Saturday, January 22, 2011

महाराष्ट्राला बाळासाहेबांचेच नेतृत्व हवेय!



महाराष्ट्रात अनेक महान नेते होऊन गेले, ज्यांनी देशासाठी आपले आयुष्य पणाला लावले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखे नेते हे तमाम जनतेच्या गळ्यातील ताईत बनून राहिले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला शूर-वीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध केले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच शिवरायांचे भक्त बनून अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार करताना इंग्रजी राजवटीला हलवून सोडले, त्याच शिवबाच्या मातीत त्याच शिवबाचा भक्त बनून आज जर कोणी महाराष्ट्राला किंबहुना मराठी माणसाला मान-सन्मानाने जगायला शिकवले असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनीच!


व्यंगचित्रकार एवढा मोठा नेता बनू शकतो हे कदाचित जगातील एकमेव उदाहरण असेल. इतर नेत्यांवर व्यंगात्मक कला चितारुन त्याच क्षेत्रात काम करणे हे फारच कठीण आहे. पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांच्यासारखे नेते भरात असताना त्यांच्यावर व्यंगचित्र काढणे हे सोप्पे नव्हते, पण शिवरायांच्या भूमीत जन्माला आलेला मराठी माणूसच हे करु शकतो हे बाळासाहेबांनी दाखवून दिले. ‘मार्मिक’ या व्यगंचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून ‘शिवसेना’ नावाची मर्दांची संघटना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केली. शिवसेनेचे वय आज ४५ वर्षे जरी असले आणि स्थापनेपासून काम करणारे शिवसैनिक हे कायम तरुणच असतात, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

४५ वर्षांपैकी जवळ जवळ ४० वर्षे सत्ता नसतानाही आक्रमक संघटना कशी टिकू शकते हे अनेकांना पडलेले कोडे आहे. तात्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनीही शिवसेना संपविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले असे आजही वाचनात येते, एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी शिवसेना संपू शकली नाही याचा अर्थ यात कुठेतरी दैवी शक्ती असलीच पाहिजे असे मानले तरी हरकत नाही. आजही काहीजण शिवसेना संपविण्याची कोल्हेकुही करत असतात पण या चिटपाखरांना ४२ पिढ्याही शक्य होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे.

बाळासाहेबांनी शिवसेनेत नुसती माणसांची भरती केली नाही तर निष्ठावान मावळ्यांची फौज स्वत:च्या जादुई नेतृत्वाने उभी केली. बाळासाहेब वयाने थकले असले तरी त्यांची जादु आम्हा तरुणांवर कायम आहे. अनेकजणांना साहेबांची भाषण ऐकता आली नाहीत परंतु जे काही वाचून कळते त्यावरुन साहेबांचे मोल आम्हा तरुणांसाठी फार मोठे आहे. ‘जिथे पिकते, तिथे विकले जात नाही’ ही म्हण मराठी माणसासाठी चपखल लागू पडते. शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते दादोजी कोंडदेवांपर्यंत आपण इतिहास जगण्यापेक्षा त्यावर वादच करत बसलो. बाळासाहेबांसारखे आधुनिक आणि प्रगतीशिल नेतृत्व असतानाही आमच्या महाराष्ट्राने संधी दिली ती केवळ साडेचार वर्षासाठीच! त्याही साडेचार वर्ष मिळालेल्या संधीचे सोने करुन साहेबांनी अनेक विकासकामे करुन दाखविली. शिवशाही सरकारच्या कामांमध्ये प्रामुख्याने मुंबईतील ५५ उड्डाणपुल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वरळी सागरीसेतू ही कामे आहेतच, तसेच सर्वसामान्यापर्यंत सरकार पोहचले पाहिजे यासाठी अनेक सरकारी उपक्रम कोकणासारख्या मागासलेल्या भागात आणले. आजच्या तरुणाला प्रगती आणि विकास या दोन गोष्टी महत्वाच्या वाटतात, बाळासाहेबांनी मुळात त्या शिवसेनेत यापूर्वीच राबविलेल्या आहेत. मुंबईमध्ये मागची अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर असल्याने सिद्ध करुन दाखविले आहे. महानगरपालिकेकडे असलेले मर्यादित अधिकार बघता देशातील इतर महानगरपालिकांमध्ये मुंबई कैक पट पुढे आहे.

