Thursday, February 3, 2011

मी नथुराम गोडसे बोलतोय.


नथुराम गोडसे!

आज ह्या नाटकाला पुन्हा विरोध झाला.आज ह्या नाटकाचा गडकरी रंगायतन,ठाणे येथे प्रयोग होता.मुंब्र्याचे आमदार श्री,जितेंद्र आव्हाड व कार्यकर्ते ह्यांनी त्यास विरोध केला.पण प्रयोग झाला.
सुमारे ११ वर्षापूर्वी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे ह्यांनी ह्या नाटकाचे प्रयोग ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठेवले होते.त्यास तेव्हा ठाणे कोन्ग्रेस चे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर ह्यांनी विरोध केला होता.त्यांनी हा प्रयोग होऊ दिला नाही तसेच ह्या नाटकाची बस मुलुंड येथे जाळली होती.तेव्हापासून ह्या नाटकाचे ठाण्यात प्रयोग झाले नाहीत.

आज मात्र निदर्शन झुगारून प्रयोग झाले.ठाण्याची शिवसेना व जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे हे शिवसैनिकासाहित प्रयोगाच्या सुरक्षेकरिता हजर होते.त्यांनी हा प्रयोग होऊन दिला.
मी गेली १२ वर्ष हे प्रकार पाहतो आहे. कोन्ग्रेस व हल्ली राष्ट्रवादी ह्याला विरोध करीत आहे.आणि जे गोडसे ह्यांचे तत्वज्ञान अथवा तात्कालिक गांधी हत्येच्या (त्यांच्या भाषेत वधाची) कारणे आपल्या अनुयायी ला सांगतात ते इथे कुठेच दिसत नाही.मला वाटले एखादे पथक येईल संपूर्ण गणवेशात दंड घेवून आणि दंड कधीतरी प्रयोग करीन.असो.

आता आपण नाटकाच्या वाटचालीकडे वळूयात.ह्या नाटकाचे निर्माते उदय धुरत हे म्हणतात-"आम्हाला ह्या नाटकाला न्यायालयाने परवानगी दिली.आम्ही एकूण ६२८ प्रयोग केले.आज ६२९ व प्रयोग ठाण्यात करतोय.मग न्यायालय परवानगी देत असून ह्यांचा विरोध कळत नाही का आहे? नथूरामची भूमिका करणारे श्री शरद पोंक्षे पण हेच म्हणाले(कंसात त्यांना अभिप्रेत असेल अशी वाक्ये) -"एकीकडे गप्पा मारता अभिव्यक्ती स्वातंत्र्य.(फक्त मुस्लीम पुरते)मग आम्ही नथूरामची बाजू मांडली तर फरक काय पडतो? गांधी पण तेच म्हण्याचे माझा विरोध माझ्या समोर येवून करा.(समोर ये मग बघतो तुला?)"
पण काही म्हणा ह्या पोंक्षे ला मानायला हवे.मध्ये साम वर त्याची मुलाखत पहिली.तो बोलला कि मला फार धमक्या आल्या,दबाव आला पण मी प्रयोग केले आणि करणार.जर त्यांचा उद्देश रंगकर्मी म्हणून असेल नाटकवेडा व dediketan म्हणू असेल तर खरच सलाम.

जेव्हा शाळेत दोन पोर एकेमेकाला मारतात व मी त्यांची मारामारी सोडवतो तेव्हा मी दोघांना विचारतो -बाबानो काय झाल.अर्थात हा लहान पोरांचा प्रश्न आहे.तो मी त्यांचे एवढा होऊन solve करतो.समजूत घालतो.त्यांना बंधुत्व शिकवतो.जे माझे कर्तव्य आहे.पण मुख्य मुद्दा हा कि मी दोन्ही बाजू विचारात घेतो.(मग ती संधी नथुराम ला पण द्या कि.पुस्तकरूपाने त्यांच्या बंधूना दिलीये मग नाटकाला का विरोध? ह्यात राजकारण असू शकते.आहे)
एवढे प्रयोग राज्यभर होत होते तेव्हा आव्हाड हे राष्ट्रवादी युवक कोन्ग्रेस चे प्रदेशाध्यक्ष होते.मग त्यांनी राज्यात ठीक ठिकाणी जावून विरोध का केला नाही.मान्य आहे ठाण्यात त्यांची ताकद असेल जास्त पण एक संघटना जी सत्ताधारी पक्षाची अंगीकृत संघटना आहे तिचा वापर त्यांना इतर ठिकाणी का करता आला नाही?(त्यांना मेहेरबानी म्हणून पद दिलेले वास्तविक त्यांना कोणीच विचारत नाही,किंवा ठाण्यापुरता आपल्या मतदारसंघ पुरता ते विचार करतात)आम्ही पोरांना शिकवतो कि प्रभू रामचंद्र ,महाराणा प्रताप,शिवराय, हे राष्ट्राचे सुपुत्र मग अलीकडचे गांधी हे राष्ट्रपिता कसे? मग राष्ट्रपती काय प्रकार असतो?

