगवंतम बाबांच्या तेलगू ते इंग्रजीचे दुभाषी होते. त्यांनी एका वर्तमानपत्रात बाबांचा एक चमत्कार लिहिला. "जगप्रसिध्द सिको कंपनीचे प्रमुख पुट्टपर्थीला भेट द्यायला आले तेव्हा बाबांनी त्यांना एक घड्याळ हवेतून काढून त्याचा प्रसाद त्यांना दिला. ते घड्याळ बघितल्यावर त्यांनी लगेचच बाबांसमोर लोटांगण घातले आणि ते त्यांचे शिष्यत्व पत्करले. ते घड्याळ काही साधेसुधे नव्हते. ते एक असे घड्याळ होते की जे अजून बाजारात यायचे होते आणि ते त्यांनी त्यांच्या ऑफीसमधे कडीकुलपात ठेवले होते."

भगवंतम ह्या घटनेबाबत जास्त काही सांगायला तयार नव्हते म्हणून डॉ. कोवूरांनी सिकोच्या प्रमुखांशी म्हणजे श्री. हातोरी ह्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांना ह्या गोष्टीला दुजोरा द्यायला सांगितला. श्री. हातोरींनी जे उत्तर पाठवले ते असे – "आपल्या पत्रात ज्या माणसाबद्दल आपण लिहिले आहे त्या माणसाविषयी मला काहीच माहिती नाही. ह्या साईबाबा नावाच्या माणसाला ना मी ओळखत ना माझ्या कंपनीतील कोणी माणूस. ही बातमी अत्यंत खोटी आहे ह्याबद्दल आम्हाला खात्री आहे. हे उत्तर जेव्हा त्याच वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले तेव्हा भगवंतमचे ताबूत थंडे झाले. ह्यावरुन ह्या बाबांनी आपला चमत्कार जनतेमधे पसरवण्यासाठी कोणाकोणाला हाताशी धरले होते आणि त्यासाठी कुठल्या मार्गाचा अवलंब केला होता हे समजून येईल.

जेव्हा डॉ. कोवूरांनी बाबांची एक सामान्य हातचलाखी दाखवणारा माणूस म्हणून जगाला ओळख करुन दिली तेव्हा खळबळ उडाली. त्यापेक्षाही भारताचा वैज्ञानिक सल्लागार हा असल्या माणसाचा हस्तक म्हणून काम करतो ह्या बातमीने आपल्या देशाची बदनामी झाली. ते नुकसान कधीही न भरुन येणारे आहे. नशिबाने डॉ. नरसिंहन यांनी एक १२ शास्त्रज्ञांची समिती नेमून सर्व असल्या फालतू बाबांचे पितळ उघडे पाडण्यासाठी त्यांना जाहीर आव्हान दिले. जेव्हा ह्या समितीच्या सदस्यांनी सत्यसाईबाबांची गाठ घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा हा परमेश्वर त्याच्या बेंगलोरजवळील व्हाईटफिल्ड नावाच्या निवासस्थानी लपून बसला. तेथून त्याने फक्त ह्या समितीवर चिखलफेक केली.
रात्रीचा अवतार :
हा इज्जतीचा पंचनामा कमी होता की काय म्हणून १९७६ मधे त्यांच्यावर अजून एक बॉंब पडला. ताल ब्रुक नावाच्या एका लेखकाने त्याच्या बाबांच्या आश्रमातील १४ महिन्यांच्या वास्तव्यात काय पाहिले ह्याविषयी एक पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकाच्या भारतातील सर्व प्रती एका रात्रीत खरेदी करुन नष्ट करण्यात आल्या. ह्या पुस्तकात बाबांच्या समलिंगी चंगळवादाच्या कहाण्यांचे आणि लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे वर्णन करण्यात आले आहे. पहिल्यांदा त्याचा ह्यावर विश्वास बसेना. परंतु अनेक कहाण्या समोर आल्यावर त्याचाही नाईलाज झाला. ह्या पुस्तकामुळे आणि बातमीमुळे जनतेत बाबांविषयी शंकेचे वातावरण पसरले. नाहीतर त्याचे प्रस्थ फारच पूर्वी वाढले असते.
लोकांच्या मनात मग विचार यायला लागले की
जर बाबा मेलेल्या माणसाला जिवंत करु शकतात तर त्यांच्या मेव्हण्याला रेबीजपासून का नाही वाचवू शकले ?
ते जर परमेश्वरच असतील तर ते त्यांच्या अपेंडिसायटीससाठी आणि हाड मोडलेल्या पाया साठी इस्पितळात का दाखल झाले ?
ते जर जनतेला साधेपणाचे धडे देतात तर स्वत: मर्सिडीसमधून का फिरतात ?
त्यांना स्वसंरक्षणासाठी सिक्युरिटी गार्डस्‌ का लागतात ?
का त्यांना जादूगार पी. सी. सरकार ह्यांच्यापासून धोका होता ?
त्यांच्या आश्रमातून आलेल्या स्त्रियांच्या शवांवर अत्याचारांच्या खुणा शवविच्छेदनात सापडल्या असे डॉक्टरांनी का लिहून ठेवले आहे ?
परदेशी शिष्यांपैकी अनेकजण त्यांची संपत्ती बाबांच्या संस्थानाच्या नावावर करुन अदृष्य का झाले ?
बाबांचे निवासस्थान “प्रशांतीनिलयम” हे गुंडांचे आश्रयस्थान आहे का ?
तसे नसेल तर आपल्या गृहमंत्र्यांच्या भेटीच्या अगोदर जेव्हा ह्या इमारतीची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात सायनाईड, आणि आर डी एक्स का सापडले ?

