Sunday, January 3, 2016

बाजीराव मस्तानी! माध्यमांतर करताना बदल आवश्यक आहे.

बाजीराव मस्तानी! माध्यमांतर करताना बदल आवश्यक आहे.

बाजीराव मस्तानी बघितला. त्यावर ज्या कारणासाठी टीका झाली ती योग्यच होती. पण ह्या निमित्ताने श्रीमंत बाजीराव पेशवे जगभर पोहोचले. आपण मराठे लुटारू न्हवतो हे आम्ही सोशल मिडीयावर (इतिहास आधारित परप्रांतीय ग्रुप) वर सांगून सांगून थकलो. ते काम ह्या एका चित्रपटाने केले. ह्या अशा संमिश्र प्रतिक्रिया आपण वाचल्याच असतील. पण माझा विषय तो नाही तर माध्यमांतर आहे.

बखर आणि कादंबरीत फरक आहे हे मान्य करता ना तुम्ही ? exactly हेच केल आहे त्या चित्रपटात. बखर आणि पत्रव्यवहार ह्यावरून कादंबरीकार कादंबरी रंगवतो. जर कादंबरी लेखकांच स्वातंत्र्य तत्कालीन पिढीने मान्य केल नसत तर आज किती लोकांना मराठ्यांचा इतिहास समजला असता? किती लोकांनी मुद्दाम जाऊन बखरी आणि ऐतिहासिक पत्रव्यवहार अथवा अन्य साधने अभ्यासून ती लक्षात ठेऊन आपले महापुरुष समजून घेतले असते? तोच प्रकार चित्रपट माध्यमात रुपांतर करताना जर दिग्दर्शकाने केला तर त्याला ते एका मर्यादेत करू द्या. बाजीरावांना व काशीबाईंना गाण म्हणताना- नाचताना दाखवण हे चुकीचे आहे. पण हे दाखवत असताना ह्या चित्रपटात बाजीरावांच्या शौर्याला कुठेही धक्का लागला नाहीये. आता समजा त्यांना पराभूत नायक दाखवले असते तर विरोध करण्यास वाव आहे. पण तसे काहीही चित्रपटात नाहीये बाजीराव एक योद्धा ते एक प्रियकर हा प्रवास पटकथा अलगद करते. उगाच हा प्रसंग घुसडला आहे अस चित्रपट पाहताना कुठेही वाटत नाही.

आता ह्या चित्रपटातून लोकांचे कुतूहल निश्चित जागृत झाले आहे. ते वाचू लागतील,नेट वर सर्च करू लागतील. तसेच व्यावसायिक यश मराठ्यांचा इतिहासावरील चित्रपटास मिळते हे लक्षात आल्याने आपल्या इतिहासातील अन्य महापुरुषांवर देखील चित्रपट भविष्यात येतील अशी आशा आहे. ह्यास मराठ्यांचा इतिहासाचा एक प्रकारे विजयच म्हणावा लागेल.

Sunday, September 28, 2014

हम तुम: माझी खरी प्रेमकहाणी

हम तुम 

सन  १९९९ मधील १३ जून.महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ. ८ वीच्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. ८ वी तुकडी जे. अख्या शाळेतला हुशार वर्ग.साधारण सर्व जण निदान ७५ % च्या वरील गुणांचे. एक एक जण जरासा बिचकतच वर्गात येत होता. कारण ७ वीतील सर्व तुकड्यातील हुशार मुल व अन्य शाळा ज्या ७ वी पर्यंत आहेत त्यातील टोपर्स हे ह्य तुकडीत असतात. 
२ लाख लोकसंखेच्या  अख्या अंबरनाथ शहरातील त्यावर्षीची बेस्ट ऑफ दि बेस्ट मुल त्या तुकडीत हि त्या तुकडीची प्रसिद्धी.  