माझे एक शिक्षक मित्र (स्वयं घोषित संघ प्रवक्ते) मला बोलले कि "नथुराम च्या केस चा अभ्यास अजून चालू आहे.कोणी घैसास गुरुजी म्हणून आहेत.व अजून दोन जण.(त्यापैकी एक ब्राम्हण नाही.हा आम्हाला टोमणा किंवा विश्वास बसावा म्हणून)हे त्याकाळातील कागदपत्रे तपासत आहेत.त्यात असे निष्पन्न झाले कि नथुराम ह्यांच्या केस मध्ये गांधी ह्यांच्या बोडीचा पंचानामाच झाला नाही.व दबाव आल्यामुळे तशीच केस पुढे चालू आहे.शिवाय ह्या घैसास ह्यांचे असेही म्हणणे आहे कि त्या खटल्याचे न्यायाधीश हे नथुराम ह्यांना भेटले व बोलले कि -"तू पंचनामा कोपी माग.आता ति उपलब्ध होणे शक्य नाही.लगेच सोडतो तांत्रिक करणावर निर्दोष." नथुराम ह्यास नाही म्हणाले.
तसेच नथुराम ह्यांना गांधी ह्यांचे पुत्र जे वकील होते ते भेटले व म्हणाले -"बापुजीना अहिंसा मान्य न्हवती व तुम्ही जरी त्यांचे मारेकरी असलात तरी तुम्हाला फाशी होऊ न देणे माझे कर्तव्य मानतो म्हणून तुमचे वकील पत्र घेतो.पण नथुराम ह्यांना ह्या गांधी काव्याची जाणीव झाली व अशाने आपण गांधी ह्यांना मोठे करू व आपली बाजू जगासमोर कधीच येणार नाही म्हणून त्यांनी हे नाकारलं.
(तार्किक दृष्ट्या योग्य.नायाधीश वैगेरे ह्या बधल सांगू शकत नाही.पंचनाम कोपी होती कि नाही ह्या बधल माहिती नाही.माहिती अधिअक्रत मिळेल असे वाट नाही.शिवाय १३ वर्षाने बंद सुनावणी चा तपशील खुला करायचा असतो तो हि केलेलं नाही.)

नथुराम हे दाउद,छोटा शकील,छोटा राजन,अरुणभाई गवळी(ड्याडी) ,नाईक बंधू ,थापा, ग्यांग चे सुपारी किलर न्हवते.शिकलेले मध्यमवर्गीय होते.पत्रकार होते.सावरकरांच्या आदेशावरून हैद्राबाद स्टेट मधल्या निदर्शनात सहभागी होते.स्वातंत्र्यसैनिक होते.
त्यामुळे त्यांच्या ह्या कृत्याला आजच्या "दिली सुपारी वाजवली गेम" ह्या पेक्षा निश्चितपणे वेगळे परिणाम असावेत ह्यात तथ्य आहे. ते समोर यायलाच हवे.
गोपाल गोडसे ह्यांची ह्यावरची दोन्ही पुस्तकें मी वाचली.मी सदाशिव पेठ,कुमठेकर रोड,पुणे ह्या गोपाल गोडसे ह्यांच्या राहत्या घरी मी त्यांना भेटलो देखील आहे.त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे जास्त बोलणे चर्चा झाली नाही.नथुराम ह्यांच्या अस्ठीचे पण मी दर्शन घेतले आहे.
( ५५ कोटींचे बळी व गांधी हत्या आणि मी.त्यात समकालीन पुरावे देत त्यांनी भाष्य केल आहे.शिवाय आता ति पिढी नाही तेव्हा होती पण तेव्हा कोन्ग्रेस सत्ता असून ते खोड्याला कोणी आले नाही.त्यामुळे त्या पुस्तकावर आधारित जर नाटक असेल तर त्यात गैर ते काय?कि कोन्ग्रेस ने लालभाई व समाजवादी लोकांची एकजूट फोड्याला मुद्दामहून ह्या प्रवृतीना खतपाणी घातले?)

माझा अनुभव म्हणून सांगतो -एखादी गोष्ट जर झाकल तर तिची उत्सुकता वाढते.त्यामुळे ती ओपन करा.काय म्हणतात ते आय टी वाले freeware ते करा.

No comments:

Post a Comment