Thursday, July 28, 2011

दीप अमावस्या (aka गटारी)

आषाढ अमावस्या हल्ली गटारी म्हणून प्रसिद्ध झाली आहे.पण ह्याला खर तर दीप अमावस्या म्हणतात.ह्यादिवशी घरातील दीप -निरांजन-कलश-ताम्हण इत्यादी पूजेचे साहित्य धून- घासून-पुसून ठेवावे हे मुख्य काम त्या दिवशी असते.ह्या दिवशी दिव्याची पूजा करतात.
कारण श्रावण दुसर्या दिवसापासून चालू होणार असतो.व हा अत्यंत पवित्र धार्मिक महिना असतो.ह्या महिन्यात वेग वेगळी पूजा, व्रत वैकल्य,अभिषेक केले जातात.त्यामुळे ह्या सर्वासाठी जे पूजा साहित्य लागते ते पुन्हा जरा घासून पुसून लक्ख करणे हा त्यामागचा उद्देश असतो.
जसे अभिषेक पात्र म्हणा होम कुंड म्हणा हि काही रोजच्या पूजेतील वस्तू नाहीत.तर अशा गोष्टी काढून त्या साफ करून श्रावण महिन्यासाठी सज्ज करणे हा त्याचा उद्देश आहे.

ह्या दिवसाचा नैवेद्य

ह्या दिवशी माझ्या घरी उडदाचे वडे,खीर,पुरी,भाजी,भात,वरण असा नैवेद्य दाखवला जातो.
केळीच्या पानावर जेवण असत.गाईचे पण एक पान वेगळ काढल जात.हा नैवेद्य मला फार आवडतो.हा नैवेद्य बहुदा रात्रीच असतो.(नैवेद्य रात्रीच का? आमवस्या रात्रीच असते असे कारण कळले)बर्याच लोकंकडे ह्या दिवशी पुरणाचा नैवेद्य असतो.

तीर्थरूप ह्या दिवसाला गटारी संबोधून ह्या दिवसाचे धार्मिक महत्व कमी करणाऱ्या लोकांना दिवसातून ३-४ वेळा शिव्या हसडतात.त्यामुळे मित्रांबरोबर मी ह्या दिवशी गटारी साजरी करत नाही.आम्हाला नोन वेज खायचेच नसल्याने आम्हाला बारा महिने श्रावण.माझ्या घराण्यात २८ व्यक्तींपैकी मीच एकटा मासाहार करतो. मग खर्या श्रावणामुळे आमचे कुठे अडते? मग गटारी तरी कशाला?

त्यापेक्षा ह्या दिवसाचे धार्मिक महत्व ओळखून त्यानुसार वागणे बरे असे मला वाटते.आणि हे मला अलीकडे वाटू लागले आहे.लहान होतो तेव्हा कळतच न्हवते.कळू लागले तेव्हाच पिवू लागलो.(११ वीत) मग २-४ वर्ष गटारी म्हणून साजरी केली.पण आता नाही.खाणे पिणे श्रावणात पण चालूच असते.(समोरचा पाजत असेल तर) मग गटारी गटारी चा गळा काढत हा इवेन्ट साजरा का करू? कशाला करयचा?

No comments:

Post a Comment