मी आणि माझे दोन शार्प शुटर(आमच्यात खास मित्राला अस म्हणतात) आम्ही एरियातून एकत्र धमाल करत चाललो होतो. मागच्या वर्षी एवढे राडे  करून पण आम्ही ७५ ते ८५ ची बालवाडी पासूनची मार्कांची रेंज सोडली न्हवती,व हुशार अशा जे तुकडीत -ज्यात संपूर्ण संस्कृत विषय मिळतो व जिथे शाळेतले तज्ञ-अनुभवी शिक्षक असतात तिथे आपण आहोत ह्याचा आनंद झाला होताच. त्यापेक्षा गेल्या वर्षी काय काय लफडी केली ह्याची उजळणी चालू होती. आम्ही शाळेत पोहोचलो. वर्ग माहितीच होता  सवयीनुसार आपल्या आकारमानाला सोयीस्कर बेंच निवडून तिथे दफ्तर ठेवले. दोन चार ओळखीचे मित्र काही आमच्याच शाळेतले तर काही अन्य शाळातले होते.त्यांना पण व आम्हाला हि त्यांना बघून आनंद झाला. आणि मग सवयीनुसार ह्या वर्षी "सिझन" कसा आहे हे उजवीकडे  बघू लागलो. 

एकाध दोन सेकंदात तिघांच्या थोबाडावर निराशेचे भाव आले.कारण बर्याच मुली ह्या आधीच्या वर्षी होत्या त्याच होत्या. "सुंदर मुली हुशार नसतात" असे मी पुटपुटलो.मग दोघांनी पण मला सहमती दर्शवत एकमेकांचे सांत्वन केल. मग हळू हळू नेहमीची भंकस सुरु झाली. मध्येच दरवाजाकडे लक्ष होतेच.आता येणाऱ्या मुला मुलींवर कमेंट्स चालू होत्याच. अस करत करत घंटेची वेळ झाली. तेवढ्यात एक उंच मुलगी आता आली. ह्या दोघांनी नुसतीच उंच वाढलीये वैगेरे कमेंट्स  केल्या. ती आमच्या शेजारच्या रांगेतच नेमकी आली. पण मी मात्र मान वर(मी बसलो होतो ना बेंच वर) करून ती जागेवर बसेस्तोवार पाहत राहिलो.

आता मी काही मोठा कथालेखक नसल्याने शाळेतली वर्ष थोडक्यात पुढे नेतो. पहिल्याच दिवशी तीच नाव समजल. खरी कथा व अजूनही माझ्या आयुष्यात सुरु असल्याने तनू एवढेच देतो. खर तर तिच्या बाबत मी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेऊन आहे.अगदी वेळ, तारीख इतकाच काय  कुठे भेटलो व तिचा कोणत्या रंगाचा ड्रेस होता हे सगळ. 

पहिले वर्ष काही विशेष घडल नाही.थोडं फार बोलण व्हयच पण मी बर्याचदा नुसता बघायचो,तिच्या नकळत पाहायचो. एव्हाना तिला "जिराफ" हे नाव पडलं होत.तिच्या उंचीमुळे आहेच ती उंच माझ्याहून दोन इंच उंच.आमचा जो ग्रुप जमला त्यात मी व ती दोघे हि होतो.पण मी ८ वीत तर कधीच तिच्याशी फारस बोललो नाही.तिला कवितेचा छंद होता. दिवाळी सुट्टी नंतर शाळा सुरु झाली तेव्हा तिने कवितेची वही आणली.ती मात्र मी वाचून फार फार तारीफ केली होती.