बाळासाहेब हे तरुणांचे आदर्श नेते आहेत आणि कायमस्वरुपी राहणार आहेत. स्पष्ट बोलणारा माणूस राजकारणात स्वकर्तुत्वावर टिकू शकतो हे साहेबांनी दाखवून दिलेय पण त्यामुळे अनेकांची गोचीही झालेली आहे. बाळासाहेबांचेच जुने मित्र शरद पवार हे एकेकाळी साहेबांच्या स्पष्टवक्तेपणामुळे साहेबांपासून लांब गेले होते. अनेकजण साहेबांच्या याच स्वभावामुळे जवळ यायला तयार होत नाहीत. साहेबांनी शिवसैनिकांवर जेवढे प्रेम केले तेवढे कुणावरच केले नसेल. जगातील कुठल्याही पक्षातील कार्यकर्त्याला समाजात मान नसेल इतके मान शिवसैनिक म्हणून मिळते हा आम्हा शिवसैनिकांचा अनुभव आहे. पैसा-संपत्ती या मोहात न पडता केवळ मराठी अस्मितेचे जतन झाले पाहिजे यासाठी अनेक मोठ्या लोकांशी साहेबांनी पंगा घेतला. परंतु स्वत:च्या विचारांशी आजही कायम प्रामाणिक राहिले आहेत.

बाळासाहेबांसारखे नेतृत्व हे अनेक वर्षांनी जन्माला येते. बाळासाहेबांच्या भाषणाची नक्कल करुन, वेगळे दुकान मांडून, मराठी माणसाच्या विश्वासाचा वापर स्वत:चे पोट भरण्यासाठी केलेले काही स्वयंभू नेते साहेबांच्या कुटूंबातच जन्माला आले हे सर्वांचे दुर्भाग्य आहे. परंतु बाळासाहेबांनी दिलेला विचार आचरणात आणण्याचे काम केवळ शिवसैनिकालाच जमते. घरदार सोडून शिवसेनेसाठी झोकून देणारे शिवसैनिक साहेबांना मिळाले एवढे भाग्य लाभलेला नेता क्वचित असेल.

आज बाळासाहेबांचा वाढदिवस, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अनेकजण लिखाण करत असतात, वर्तमानपत्रांमध्ये पुरवण्या निघतात. माझाही तसाच मोडक्या-तोडक्या भाषेतील हा लेख माझ्या ब्लॉगवर लिहित आहे. आमच्या साहेबांना अखंड निरोगी आयुष्य लाभो, ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Wednesday, January 12, 2011

शिवसेना-एक नजर


र्याच लोकांना हल्ली स्वप्न पडत असतात कि शिवसेना संपली.काल एक पावटा आमच्यातून गेला मग हि मळमळ अजून बहरून येते.त्या पावस्काराना काय कमी केल होत?विधान परिषदेवर आमदार केल होत.४ वर्ष आमदारकी बाकी होती तरी सोडून गेला? का गेला हे आम्हाला ह्या पीत पत्रकारांकडून समजले.म्हणे त्यांच्या कामगार सेनेत त्यांचे पंख छाटत होते.
आता आमदारांचे नुकतेच पगार वाढले.सोयी सवलती तर चिकार असतात तरी पण हे सोडून जातात का तर म्हणे कामगार सेनेत वर्चस्व कमी केल होत. म्हणजे पहा जेवढ्या थैल्या कामगार सेनेत ह्याने कमावल्या तेवढा पैसा आमदारकी मध्ये नाही असा अर्थ काढू का आम्ही?