हे सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
कृष्णकृत्ये आणि कर्म : शयनगृहातील हत्याकांड

सगळ्यात भयंकर नामुष्की ओढवली ती ६ जून १९९३ रोजी “प्रशांती निलयम” च्या सहा रहिवाशांचा खून बाबांच्या शयनगृहात झाला तेव्हा. त्यातील दोन मारेकऱ्यांनी केले आणि चार पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ह्या चार मारेकर्‍याकडे फक्त सुरे होते आणि पोलिसांकडे बंदुका. जिवाच्या भितीने आपले परमेश्वर त्या खोलीतून खिडकीतून उडी टाकून पळाले आणि त्यांनी कोणालाच माहीत नसलेला एक अलार्म वाजवला. तुम्हाला आश्चर्य वाटेल जे लोक मेले ते सर्व बाबांचे लाडके शिष्यगण होते. त्यात ज्याने तो रत्न हार बाबांना हात चलाखीने दिला तोही होता. बाबांनी नंतर राखीपौर्णिमेच्या दिवशी ह्या सगळ्या भानगडी वर भाष्य केले “जन्म आणि मृत्यू हे एकत्रच प्रवास करत असतात. मृत्यू ही एक नैसर्गिक घटना आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल काळजी करणे व्यर्थ आहे. तुमच्या लक्षात आले असेल की स्वामींचा मृत्यू हा त्यांच्याच हातात आहे. मला वाटेल तेवढे मी जगू शकतो कारण परमेश्वर माझ्या इच्छेच्या विरुद्ध वागू शकत नाही. त्यामुळे काही मूर्ख लोक हा प्रश्न विचारतात की परमेश्वरानेंच हे का नाही केले, ते का नाही केले.”
...पोलिसांचा पंचनामा दोनदा बदलण्यात आला. पहिल्यांदा तो बाबांच्या खुनाचा प्रयत्न म्हणून करण्यात आला. नंतर तो आश्रमातील भांडणे असा करण्यात आ.ला. सर्व राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून रहस्यमय रित्या भारताच्या राष्ट्रपतींनी असे प्रतिपादन केले की हे सगळी भानगड एका मुलीच्या संबंधातील आहे. हे राष्ट्रपती होते श्री. शंकरदयाल शर्मा. आपल्याला आठवत असेल यांनीच त्यांच्या घरातील गालिच्यासाठी ६० लाख रुपयांची मागणी केली होती. जेव्हा गृहमंत्र्यांना (श्री. शंकरराव चव्हाण ) विचारण्यात आले की ज्यांच्या शयनगृहात ह्या हत्या झाल्या त्यांचा जबाब का नोंदवला गेला नाही ? ह्याचे उत्तर आपल्या गृहमंत्र्यांनी फारच विनोदी दिले. ते म्हणाले की त्यावेळेस बाबा तेथे हजर नव्हते, एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे ती म्हणजे हे प्रतिपादन करण्याअगोदर आपले गृहमंत्री दोनदा बाबांच्या भेटीस जाऊन आले होते. अशारितीने ही चौकशी दडपण्यात आली. आश्चर्य म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणानंतर आश्रमांनी कुठल्याही प्रकारची पोलिसांमधे आजपर्यंत तक्रार नोंदवली नाही. बाबांच्या दुर्दैवाने बी. प्रेमानंद यांनी हा पोलिसांचा तपास अस्विकारार्ह आहे असे सांगून सरकारवर पुरावे नष्ट केल्याचा न्यायालयात दावा लावला. ह्याच ग्रुहस्थांनी जेव्हा सोन्यावर सरकारी बंधने होती त्या काळात बाबांना न्यायालयात खेचले होते. त्यात त्यांनी बाबांवर असा अरोप केला होता की बाबा सोन्याचे दागिने तयार करुन “सुवर्ण नियंत्रण कायद्या”चा भंग करत आहेत. कारण त्यावेळेस जास्त सोने बाळगायला बंदी होती. हा आरोप फेटाळताना तव्हाचे न्यायधीश अंजनवेलू यांनी असा निर्णय दिला की दैवी शक्तीने निर्माण केलेले सोने हे तयार केले असे म्हणता येणार नाही. हे न्यायाधीश बाबांचे निकटचे शिष्य होते हे सांगायला नकोच.

