Tuesday, August 16, 2011

पुरंदरेंच्या मौनाचे दुष्परिणाम- सामाजिक राजकीय

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यावर खटला-अब्रू नुकसानीचा दावा दाखल झाला आहे.हा खटला डॉक्टर राजीव चव्हाण ह्यांनी कोल्हापुरात भरला आहे.ह्यात त्यांनी काही विधाने,चित्रे हे जेम्स लेन प्रकरणाचे मूळ असल्याचे म्हंटले आहे व ह्यात मराठा समाजाची बदनामी असल्याचे म्हंटले आहे.
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=196940&boxid=2326146&pgno=1&u_name=0

पुरंदरे हे नेहमीच वादाच्या विषयापासून दूर राहिले आहेत.मग ते लेन प्रकरण असो कि लालमहालातील दादोजी पुतळा हटवण्याच्या संदर्भात असो.ब्रिगेडचे नेते ह्याबद्धल चर्चा करण्याचे आवाहन त्यांना देत होते.तसेच जयसिंगराव पवार ह्यांनीही बाबासाहेब पुरंदरे, निनाद, मेहेंदळे, आदि पुण्याचे नामवंत इतिहासकार ह्यांना चर्चेचे आमंत्रण दिले पण ते त्यांनी स्वीकारले नाही.

त्याचं मौन हे समस्त हिंदुत्ववादी संघटना न घातक आहे असे मला वाटते.

मध्ये आय बी एन लोकमत वाहिनीवर वागळे ह्यांच्या मुलखाती मध्ये देखील-"मी ह्याकडे लक्ष देत नाही' अस म्हणत त्यांनी ब्रिगेडी व पवार सारखे संशोधक ह्यांना अनुलेखाने मारण्याचा प्रयत्न केला.(आता वागळे कसे खोचक पणे बोलतात व उत्तर काढून घेतात हे माहितीये महाराष्ट्राला.तरी पुरंदरे त्यांना पुरून उरले)

वास्तविक त्याचं हे मौन मला तरी चुकीच वाटत.अर्ध्याहून जास्त महाराष्ट्र व किमान दोन पिढ्या त्याचं "राजा शिव छत्रपती" वाचून वाढल्या.त्यांची शिवचरित्र रंजक करून सांगण्याची कला थोर आहे.प्रत्येक प्रसंग रंगवून सांगणे व तो ठसवणे हि कला दाद देण्याजोगी.त्याच बरोबर "जाणता राजा" हे शेकडो कलाकार व हत्ती,घोडे,उंट ह्यांच्यासाहित सदर होणारे महानाट्य पण अप्रतिम.अगदी ब्रिगेडी पण -"ते प्रसंग वगळा बाकी नाटक सुरेख आहे" म्हणतात.(नक्की कोण बोलल हे ह्या क्षणी आठवत नाही.पण मी हे टीव्ही वर पाहिले आहे)

मग आज त्यांच्या पुस्तकात असलेल्या काही गोष्टींवर वाद झाले,एक शासनाचा पुरस्कार सुरु झाला व नंतर रद्द झाला, पुण्यात दादोजी पुतळा प्रकरण झाले,पुणे मनपा सभागृहात तोडफोड झाली,पुतळा हटवला तेव्हा विरोध झाला,त्याचा निषेध म्हणून बंद झाला,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.जनजीवनावर परिणाम झाला.त्यावर ह्यांना काहीच बोलावेसे वाटले नाही.पुण्यात एवढे घडत असून आणि स्वतः एक पुणेकर असून हे गप्प का होते?
ह्यामुळे सामाजिक स्वास्थ्य नक्कीच बिघडले.ब्राम्हण व इतर हा वाद गांधी हत्ये नंतर आज इतक्या वर्षांनी उफाळून आला.
खोट बोला पण रेटून बोला हि ब्रिगेडी वृत्ती.त्याला सर्वसामान्य बहुजन जनता भुलली कि जागृत झाली? नक्की काय झाल?
नक्कीच ह्यातून ब्राम्हण समाज व इतर ह्यांच्यात तेढ महाराष्ट्रात काही काही भागात जरूर निर्माण झाली.