राज ह्यांनी सोबत नेलेली विद्यार्थी सेना! एक बागुलबुवा

राज साहेब बाहेर पडले ते विद्यार्थी सेना सगळी सोबत घेवून हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं.विद्यार्थी सेना संपली अशी ओरड सर्व पत्रकार ओरडत होते. बरोबर ना?
फरक पडला. नाही पडला असे नाही.नंतरच्या सिनेट निवडणुकीत आम्ही ३ जागांवर घसरलो. एकूण जागा असतात १०.
पण आज आदित्य व अभिजित पानसे ह्यांच्या नेतृत्वात ३ च्या ८ जागा झाल्या हे लक्षात घ्या.

मिडिया ने ह्याला प्रसिद्धी दिली ती उलट कि आदित्यचे केवळ नाव आहे सगळी रणनीती जुन्या लोकांनी आखली.हो ना मान्य आहे आदित्य ने काय किंवा प्रबोधनकार ह्यांच्या पासून कोणाही ठाकर्यांनी कधीच यश आपले मानले नाही कायम सामान्य सैनिकाच यश आहे असे म्हणाले.
पण हीच मिडिया अशी बातमी का देत नाही राज ह्यांच्याबरोबर बाहेर पडलेली विद्यार्थी सेना सावरायला शिवसेना यशस्वी.का देत नाही?कारण उघड आहे आम्ही पाकीट देत नाही.मग कोणीतरी पावटे उठतात आमच दुकान एक एक खाली होतंय शटर बंद होणार अशी स्वाभिमानी बांग देतात पण त्या स्वाभिमान ची टपरी सिनेट मध्ये फुटली हे हि मिडिया ठळक पणे का सांगत नाही.
शिवसेनेचे ४५ आमदार आहेत.११ लोकसभा खासदार आहेत.मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली,संभाजीनगर,नाशिक,येथे महापौर आहेत.नागपूर मध्ये उप महापौर आहेत.हे सर्वांनाच माहिती आहे.आता पुढे जी माहिती देतो ती फार कमी लोकांना माहिती आहे.

शिवसेना महाराष्ट्राबाहेर!


शिवसेना हि केरळ मध्ये समाजकारण करीत आहे.त्याची हि लिंक.
http://shivsena-kerala.org/history.htm

इतर राज्याचे बोलायचे म्हणजे गुजरात,गोवा, मध्य प्रदेश,छत्तीसगढ,दिल्ली येथे शिवसेना हिंदू संघटना म्हणून ताकद ठेवून आहे.
वाराणसी(उत्तर प्रदेश) मध्ये वाटर चित्रपटाच्या निदर्शनात शिवसेनाच पुढे होती.
मोहाली(पंजाब) व दिल्ली ची खेळ पट्टी शिवसैनिकांनीच उखडली.
कर्नाटक च्या श्रीराम सेनेचा अध्यक्ष हा शिवसेनेत होता.आज जी झुंड शाही तो करतोय त्याचे ट्रेनिंग त्याने शिवसेनेकडूनच घेतलं. त्याने बेळगाव प्रश्नी कर्नाटक ची तळी उचलली म्हणून साहेबांनी त्याची हकालपट्टी केली.
नेपाळात माववाद्याना उत्तर द्यायला शिवसेनाच पुढे आहे.हे त्या चित्रावरून दिसतच आहे.
दिल्लीत आमदारकीला आमच्या उमेदवार साध्वी विजया समल ह्यांना दुसर्या क्रमांकाची मते होती.
हिमाचल प्रदेश भाजप प्रवक्ते मध्ये बोंब मारत होते कि विधानसभेला शिवसेनेने उमेदवार उभे करून सत्ता घालवली.दोन -चार जागा द्यायला हव्या होत्या थोड नुकसान वाचल असत.
कर्नाटक मध्ये पण शिवसेना राजकीय दृष्ट्या nusence का काय म्हणतात ती value ठेवून आहे.
भोपाल,जबलपूर (मध्य प्रदेश) महापालिकेत आमचे नगरसेवक आहेत.

शिवसेना संपली असे दिवास्वप्न कोणी हि पाहू नये, आम्ही का संपणार नाही?

