Tuesday, August 9, 2011

आरक्षण,नरके सर व वैभव छाया

आरक्षण चित्रपट.दिग्दर्शक-प्रकाश झा.

हा चित्रपट आरक्षणविरोधी आहे असे आपल्याला वाटते.त्यातले सोयीस्कर डायलोग(ते हि प्रोमोजेस मधले.पिक्चर तर पाहिलं नाही) तेवढे उचलेले.मग त्यात सैफ च्या तोंडी असलेला संवाद दिसला नाही का आपल्याला-"आपके खेत चलाये,-------- याह तक कि आपकी तत्ती भी साफ कि" मग हा संवाद दलितांच्या बाजूने नाही का?

मग आपण परस्पर आरक्षण विरोधी शिक्का मारून कसा बसलात. ?

मा. हरी नरके सर,

काल आपण वागळे ह्यांच्या पोस्टर का फाडली बर? ह्या प्रश्नाला बगल दिली.आणि बगल देताना इतकी हत्या अन तितके बलात्कार अस काही तरी सेन्सलेस बोलत होता.(हा मधल्या काळातील ब्रिगेडी सहवासाचा परिणाम नाही ना?)

त्यावर आपण खालील उत्तर देवू शकत होता.

१)आमची "उत्स्फूर्त" प्रतिक्रिया

२)आम्ही पोस्टर फाडली कोणाला मारले नाही किंवा सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान केलेले नाही.

आणि तिसरे जे अत्यंत प्रभावी ठरले असते

३)ज्याप्रमाणे मनुस्मृती दहन केली त्याच न्यायाने पोस्टर्स फाडली.

तसेच आपले युक्तिवाद घटनेतल अमुक कलम तमुक उप कलम वैगेरे योग्य होते.पण आपण चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे ते गैरलागू आहे.सेन्सोर बोर्ड च्या लोकांच्या पात्रते वरची शंका काही अंशी खरी वाटते पण तितक्या वरून ओरडा करणे योग्य नाही,कारण ह्या आधी पण बरेच वादग्रस्त विषय सेन्सोर ने हाताळले आहेत.आपले साधू यादव वैगेरे मुद्दे वैभव छाया च्या ब्लोग वरून घेतले होते त्यावर ४ ओळीत(जेवढ लेखाच महत्व तेवढीच प्रतिक्रिया) ह्या लेखाच्या शेवटी प्रतिक्रिया दिली आहे.

आपला मी फार आदर करतो.आपले ब्लोग्स व विविध लेख मी वाचत असतो.आपली ओबीसी समाजासाठी चाललेली धडपड पाहून समाधान वाटते.

मध्यंतरी आपण लिहिले होते कोणत्या संदर्भात होते ते बहुदा ब्रिगेडी लोकांबाबत होते-"विचारवंत हा स्वतंत्र असावा.त्याला एखाद्या नियम,धोरणात अडकून चालत नाही.हेच लिहा तेच लिहा अशी बंधने नकोत."

अशा आशयाच काहीतरी होत.

मग आपल्याला पण तीच विनंती आहे.लिहा लिहित राहा.पण एखाद्याच्या हाताचे बाहुले बनू नका.

मी आपल्याला भेटलो नसलो तरी आपल्या लिखाणातून बराच ओळखतो.खर तर काल आपल्याला पोस्टर फाडली हि गोष्ट मनापासून पटली न्हवती (हे आपल्या चेहरा, देहबोलीतून) हे कळत होते.पण त्या संघटनेचे उपाध्यक्ष नात्याने त्या गोष्टीला विरोध करता येत न्हवता.पहिल्यांदाच आपल्याला निरुत्तर पाहिलं.किंवा विषयांतर करताना पाहिलं.

आपण विचारवंत आहात,ओबीसी ना दिशा देणारे आहात आणि आम्हाला तसेच हवे आहात.उगाच राजकारणाचे गजकर्ण नको.

वैभव छाया

प्रकश झा चे आधीची चित्रपट,त्यातील पात्रांची नावे व त्यांच्या जाती,व लढवलेली निवडणूक ह्यांचा ओडून ताणून संबंध लावला आहे.हे बॉलीवूड आहे व इथे जे विकत तेच बनत.चित्रपट आधी आला व साधू यादव त्यात खलनायक असल्याने व प्रकश झा बिहारी असल्याने त्या पक्षाने(तो दलितांचा पक्ष आहे असे कळले) ह्याचा फायदा उठवायला तिकीट दिले असा पण अर्थ होऊ शकतो.पण आपण सोयीस्कर पहिले पिक्चर त्यात बदनामी मग निवडणूक असे लिहिले आहे.त्यांना निवडणूक लढवायची काय गरज? राज्य सभेत जावू शकत नाही का ते? उगाच आपल काहीतरी.

No comments:

Post a Comment