मूत्र पिंडाची हकीकत:
मराठी साप्ताहिकाच्या १९ जानेवारी १९९६ च्या अंकात एक धक्कादायक बातमी छापून आली. त्यात सत्यसाईबाबा इन्स्टीट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेस या संस्थेबद्दलची एक बातमी छापून आली. ही संस्था बाबांच्या कृपेने २० कोटी रुपये खर्चून उभी झाली होती आणि गरीब जनतेत ती लोकप्रिय होती कारण ह्यात सर्व उपचार फुकट केले जायचे. याच संस्थेमध्ये मराठवाड्यातील त्रिंबक करवंदे नावाच्या एका गरीब शेतकर्‍याला त्याच्या मुलाचे मूत्रपिंड बसवण्यात येणार होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका आठवड्यानंतर मरायला टेकलेल्या त्रिंबकला सांगण्यात आले की शस्त्रक्रिया असफल झाली आहे. त्यांना परत त्यांच्या गावी पाठवण्यात आले. महाराष्ट्रात परत आल्यावर “Maharashtra Inst. Of Medical Sc.” मधे त्याचा “CT Scan” करण्यात आला तेव्हा असे आढळून आले की बिचर्‍या त्रिंबकची मूत्रपिंडाची शस्त्रक्रियाच झाली नव्हती. पण बालाजीचे मूत्रपिंड मात्र काढण्यात आले होते.

मग बालाजीचे मूत्रपिंड गेले कुठे ?


मी ९६ वर्ष जगणार आहे असे बाबा बोलायचे.त्याच्या आधीच गेले ते.मग जर तुम्ही (त्यांचे भक्त) त्यांची वाक्य खरी मानता तर त्याचं स्वतःच वाक्य खोट ठरलं ना? चमत्कार करून दाखवायचे. कुठे गेली ती कला? ती स्वताला वाचवायच्या कामी का आली नाही? १९४० ला ते म्हणाले कि मी साई बाबा आहे.महाराष्ट्रात असा कोणता संत होता जो स्वतःला मी अमुक संत-देव आहे त्याचा अवतार आहे असे म्हणाला? साई बाबा गजानन महाराज ह्यांनी समाधी घेतली.ते काही रुग्णालयात गेले नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या रुपात भक्तांना दर्शन दिले.त्यांचे आजार बरे केले.त्यासाठी त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल काढावे नाही लागले. महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे पण कमर्शियल हेतूने संत महाराष्ट्रात कधीच झाले नाहीत.आजही जे आहेत ते नंरेन्द्र महाराज ह्यांनी हजारो लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणले,हि खरी संत परंपरा आहे.हवेतून अंगठ्या काढून दाखवणे व पेट्रोल बनवणे हि काही संतांची कामे नाहीत हा शुध्द चू गिरीचा धंदा आहे.संतानी त्यांच्या मर्यादेत राहावे.अध्यात्माचे मार्ग दाखवावे.पण मीच देव आहे.मी अमुक देवाचा अवतार आहे असे सांगू नये.तसे महाराष्ट्रात ह्या आधी कोणी सांगितले नाही.जर कोणाला शंका आली त्यांना थेट त्याच रुपात दर्शन दिले.पण हल्लीच्या काळात मी देव आहे सांगणे हा चू गिरीचा धंदा आहे
सत्य साई बाबा जगात महान जादुगार म्हणून नक्कीच ओळखले जातील पण देव अवतार म्हणून देव अवतार या संकल्पनेचा अपमान तरी करू नका..............