>>>>>>>>>>>>>>>.
१)कारण आम्ही बँका बुडवत नाही.
२)आम्ही साखर कारखाने आजारी दाखवून प्याकेज मागत नाही.
३)आम्ही अजून अमुक अमुक दिवस अमुक जिन्नस मिळणे मुश्कील सांगून काळाबाजाराला प्रोत्साहन देत नाही.
४)कमुनिस्त व समाजवादी ह्यांना कधीच कामगार ह्या पलीकडे दृष्टी न्हवती.कथित अन्यायावर ते लढत होते.म्हणून ते संपले.
आम्ही कायमच समाजकारण केले.
५)मराठी आमचा श्वास आहे हिंदुत्व आमचा प्राण आहे.आमची हि दोन तत्व हजारो वर्ष आक्रमकांना तोंड देत उभी आहेत.व ती आता आमच्या हातात सुरक्षितआहेत.

शिवसेना काल आज आणि उद्या हे शिवसेना नेते खासदार डॉक्टर मनोहर जोशींचे पुस्तक वाचा.ह्या पुस्तकावर त्यांनी डोक्तारेत मिळवली,त्यात अजूनही मुद्दे मिळतील.
लेखन सीमा! जय महाराष्ट्र!

Friday, January 7, 2011

विद्रोही संघटना व वास्तव


सध्याच्या काळी स्वत:ला सुधारणावादी, समाजसुधारक, विद्रोही, परिवर्तनवादी, निधर्मी, चळवळवादी, बहुजनवादी अशाच नाना प्रकारची विषेशणे स्वत:ला लावुन घेणारी बरीच मंडळी सध्या आपल्या आजुबाजुला आढळतील. याचे कारण म्हणजे सध्या वारेच यांच्या विचारांच्या दिशेने वाहत आहे यांना हवी असलेली परिस्थिती सध्या महाराष्ट्रात चालू आहे. “आरोप” हे या लोकांचे क्रमांक एक चे अस्त्र आहे. याच अस्त्राच्या आधारावर हिंदु धर्मावर, संस्कृतीवर, शिवचरित्रावर, वेद-वेदांत, देश, संत-महंत, महापुरुष यांच्यावर अनेक आरोप ही मंडळी करायला मागेपुढे पाहत नाहीत. अगदी यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर सावरकर हे स्वातंत्र्यविर नसुन 'संडासविर' आहेत. हेडगेवार, टिळक ही देशद्रोही पिलावळे यांच्या दृष्टीने ठरतात, तर झांसीची राणी लक्ष्मीबाई या इंग्रजांच्या बटीक ठरता. ही झाली पहीली बाजू ज्यांनी या देशाची आजन्म सेवा केली ते यांच्या दृष्टीने देशद्रोही वगैरे ठरतात. दुसरी बाजू म्हणजे हे लोक कोणाला चांगले म्हणतात ?? तर ...औरंगजेबाला स्त्रि-दाक्षीण्यवादी असे विषेशण या लोकांनी लावले आहे. हिंदु-मुस्लिम दंगलीमध्ये हे नि:संकोचपणे मुसलमानांची बाजू उचलून धरतात. अफजलखान वधाचे चित्र लावण्यास विरोध करण्यामध्ये हेच लोक आग्रभागी असतात. म्हणजे सावरकर, हेडगेवार, राणि लक्ष्मिबाई, समर्थ रामदास, टिळक हे देशद्रोही आणि औरंगजेब, अफजलखान हे देशप्रेमी .. साधारण अशाप्रकारचे एक अभद्र समिकरण या स्वयंघोषीत समाजसुधारकांनी आज मांडलेले आहे. खरे तर यांच्या या समिकरणाला किती लोकांचा पाठिंबा आहे हा एक संशोधनाचा विषय आहे.