एवढ सगळ होत असून पण ते गप्प का?

खरच जर ब्रिगेडच्या बोलण्यात तथ्य नाही तर ते ह्याचा विरोध का करत नाही?

राजाशिवछत्रपती ची रोयाल्ती आणि जाणता राजा नाटकाचा नफा ते जरी सामाजिक कार्यावर खर्च करत असले तरी त्याच दायित्व त्यांना नाकारून चालणार नाही.आणि त्याही पेक्षा महत्वाच म्हणजे गेली पाच दशके महाराष्ट्रातील सर्वच जातीच्या लोकांनी शिवशाहीर म्हणून जे भरभरून प्रेम त्यांना दिल त्यामुळे ह्या जनतेला त्यांचे उत्तर ऐकणे हा जनतेचा एक प्रकारे प्रेमळ हक्क आहे.त्याचाही त्यांना भान नाहीये का?

कि मी केल लिहील ते बरोबर असा त्यांचा काही इगो प्रोब्लेम आहे?

मला त्यांच्या ह्या मूक पणाचे पुढील परिणाम महाराष्ट्रात आणि नेट विश्वात जाणवले.

१)बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी बाबा आदमच्या जमान्यात शिवचरित्र लिहील.मध्ये निदान दीड पिढी गेली.त्यात नवीन माहिती पुढे आली.त्याचा अभ्यास करून त्यांनी त्यावर मत देणे आवश्यक होते.

२)समजा त्यांनी त्याचा अभ्यास केला नाही पण जेव्हा पुतळा वाद झाला तेव्हा निदान "मधल्या काळात नवीन संशोधन झाले ते काही मी पाहिले नाही.त्याचा अभ्यास करावा लागेल" अशी "पोलिटिकली करेक्ट" भूमिका घेवून ते ह्या वादातून आणि टीकेतून आणि खटल्यातून वाचू शकले असते.

३) पण त्यांनी तेही केल नाही.त्यामुळे ब्रिगेडच फावल.जरी १९४८ च्या गांधी हत्ये नंतरची परिस्थिती पुतळा प्रकरणात झाली नाही तरी मना-मनातून एक विखार,विष,द्वेष पेरलं गेल आहे.पुरोगामी महारष्ट्रात त्याचा हिंसेच्या रूपाने उद्रेक बहुतेक होणार नाही पण समाज काही प्रमाणात दुभंगला.एकमेकावर शंकेखोर पणा वाढला.

4) ह्यात हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्ते ह्यांचेच नुकसान आहे.जे शिवसैनिक,भाजप कार्यकर्ते,आणि घर दार विसरून निष्ठेने काम करणारे रा.स्व.संघाचे स्वयंसेवक ह्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवल्यासारखे आहे.

५)बाबासाहेबांच्या मौनामुळे जर जास्त नुकसान कोणाच होईल ते आमच्या शिवसेनेचं.कारण भाजप ला शेटजी भटजी ची मते व मुंडे कृपेने काही ठिकाणी ओबीसी मते मिळतीलच.पण शिवसेनेची कोंकण वगळता पश्चिम महाराष्ट्रात(जी आधीच थोडी मते आहेत) व मराठवाड्यात (जिथे ब्रिगेड स्त्रोंग आहे) तिथे नक्कीच नुकसान होईल.
अर्थात पब्लिक मेमरी शोर्ट. आम्ही आमच्या ८०% समाज करणावर भर दिला तर निवडून हि येवू.

पण बाबासाहेबांचे मौन हे सर्व परिस्थितीला- आणि राजकीय सामाजिक उलथा--पालथीस जास्त कारणीभूत वाटते.

