अलका पुणेवार निमित्ताने
हि
बाई अभिनेत्री म्हणून मला तरी माहिती न्हवती. गदर वैगेरे चित्रपटात
छोट्याशा भूमिका व स्टेज शोज करते अस हे प्रकरण झाल्यावर समजल. ह्या बाईंच
आधी एक लग्न झाल . पहिल्या पतीपासून त्यांना एक मुलगी(वय २१ काही वृत्त
पत्रानुसार २५ ) आहे व ती विवाहित आहे. त्यांनी दुसरे लग्न हवाई दलातील
माजी अधिकारी संजय पुणेवार ह्यांच्याशी केल. त्यांच्यापासून त्यांना दोन
जुळी मुल आहेत.अलका बाईंचे वय महाराष्ट्र टाईम्स नुसार ४७ व इतर
वृत्तपत्रानुसार ४४ आहे. त्यांच्या प्रियकराचे वय महाराष्ट्र टाईम्स नुसार
२७ व इतर वृत्तपत्रानुसार २३ आहे.
माझ्या मनात दोन प्रश्न आले.
हि बाई म्हणते कि मला माझ्या नवऱ्याचा त्रास होता.त्याचेही एका मुलीशी
संबंध होते. मी फार त्रासले होते. अलोक नसता तर मी माझ्या जीवाच बर वाईट
केल असत. पण माझ्या मुलांना माझ्या वागण्याचा त्रास होऊ नये व त्यांनी
वडिलांची दुसरी बायको accept करायची असेल
तर मी मेले अस त्यांना समजायला हव,म्हणून मी आत्महत्येचा बनाव रचला.अस हि
कबूल करतीये तर त्यांना सोडलं का ? त्यांनी स्वतःच स्वताच्या अपघाताचा
बनाव रचला. आणि त्यांच्यामुळे पोलिसांचा वेळ वाया गेला. नवी मुंबईतील
संध्या सिंह प्रमाणे तर हे प्रकरण नसेल ना अशी शक्यता वाटून पोलिसांनी
जीवतोड मेहनत घेतली. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग व कट रचणे आणि फसवणूक असे
आरोप त्यांच्यावर का लावले नाहीत ? त्यांना सोडून का दिले?

दुसर अस कि दोन दोन लग्न होऊन पुन्हा तिसरे. तेही इतक्या लहान तरुणाशी. तो
अलोक पालीवाल चांगला इंजिनियर आहे. मूळचा बंगलोरचा आहे व त्याचे वडील
नामांकित सर्जन आहेत. एक भाऊ परदेशात तर एक मुंबईत स्थायिक आहे. त्याने
हिच्यात काय बघितलं ? मला वाटल अभिनेत्री म्हणजे फार सुंदर असेल तर तेही
नाही. तसेच हि बाई अलोकच्या आई वडिलांना भेटली. त्यांना स्वतःच नाव निकिता
मिश्रा सांगितलं. तसेच माझे आईवडील अपघातात गेले व त्यात माझा चेहरा खराब
झाला. तुम्ही सर्जन आहात तर माझी प्लास्टिक सर्जरी करून द्या. सगळाच झोल.
नक्की काय म्हण्याच ?इतक्या जास्त वयाच्या महिलेशी लग्न करून त्याला नक्की
काय सुख मिळणार आहे ? ती फार काही सुंदर नाही कि श्रीमंत नाही. तिने ह्या
पोराला नादाला लावलं कि तोच हिच्या प्रेमात पडला ?पण मग प्रेमात
पडण्यासारखे तिच्यात काय आहे ?
आणि समजा अलका पुणेवार
ऐवजी तिच्या वयाचा माणूस असता तर ? तर मात्र मिडिया आणि महिला संघटनानी
त्यांना फाडून खाल्ल असत. आता कुठे गेली ती टीनपाट महिला आघाडी ?कुठे गेला
तो महिला आयोग ?
No comments:
Post a Comment