या लोकांकडे प्रसिद्धी हे एक हत्यार आहे . आमुक-आमुक या एखाद्या सभेला पच-पन्नास लोक उपस्थित असले की पाच-पन्नास चे पाचशे-पन्नास करुन आपल्या समविचारी प्रसिद्धी माध्यमामध्ये याची बातमी द्यायची . हा एक रोजचा भातुकलीचा खेळ असावा याप्रमाणे चालत आहे. या विद्रोही वादी लोकांच्या काही संघटना आहेत व या संघटनांवर कॉंग्रेस मधील काही 'बड्या' नेत्यांचा वरदहस्त आहे. अगदी लहानातल्या लहान सभेसाठी या नेत्यांकडून यांना आर्थिक ओघ येत असतो तसेच उपस्थितांची संख्या जास्त दिसण्यासाठी हे 'बडे' नेते आपल्या कार्यकर्त्यांना या संघटनांच्या कार्यक्रमांना पाठवत असतात व याचा मोबदला म्हणुन निवडणुकी वेळी या विद्रोही संघटनांचे कार्यकर्ते आपल्या 'बड्या' नेत्याचा प्रचार करण्याच दंग असतात. अर्थात पैसे, भ्रष्टाचार, लाच-खोरी अशाप्रकारच्या लोकशाहीला काळीमा फासणारे प्रकार यावेळी सर्रास केले जातात.

हिंदु समाजामजामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मोठी जन-जागृती होत आहे. मग त्याला कारण मिरज दंगली सारखी प्रकरणे असोत, धुळे दंगली सारखी प्रकरणे असोत, काश्मिर मध्ये हिंदुंचे हनन , इस्लामी दहशतवाद , आणि ना जाणो किती अशा अनेक प्रकरणांमुळे हिंदु समाज हळू-हळू जागृत होत आहे. बेगडी धर्मनिरपेक्षतेला लात मारुन ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करनारे हिंदु तरुण तयार होऊ लागले आहेत. हेच हिंदुत्व अशाचप्रकारे वाढू लागले तर आपल्या उद्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल असे या देशातील काही अहिंदुंना वाटू लागले. वेग-वेगळ्या माध्यमांतून अगदी प्रतिकूल परिस्थितिमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असलेली हिंदुजागृती पाहून काही लोकांची झोप उडाली आणि याच कारणामुळे वामन मेश्राम (नवबौद्ध), जैमिनी कडू (ख्रिश्चन), व रफिक कुरेश(मुसलमान) या त्रिकुटाने मिळून हिंदुधर्म, हिंदु संस्कृती, देशप्रेमी संत-महंत-महापुरुष, हिंदुधर्मग्रंथ तसेच हिंदुसमाज यांच्या विरोधात 'बामसेफ' ही संघटना स्थापण केली, सध्याची मराठा सेवा संघ या संघटनेमागील बाबसेफ ही सुत्रधार संघटना आहे. ती दलित संघटना असल्यामुळे तिला मराठा संघाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती म्हणुन सुरवातीला 'मराठा महासंघ' या मसाठा संघटनेचा वापर करून घेण्याचे प्रयत्न करुन घेण्यात आले. परंतु या प्रयत्नांना पुरेसे यश मिळत नसल्याचे दिसून आल्यावर या कटाच्या सुत्रधारांनी मराठा सेवा संघ या नावची वेगळी संघटना स्थापन केली आणि कळसूत्रीप्रमाणे पुरुशोत्तम खेडेकर यांस अध्यक्ष केले. या संघटनांच्या स्थापणे संबंधी मराठा विकास परिषदेने ऑगस्ट २००९ रोजी प्रकाशीत केलेल्या 'शिवरायांचा देशधर्म, पुरुषोत्तमांचा द्वेशधर्म' या पुस्तिकेमध्ये श्री अशोक राणे यांचा एक परिच्छेद उल्लेखनिय आहे , तो असा.. “अयोध्या आंदोलनामुळे देशामध्ये हिंदुत्व पुनर्जागरणाला सुरवात झाली आणि त्याचा प्रभाव समाजीवनाच्या विविध क्षेत्रावर जाणवून प्रचंड हिंदुत्व जागरण झाले. त्यामुळे हिंदुत्वविरोधी कळपामध्ये खळबळ माजली व हिंदु समाजामध्ये जातीय संघर्ष उभा करणार्‍या चळवळी देशामध्ये सक्रिय झाल्या किंवा हिंदू समाजामध्ये जातीय संघर्ष निर्माण करणार्‍या संघटनांना खतपाणी घालण्याचे काम सुरु झाले. वर्ष १९९९ ते २००० या काळात हिंदुत्व हिंदुत्व जागरणामुळे गुजरातमधील डांग मध्यप्रदेशातील झाबुआ, ओरिसातील आनंदपूर येथील कमजोर हिंदुंची ख्रिश्चन मिशनरिंनी बाटवाबाटवी केली होती. तो ख्रिश्चन झालेला हिंदु समाज घरवापसी करुन हिंदु धर्मात पुनप्रवेश करु लागला. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी जगतामध्ये खळबळ निर्माण झाली व हिंदु समाजातील कमजोर वर्गाचे धर्मांतर करण्याऐवजी हिंदू समाजामध्ये केवळ जातीय संघर्ष निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्याचवेळेस सन २००१ मध्ये डरबन येथे विश्वसंमेलन झाले. त्यामध्ये w.c.c संघटनेच्या (world church council) नेतृत्वाखाली भारतीय दलित नेत्यांनी हजेरी सुद्धा लावली. त्यामुळे विद्रोही साहीत्य संमेलनाला महत्व आले. आणि त्यामधून वहारू सोनावणे यांनी 'आदिवासी हिंदु नाहीत' अशी भूमिका जाहीर केली. दया पवार, लक्ष्मण माने यांना विदेशी पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाने 'मराठा जोडो' यात्रा काढून हिंदु धर्म सोडण्याचे आवाहन मराठा समाजाला केले.”