Saturday, April 9, 2011

आम्ही आमच्या आधीच्या जुन्या लेखात पण अण्णा हजारेंची आंदोलने संशयास्पद असल्याचे म्हणाले होते.

परवा पासून पाहतोय आण्णा ह्यांना मिळणारा पाठींबा,त्यात आमच्या दैवताने-शिवसेना प्रमुखांनी त्यांना दिलेला पाठींबा ह्या पार्श्वभूमीवर आम्ही गोंधळून गेलो होतो.अरे आपण चुकत होतो कि काय? पण आज खरे रूप समोर आले.शांती भूषण सारखी संशयास्पद व्यक्ती ह्या समिती मध्ये असणार आहे.
आणि हुश्श.आम्ही वाचलो फार मोठ्या वैचारिक गोंधळामध्ये सापडलो होतो तुम्ही पण सापडू नका.खालील लेख वाचा.आणि जागे व्हा!जागे व्हा!!जागे व्हा!!!

मुंबई बॉम्ब स्फोटातील २ आरोपींचे वकील म्हणून काम करणारे शांती भूषण मसुदा समितीवर..

अहाहा!!!

जिंकले अण्णा!!! आह अण्णा...वाह अण्णा !!!! जिंकला इंडिया !!!! जंतरमंतर

झाले !!!! संपले सगळे घोटाळे !!आता गल्ली पासून दिल्लीपर्यंत कोणत्याच

कामासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत !!!! अण्णा खुश ....अण्णाचे भक्त गणंग

खुश !!!!

अहो पण हे काय ? अण्णांनी सुचविल्या प्रमाणे मसुदा समितीवर

सहअध्यक्ष म्हणून शांती भूषण विराजमान झाले आहेत !!

कोण आहेत हे शांती

भूषण?

१९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील २ आरोपींचे वकील म्हणून काम करणारे

शांती भूषण..अहो इतकेच काय या शांती भूषण साहेबांनी २००१ साली संसद

हल्ल्यातील आरोपी शौकत हुसेन गुरूला झालेल्या १० वर्षांच्या शीक्षेविरुद्ध

चक्क अपील केले होते ...अनेक घोटाळ्यांचे आरोप या शांती भूषण साहेबांवर

आहेत !!! आह अण्णा...वाह अण्णा !!!! काय म्हणत असतील मुंबई बॉम्ब

स्फोटातील मृतात्मे ?

शांति भूषण यानी राज नारायण यांच्या वतीने इंदिरा गांधींच्या विरुद्ध खटला जिंकला होता तेंव्हा जगमोहन लाल सिन्हा हे जज होते!

२००२ मध्ये यानी अरुंधती रॉयच्या वतीने सरकार विरुद्ध दावा दाखल केला होता .

बेंगलोर म्हैसूर इन्फ्रा स्ट्रक्चर स्कम मध्ये देवेगौडा यांच्या वतीने ते कोर्टात कौन्सेलर म्हणून होते !!!

