Sunday, July 24, 2011

सिंघम:परीक्षण-मराठीपण भावलं

सिंघम

कलाकार:अजय देवगण,काजल अग्रवाल,प्रकश राज आणि १६ मराठी कलाकार

संगीत:अजय अतुल

दिग्दर्शक-रोहित शेट्टी

My Ratings:***

रोहित शेट्टी चे विनोदी चित्रपट पाहिले होते.पण action सिनेमा कसा करतो हे बघायचं होत.अजय देवगण चा अपहरण नंतर चा हाच action चित्रपट आहे.(हल्ला बोल कोणाला कळला?) शिवाय अजय अतुल च पहिलाच हिंदी संगीत.(महेश मांजरेकर च्या पिक्चर ला पण होत.पण ते घरचेच आहेत.बाहेरच्या निर्मात्या सोबत हे त्याचं पहिलाच काम) शिवाय सोनाली कुलकर्णी,सचिन खेडेकर,पुष्कर जोग सारखे मराठी कलाकार ह्या मुळे उत्सुकता होती. वेगवेगळी तीन टोक एकत्र आली कि एकतर ते पिक्चर आपटत किंवा खूप हिट होत. पण मी चित्रपट कोणासाठी बघितला तर तो "प्रकश राज" साठी बघितला.wanted पासून मी त्याचा फ्यान झालो.

सिंघम चा उल्लेख मी चिंगम असा केला होता.पण तसा तो नाही.

हा चित्रपट टिपिकल बॉलीवूड पिक्चर ला थोडी सौथ त्रितमेंट देवून बनवला आहे.टिपिकल मसाला action पिक्चर.स्टोरी जुनीच आहे.एक पोलीस विरुद्ध ग्यांग्स्तर.पण अजय देवगण आणि प्रकश राज ह्यांनी उत्तम अभिनय आणि संवाद ह्यामुळे चित्रपट निदान एकदा बघण्यासारखा झाला आहे.प्रकश राज चा अभिनय आणि संवाद बोलण्याची पद्धत(डायलॉग डीलेवारी)वर मी फार फिदा आहे.त्याचा टायमिंग आहे शब्द्फेकीच.त्याने मजा येते.

सौथ स्टायल म्हणाल तर अजय देवगण प्रकश राज कडे जावून त्याला आव्हान देतो किंवा तो पोलीस स्टेशन मध्ये येवून त्याला बोलतो हे प्रसंग व त्यातील संवाद हे कितेक सौथ सिनेमात पाहिले आहेत.

शेवट चांगला झाला आहे.आणि त्यात जी विनोद निर्मिती आहे ती चक्क प्रकश राज कडून व्हिलन कडून झाली आहे.प्रकश राजच हे वेगळेपण आहे.एकाचवेळी राग येईल अशी काम आणि हास्याला येईल असे वाक्य हे त्यालाच जमू शकत.खंडणी मागायची त्याची पद्धत- सोलिड राग पण येतो आणि त्याची बोलण्याची ढब पाहून हसायला पण येते.

अजय अतुल च संगीत ठीक आहे.अगदी एक नंबर वैगेरे म्हणणार नाही.त्यांनी क्लब बेसड मुजिक(जे हल्ली सगळेच देतात) न देता सिनेमा बेस मुजिक दिल आहे.

सिंघम च मराठीपण भावलं

त्यात मराठी वाक्य-माझी सटकेल,आता माझी सटकली,आईच्या गावात.त्याने मजा आली.आजवर हिंदीतला मराठी माणूस म्हणजे कामवाली बाई आणि फार तर मंत्री-पोलीस ते हि भ्रष्ट हेच होत.(अपवाद असतीलही).एक दोन मराठी वाक्य त्यांच्या तोंडात घातली कि झाल.पण ह्या चित्रपटात तस नाही.मराठी वाक्य बर्यच पात्रांच्या तोंडी आहे.जसे आपण पंजाबी पिक्चर पाहून बरेच पंजाबी शब्द समजू लागलो तसे मराठी इतर लोकांना का कळणार नाही.हे लक्षात घेवून आजवर पंजाब दाखवताना जेवढी पंजाबी भाषा ह्या हिंदिवाल्यानी दाखवली तेवढीच मरठी ह्या चित्रपटात आहे.हि गोष्ट जास्त महत्वाची आहे असे मला वाटत.

अवधूत गुप्ते आणि गौतम राजाध्यक्ष ह्यांनी दाजीबा आणि विंचू चावला गाणी दिल्ली हरयाणा पंजाब मध्ये फुकट सीडी वाटून प्रसिद्ध केली.महेश मांजरेकर आणि आणि मधुर भांडारकर ह्यांनी बर्याच मराठी कलाकारांना हिंदीत इतर कलाकार म्हणून आणले.त्याचाच हे फळ आहे.ह्यात आईच्या गावात- सटकली सारखे मराठी शब्द असल्यामुळे काही कोणी गळे काढण्याची आवश्यकता नाही.इतर लोकांना समजेल अशीच हि भाषा आहे.(इतर लोकांना सदाशिव पेठी भाषा कळणार आहे का?)

पिक्चर टिपिकल बॉलीवूड -सौथ मिश्रण-अंग्री यंग म्यान स्टायल असला तरी ह्या चित्रपटाच्या माध्यामातून मराठीला हिंदीच्या मुख्य प्रवाहात मिळालेले स्थान हे मला जास्त महत्वाचे वाटते.

No comments:

Post a Comment