Monday, April 19, 2010

सम्राट अकबर थोर नव्हताच......!!!

सम्राट अकबर थोर नव्हताच......!!!

अकबराने "दिन-ए-इलाही" नावाचा धर्म स्थापन केला।धादांत खोटे, कारण हा "धर्मही" इस्लामचेच एक लघूरूप असल्याचे आपल्या लक्षात यायला कदाचित काहिसा वेळ लागेल. "दीन" म्हणजे धम्र आणि "इलाही" म्हणजे "अल्लाचा". असे असताना अकबराने हिंदू-मुस्लिम धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून एक नवा धर्म स्थापन केला, हे विधान शंकास्पदच आहे. धम्र स्थापन करणे म्हणजे काहि गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यासारखे सोपे नव्हे.कारण धर्म म्हटला की, त्याला त्याचे धर्मग्रंथ असतात, तर "दीन-ए-इलाही" चे असे कोणते धर्मग्रंथ आहेत याची माहीती इतिहास देतो?त्याचबरोबर प्रत्येक धर्मात मोक्षप्राप्ती,ईश्वर प्राप्ती यांच्यासारख्या काही व्याख्या असतात तसे "दीन-ए-इलाही" बाबत काय आहे?जर हा धर्म अकबराने स्थापन केला असे म्हटले तर "अकबर स्वतःला पैगंबरापेक्षाही श्रेष्ठ समजत होता" असा निष्कर्ष आपण काढावा काय? तेही खरेच आहे, कारण "सम्राट" म्हणवून घेणार्‍या अकबरला ग ची बाधा होणे स्वाभाविक आहे आणि याच ईर्षेपोटी त्याने असा धर्म स्थापन करण्याचा घाट घलण्याचा उपद्व्याप केला असणार हे निश्चित. पण तोही इस्लामचाच एक भाग होता हे विसरून चालणार नाही.शिवाय त्याने असा धर्म स्थापन केलाच असे थोडा वेळ मान्य केले तर त्याच्या प्रार्थनास्थळाबद्दल किंवा मंदीराबाबत कोणती माहीती मिळते? असे काहीच "दीन-ए-इलाही" बाबत आढळत नाही.शिवाय आपला धर्म वेगळा आहे असे म्हणणारी व्यक्ती म्हणजे धर्मसंस्थापक नसून धर्मविच्छेदक असते, हे आपण ध्यानात घ्यायला हवे. आजीबाईंचे सोवळे वा देवघराचे पावित्र्य भंग करीत देवघरात खुशाल जोडे घालून वावरणार्‍या तरूण जसा "मी तुमचा धर्म मानीत नाही", असे खुशाल वर्तन करतो तसेच अकबराने केले.संदर्भासाठी वाचावे व्हिंसेंट स्मिथ लिखित Akabar the Great Mughal.
पोर्तुगीज पाद्र्यांचा जो गट अकबराच्या दरबारी काही वर्षे वास्तव्य करून होता, त्यातील मॉंसेरॉट नावाचा पाद्री म्हणतो,"आम्हाला पाचारण करण्यात अकबरास काही अध्यात्मिक उत्कंठा असावी ही आमची अपेक्षा फ़ोल ठरली,उलट आध्यात्मिक उत्कंठा नष्ट करण्याचाच हा त्याचा नवा उपद्व्याप होता आम्हाला दिसून आले।"जर अकबराने सर्वधर्मसहिष्णूता मानली असे म्हटले तर स्मिथने त्याच्या पृष्ठ १२५ वर लिहिले आहे" इसाई पाद्र्यांनी अकबरास जी बायबलची प्रत भेट म्हणून दिली होती, ती त्याने परत केली."स्मिथ लिहितो (पृष्ठ १६०) "अकबराचा तथाकथित "दीन-ए-इलाहि" धर्म म्हणजे एक राजकारणी सोंग होते.कमालीचा अहंभाव व बेलगामी वागणे हेच त्याचे के नाव होते."अकबर हा मोंगल सुलतान होता. मोंगल साम्राज्याचा जो जो दास होणार नाही त्याचा समूळ नाश करण्याचा त्याने घाट घातला होता, मग तो मुस्लिम सुद्धा का असेना. आत सारे मुसलमान काही मोंगल नव्हते.उलट अफ़गाण आणि तुर्क सुलतानांच्या शाह्याच विनाशून अकबराने मोंगलशाही चालविली. त्यामुळे इतर सुलतान त्याचा द्वेश करीत.म्हणजे हिंदू धर्माच्या विरुद्धच नव्हे तर स्वतःच्या मोंगल बाद्शाहीकरिता इतर कोणत्याही वैयक्तिक महत्वाकांक्षेप्रमाणे लढत होता, राज्य वाढवित होता. अर्थात तो मुस्लिमांनाही समानतेने वागवित नव्हत तर त्यांची राज्येही तुडवित होता,बुडवित होता. केवळ स्वतःची बादशाही टिकावी या एकाच हेतूने त्याने हिंदूंवर "जिझिया" सारखे जाचक कर लादले नाहीत किंवा सशस्त्र लाखो हिंदूंना सरसकट मुसलमान करण्याची मोहीमही आखली नाही.हिंदू-मुस्लिमांना समानतेने वागवावे हा त्याचा उद्देश मुळीच नव्हता.पण, हिंदूंवर असे प्रत्यक्ष धार्मिक अत्याचार जेव्हा जेव्हा आधीच्या मुस्लिम सुलतानांनी केले तेव्हा तेव्हा त्याचे झालेले भयंकर परीणाम त्याच्या डोळ्यासमोर होते.तशा प्रपीडक नि धर्मांध सुलतानशाह्याच केव्हा केव्हा हिंदूंच्या असंतोषाच्या आगीत भस्मसात झाल्या होत्या.(उदा- मुबारक खानाचा खून करून पूर्वाश्रमीचा हिंदू असलेला खुश्रुखानाने सत्त हस्तगत करून हिंदू सत स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता.) त्यामुळेच स्वतःची बादशाही टिकावी या एकाच हेतूने अकबराने जिझिया सारखे कर न लादता औरंगजेबापेक्षा कित्येक पटीने सौम्यपणे व्यवहार केला. याचा अर्थ हिंदूंना आदर देणे हा त्याचा उद्देश मुळीच नव्हता किंवा एकात्मतेच्या वा समतेच्या भावनेने मुळीच नव्हे.