थोडेसे लोकपाल बिलासंदर्भात-

नव्या लोकपालाने जर एखाद्यास भ्रष्ट ठरवले तर त्याला न्यायालयातही दाद मागण्याचा अधिकार राहणार नाही. वाटेल त्याची चौकशी करण्याचा अधिकार या लोकपाल यंत्रणेस असेल. अशा चौकशीस नकार देण्याचा अधिकार मात्र इतरांना नसेल. लोकपालास स्वत:हून वाटेल त्याची भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी करता येऊ शकेल, त्यासाठी कोणाच्या तक्रारीची गरज नाही. या साऱ्या मागण्यांचा अर्थ इतकाच की जन लोकपालाद्वारे अमर्याद अधिकार असलेली अगडबंब यंत्रणा अस्तित्वात येईल आणि तिच्यावर कोणाचेही नियंत्रण नसेल. असलेच तर ते जनतेचे असेल. आता जनतेचे म्हणजे कोणाचे ? तर काही निवृत्त न्यायाधीश, समाजसेवक वगैरे मंडळी ही लोकपाल यंत्रणा चालवतील. पण ही मंडळी भ्रष्ट होऊ किंवा असू शकत नाहीत काय? त्यातही परत अण्णांची अट अशी की या यंत्रणेत दोन मॅगसेसे पुरस्कार विजेते असतील. याच्यासारखा दुसरा बालिशपणा नाही. मॅगसेसेच काय नोबेल मिळालेल्यांना सुध्दा पुढील आयुष्यात भ्रष्टाचाराचा मोह हेऊ शकतो आणि अमर्याद, अनंत कालासाठी जर अशा माणसांकडे सत्ता, अधिकार राहिली तर त्याच्या गैरवापराचे पातक त्यांच्याकडूनही होऊ शकते. बांगला देशात नोबेल विजेते महंमद यूनुस यांची जी घसरण सुरू आहे, त्याने हे दाखवून दिलेच आहे. या शिवाय अण्णा पुरस्कृत जनलोकपाल विधेयकाची अतिधोकादायक बाब म्हणजे त्यातून जन्माला येणाऱ्या लोकपालास अधिकारांचे, कायद्याचे कसलेही बंधन नसेल. म्हणजे एखादे सरकारी धोरण भ्रष्टाचारी ठरवायचा अधिकार अण्णा पुरस्कृत लोकपालास मिळेल आणि त्याच्या दृष्टीने हे कथित भ्रष्टाचारी धोरण रद्दबादलही करता येईल. एखाद्या खात्यासाठी केलेली तरतूद ही अनावश्यक ठरवायचा अधिकारसुध्दा अण्णा पुरस्कृत लोकपालास राहील. म्हणजे सरकारी धोरण आणि भ्रष्टाचाराची कृती यात फरक करण्याची किमान आवश्यकतासुध्दा या नव्या लोकपालास आवश्यक ठरणार नाही. याच्याइतके धोकादायक दुसरे काही नाही. अशी जर महाशक्तिशाली यंत्रणा जन्माला घालायची असेल तर मग संसदेची आवश्यकताच काय ? अर्निबध अधिकारांतून अर्निबध भ्रष्टाचार जन्माला येतो हे इतिहासाने वारंवार दाखवून दिलेले आहे . असे अधिकार ही हुकुमशाहीची सुरूवात असते. अण्णांना अशी हुकुमशाही हवी आहे काय? निवडून आलेले, सरकार चालवणारे सर्व नालायक आणि मी तेवढा योग्य अशा प्रकारच्या भूमिकेस टाळय़ा पडतात. पण त्यामुळे व्यवस्था चालू शकत नाहीत

अहाहा!!! जिंकले अण्णा!!! आह अण्णा...वाह अण्णा !!!!

अण्णाचे भक्त गणंग खुश !!!!

मुंबई बॉम्बस्फोटातील मृतात्म्यांनी मात्र शरमेने खाली मान घातली ...पण पर्वा कुणाला

? जिंकले अण्णा !!! हजारो कोटींचा जुगार चाललेला आयपीएलचे सामने पाहत आपण

जल्लोष साजरा करू या !!!! अण्णा बेस्ट इवेन्ट मनेजर आहेत ...आता विधानसभा,

लोकसभा,सर्वोच्च न्यायालये टाका बंद करून ....निवडणुका गेल्या चुलीत !!!

द्या सारा कारभार अण्णाच्या हातात ......चला चला घाई करा...व्हा परत एकदा

क्षणिक भावनांवर स्वार!! बिचारे मुंबई बॉम्ब स्फोटातील मृतात्मे

............आह अण्णा...वाह अण्णा !!!!

घ्या अजून बोडक्यावर बसवून.पाद्य पूजा करा