2 comments:

  1. http://www.dadojikonddeo.org/vadang.html

    ReplyDelete
  2. हा कौस्तुभ आता सटकलेला दिसतोय.

    स्वतः काय शिकला ते माहीत नाही,


    पण आता हे साहेब इतिहासकार आणि बाबासाहेबांवर बोलण्या इतके मोठे कधीपासून झाले ते समजतच नाही.

    पुरंदरे यांनी मौन बाळगले असेल, कारण ब्रिगेडी लोकांच्या तोंडाला तोंड देवून काहीही उपयोग नाही म्हणून यांच्या नादि न लागणेच बरे असे समजून जर त्यांनी काही बोलले नाही तर या कौस्तुभ च्या पोटात का दुखत??

    हिंदुत्व हा शब्द उच्चारतांना आपण खरे किती हिंदुत्ववादि आहोत, आणि आपली खरी लायकी काय हे पाहून तरी बोलायला हवे होते.

    मला एक समजत नाही, की बाबासाहेब पुरंदरे काही बोलत नसले तर हिंदू धर्माचे कसे नुकसान होईल??

    हिंदू धर्म हा काय बाबासाहेब पुरंदरे चालवतात काय??

    माझा कौस्तुभ ला सल्ला आहे की जरा आभ्यास करून बोलले तर बरे होईल.

    किमान पुरंदरे यांना समाजात मान आहे आणि त्यांना इतिहासकार ही मानतात. हे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी आणि सन्माननीय आहे. मोठ मोठाले दिग्गज त्यांच्या अभ्यासू वृत्तीला जाणतात. तेंव्हा विचार करून बोलावे. ब्रिगेड सर्व काही बदलू पहात असली तर अस कितीस बदलू शकतील ??

    माझा एक लेख होता बाहेरचा मराठी म्हणून. इतर समूहांवर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आधी आपण मराठी बाणा समजून घेणे आवश्यक आहे, आणि त्या नन्तर बोललो तर मगच त्याला काही अर्थ प्राप्त होईल.

    माझ्या समुहात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. वाटल्यास तेथे येवून संबंधित विषयावर कोणीही चर्चा करावी. तसे झाले तर काही अर्थ तरी प्राप्त होईल. हिंदुत्वाचे वरपांगी सोंग घेवून हिंदुत्वाची वाट लावायचा कुणी प्रयत्न करीत असेल तर मात्र ते अवघड आहे. तेंव्हा सकारात्मक दृष्टी ठेवली तर सार काही साफ दिसेल.

    चर्चा करा पण भांडण नको. पण ते आमच्या कौस्तुभ महाराजांना पटायचे नाही.

    मला कौस्तुभ ला एक प्रश्न विचारावासा वाटतो, की हा स्वतःला शिवसैनिक म्हणवतो, पण दादोजी प्रकरणात तर स्वतः शिवसेना प्रमुख पुतळा हटविण्याच्या विरोधात होते. त्यावेळी शिवसेना आणि ब्रिगेड (राष्ट्रवादीचे पिल्लू) यांच्यात चांगली जुंपली पण होती. शिवाय शिवसेनाप्रमुख देखील पुरंदरे यांचा सन्मान करतात हे सर्वांना माहितीच आहे. पुरंदरे आणि बाळासाहेब यांची मते सारखीच आहे. मग असे असतांना जर कौस्तुभ पुरंदरे यांचा विरोध करून ब्रिगेड ला सपोर्ट करीत असेल तर मग हा कसला शिवसैनिक?? मग कौस्तुभ तू खरा शिवसैनिक कि ब्रिगेडी हे लोकांना सांगशील का?? तसा तुझा लेख वाचून तुझे मत न समजण्याइतके लोक मुर्ख नाहीतच, पण तरी तू यावर स्पस्ष्टीकरण द्याव अशी इच्छा व्यक्त करतो. हिम्मत असेल तर उत्तर दे.

    ReplyDelete