पण सत्तास्थापनेत स्वतः सर्वसत्ताधीश, सम्राट, अगदी अरेरावी झाल्यानंतर अकबराची दुर्दम्य महत्वाकांक्षा त्याच्या पलिकडे धाव घेऊ लागली होती।लोकांचा सम्राट झालो, याचा अर्थ यांचा पारलौकीक मीच आहे, जगाचा पैगंबरही मीच झालो आहे, अशा थाटात त्याने "दीन-ए-इलाही" चा घाट घातला. जे त्याला आधीच्या सुलतानांप्रमाणे हिंदूंना छळाच्या बळावर धर्मांतरीत करणे जमले नाही,ती राक्षसी महत्वाकांक्षा त्याने या अशा प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, तलवारीच्या बळावर नव्हे तर "दीन-ए-इलाही" द्वारे हिंदू धर्माला एक प्रकारे ग्रहण लावण्याचाच त्याचा प्रयत्न होता. कारण इतिहासातील सर्व लढाया या फ़क्त तलवारीच्याच बळावर लढल्या गेल्या नाहीत.त्यामागे कूटनितिचाही समावेशही होता.कारण, या धर्माचा मुख्य पैगंबर हा "अकबर" हाच मानावा लागे. नुसते "जयगोपाळ" सोडाच,पण नमस्कार म्हणूनही भागत नसे, तर त्या अकबरी धर्मात गेलेल्या हिंदूंना प्रथम वंदनेतच "अल्ला हो अकबर"च म्हणावे लागे. त्या धर्माची भाषाही पर्शियन होती जिचा मागमूसही हिंदुस्तानच्या संस्कृतीत दिसत नाही. जेणेकरून अकबराची सत्ता हे एकप्रकारे परचक्रच होते.एकंदरीत इतके सांगणे पुरेसे आहे की,अकबराची, मनुष्यजातीचा पारलौकीक सम्राट बनण्याची ही सवाई शेख महंमदी महत्वाकांक्षाही पार धुळीला मिळाली.कारन, त्याच्या या नव्या धर्मात आधी कोणी फ़ारसे हिंदू-मुसलमान गेलेच नाहीत.दुसरे प्रमाण म्हणजे आपण हिंदू,पारशी,ख्रिश्चन यासारख्या धर्मियांची नावे अर्हात त्या त्या धर्माच्या अनुयायांची नावे सांगू शकतो, तसे "दीन-ए-इलाही" च्या किती अनुयायांची नावे इतिहास देतो?कारण जरी या धर्माचे अनुयायी खोदून खोदून बळजबरीने शोधलेच तरी त्यांनी अकबराने स्थापन केलेल्या धर्मात जबरदस्तीने धर्मांतरीत केले गेले होते. कारण अकबराच्या मृत्यूनंतर त्याच्या धर्माचे हेच अनुयायी काळाबरोबरच कुठच्या कुठे इतिहासात बेपत्ता झाले हे त्या पैगंबरालाच माहीत.---संदर्भ (सावरकर लिखित "भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने--- पृष्ठ ३५६-३५७)

ऑरकुट वरील "आजचा दिनविशेष" कमुनिटी चे मालक ह्यांच्या लेखावारून साभार.

No comments:

Post a Comment