Tuesday, December 14, 2010

लाल महाल,ब्रिगेड व दादोजी


सध्याचा लाल महाल ही मूळ वास्तु नाही
ब्रिगेडी लेखक कोकाटे म्हणाला,“लाल महाल पुरात्त्वखात्याकडे असला पाहीजे. तो पालीकेच्या अधिकारात का ?”
ब्रिगेडी कोळसे-पाटील म्हणाला, “२००२ मध्ये लाल महालात दादोजी कोंडदेवचा पुतळा बसवला आणि २००४ मध्ये जेम्स लेनने वादग्रस्त पुस्तक लिहीले. या दोन्ही ठरवून केलेल्या गोष्टी आहेत.”

लाल महालाची थोडक्यात माहिती – या वाडयाची जागा झांब्रे पाटीलकडून विकत घेतली होती आणि त्यावर लाल महाल हा वाडा बांधण्यात आला होता. त्याचा पाया ५२ ½' x ८२ ½' या व्यासाचा होता आणि उंची ३० ½' होती. त्यास १३ ½' खोलीची तळघरे होती. १६४६-४७ मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांची राजधानी राजगडला हलवली आणि लालमहालाचा उपयोग प्रशासकीय कामासाठी होऊ लागला. इ.स.१६८९ ते इ.स.१७०७ या धामधूमीच्या काळात लाल महालाची अगदी दुर्दशा झाली. मोडकळीस आलेल्या लाल महालाची १७३४-३५ मध्ये डागडूजी करून थोरल्या बाजीरावांनी तो राणोजी शिंदेंना आणि रामचंद्रपंतांना रहायला दिला.

राणोजी शिंदे गेल्यानंतर लाल महालाचा उपयोग गोदाम म्हणुन झाला. त्याला लोकांनी अंबरखाना या नावाने पुकारण्यास सुरुवात केली होती. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी तो पुर्ण उध्वस्त करून त्याची लाकडं व दगडी ` ३१५ ला विकली. या लाल महालाच्या प्रांगणात एक विहीर होती. दोन करंजे होते. इ.स.१९२५ मध्ये जिजामाता उद्यान बांधण्यात आले. आज जिथे हे जिजामाता उद्यान आहे तिथेच हा वाडा होता. दुर्दैवाने तो कसा दिसत होतो, त्याची रचना कशी होती या बाबत कुणालाच माहिती नाही.



१९५० मध्ये पुणे महानगरपालीकेने पुण्याचा सांस्कृतीक वारसा जपण्याचे ठरविले. त्यापैकी पुन्हा लाल महालाच्या प्रतीकृतीची उभारणी हा उपक्रम १९८४ मध्ये हाती घेतला. ही वास्तु इ.स.१९८८ बांधून पुर्ण तयार झाली. सोन्याच्या नांगरच्या प्रकरणामुळे लाल महालला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. म्हणुन त्या प्रसंगाला धरून बाळशिवबाची ब्राँझची प्रतिमा तयार केली. त्याच बरोबर नजर ठेवून देखरेख करणार्‍या राजमाता जिजाबाईसाहेब तसेच प्रशासकीय आणि शिवबाच्या प्रशिक्षणाची बाजू संभाळणारे दादोजी कोंडदेव लाल महालाशी निगडीत असल्या कारणाने त्यांचेही पुतळे उभारले.
२००४ मध्ये दादोजींचा पुतळा उभारला गेला हा कोळसे-पाटलाचा कपोलकल्पीत आरोप बिनबूडाचा आहे. हा मूळ लाल महाल नसल्याने पुरातत्त्वखात्याचा या वर काहीच अधिकार नाही. ती पालीकेची मालमत्ता आहे. स्वत:ला इतिहास लेखक म्हणुन प्रसिद्धी मिळवू पाहणार्‍या कोकाटयाला एवढेसुद्धा माहीत नाही ?

ब्रिगेडी आक्षेप व माझे मत.


तिथे दादोजी ह्यांचा पुतळा का?शहाजी राजांनी जिजाऊ बरोबर शिवरायांच्या शिक्षणासाठी विविध विषयात निपुण बरेच लोक दिले होते.(उत्तर:असतील.देणारच कि)
.मग दादोजी गुरु होते असे भट का ओरडतात? शिवाय सरकारने जी समिती ह्या प्रश्नी स्थापन केली होती तिने देखील दादोजी गुरु नाहीत असे म्हणाले व दादोजी ह्यांच्या नावाचा प्रशिक्षक पुरस्कार देखील मागे घेतला.त्या समिती मध्ये पण पुरंदरे आले नाहीत.
(उत्तर:इतिहास हा पूर्णपणे उलगडला जातोच असे नाही.बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी कोणत्या काळात चरित्र लिहिले व आता काय साल चालू आहे? इतक्या वर्षात नवीन उत्खनन झाले असेल तसेच नवीन कागद पत्रे हाती लागली असतील.असो.पण काही असो दादोजी हे पुण्याचे कारभारी होते ह्यात दुमत नसावे त्यामुळे सोन्यचा नांगर फिरवला त्यावेळी ते तिथे उपस्थित असणारच कि.मग सध्याच्या पुतळ्याला नावे द्या व वाद संपवा)

No comments:

Post a Comment