या संघटनांच्या कार्यपद्धतिविषयी संत श्री बाबुराव महाराज वाघ आपल्या 'हिंदुजागृती' या पुस्तकात म्हणतात , ''.....नंतर खोडेकर मराठा सेवा संघाचा अध्यक्ष होताच माने मराठा 'समाजाचे संघटन' या गोंडस नावाखाली सर्व मराठा समाजास ब्राम्हणद्वेष, हिंदद्वेष, हिंदूधर्मद्वेष, हिंदूधर्म ग्रंथांचा द्वेष, वारकरी सांप्रदायीक संतांचा द्वेष, वारकर्‍यांचा द्वेष, विठ्ठलाचा द्वेष इत्यादी शिकवण देण्यास आरंभ केला. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु, हिंदूधर्म, हिंदूस्थान यांच्या रक्षणाकरीता अहोरात्र ३६ वर्षे संग्राम केला त्या हिंदुधर्माच्या विरोधात बामसेफ प्रणित मराठा सेवा संघ आणि त्याच्या उपसंघटना यांनी काम करणे हा शिवाजी महाराजांचा घोर अपमाण होय.''

याचप्रमाणे प्राचार्य श्री अशोक बुद्धीवंत आपल्या एका लेखामध्ये मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा काढून आपली पोळी भाजू पाहणार्‍या तथाकथीत स्वयंघोषीत समाजसुधारकांबद्दल म्हणतात, ''ज्या नेत्यांच्या घरात अनेक टर्म आमदारक्या आहेत, जे निवडणुकांवर कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करतात, ज्यांच्याकडे आजच्या काळातही शेकडो एकर जमिनी आहेत, ज्यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत, ज्यांच्या संघटनांमध्ये हिशोब न दिल्यामुळे फुटी पडलेल्या आहेत ती मंडळी जेव्हा गरिबीबद्दल आणि गरिबांबद्दल खोटय़ा कळवळ्याने लिहितात तेव्हा ते अपराधभावातून आलेले लेखन आहे असेच म्हणावे लागते.'' तर श्री सुनिल चिंचोळकर आपल्या समर्थ चरित्र : आक्षेप व खंडन या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात, ''शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडॆ दुष्काळ. ''