अस करत करत ८ वीचे वर्ष संपले.९ वीचे पण अर्धे झाले.पण ९ वीत प्रश्न मंजुषा स्पर्धेत मी होतो. आम्ही जिंकलो.आमच्या ग्रुप चे आम्ही ३  घे हि होतो.मी अजिंक्य व गौरी. पहिली फेरी हि आपल्या इयत्तेशी होती.मग त्यातून ते जिंकतील ते अंतिम फेरीत. कुणालाच माझा काहीच भरवसा न्हवता.कारण मी व माझी राडेबाज मस्तीखोर इमेज.पण वर्ग शिक्षिका आमच्या मातोश्रींच्या खास मैत्रीण.मातोश्रींच्या ग्रंथालयात त्याही यायच्या.मी काय काय वाचतो हे त्यांना त्यामुळे माहिती होत. मी वर वर कसाही वाटत  असलो तरी त्या स्पर्धेला फिट आहे हे त्यांना माहिती होत. अजिंक्य हा केवळ पहिला नंबर येतो म्हणून ह्यात होता.आणि अजून एक मुलगी गौरी हि अशाच एका बाहेरच्या स्पर्धेत गेल्यावर्षी २ री आली म्हणून होती. आम्ही आमच्या इयत्तेत तर जिंकलोच पण अंतिम फेरीत दहावी ला हि हरवले. 

त्यानंतर मात्र तिचा व अन्य काही वर्गातल्या मित्र मैत्रिणीचा माझ्यकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.कारण इतिहास हा प्रकार मी निवडला व सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली व चांगल्या ७० गुणाने आम्ही दहावीला हरवले. पण तरीही फारस बोलण अस नाहीच.एकदम फोर्मल बोलण कधी  दसर्याला सोन दे,संक्रांतिला तिळगुळ दे वैगेरे 
  
सन २००१. दहावी आली अभ्यासात गेली.पुन्हा प्रश्नमंजुषा एकहाती जिंकून मी माझी  ओळख अजून पक्की केली मग अकरावी मध्ये मी त्याच शाळेत सायन्स ला गेलो तर ती कॉमर्स ला.तेव्हा मात्र बोलण जरा जास्त होऊ लागल. कधी कधी कोलेज सुटल्यावर थांबून कट्यावर गप्पा होऊ लागल्या.पण खास तिच्याशी बोलण्यासाठी वैगेरे कधी थांबलो नाही कि बोलावलं नाही.गप्पा व्हायच्या त्या इतरांच्या समोरच.इतरांशी बोलताना व्हायच्या तेवढ्याच  

सन २००४.

मी पहिल्यांदा हरलो होतो.बारावी नापास. बरोबरीचे सगळे पुढे निघून गेले. आता कसे विषय सोडवायचे ह्याचा विचार तर होताच पण आता तनू माझ्या सोबत न्हवती.गेली ५ वर्ष १९९९ ते २००४ मी तिला बघून काढली होती. मी काही तिच्याशी  फार बोलयचो हि नाही किंवा आमची मैत्री होती अस हि म्हणता येणार नाही.७-८ जणांच्या ग्रुप मधला मी एक.माझे मन मी कधीच कुणासमोर मोकळे केले नाही.जे माझे दोन खास मित्र होते त्यांच्यापाशीही नाही. त्यामुळे  तिला मी काही असा विचार करतो ह्याची पुसटशीही कल्पना न्हवती. 

ह्याची दोन कारण होती.एकतर तिच्या नावाने मला चिडवण चालू झाल असत. शिवाय तिला हे समजल असत.आणि उगाच कुणी चिडवणार नाही मीच काहीतरी बोललो असल्याशिवाय इतर जन चिडवणार नाही अस तिला वाटण्याची शक्यता होती.आणि दुसर अस कि ती तेव्हा म्हणजे शाळेत असताना सुंदर अशी न्हवती.त्या वयात मुलांची साधारणपणे सुंदर मुलगी ही जी व्याख्या असते त्यात बसणारी ती न्हवती.नुसतीच उंची वाढली होती त्यामुळेच तिला जिराफ हे नाव उंचीमुळे पडले.तुलनेत मी आजच्या पेक्षा  त्याकाळी बरा दिसत होतो.म्हणून जरी मी माझी भावना मित्रात बोलून दाखवली असती तर त्यांनी मला मुर्खात काढाल असत.ही पण भीती होती.स्वतः च्या इमेज ची भीती.
    
 तिला पाहण,तीच माझ्या आजू बाजूला असण हे मला फार आवड्याच. मनाला फार बर वाटायचं. ती आली नाही तर मी सैर भैर  व्हायचो. का आली नसेल? एक तर ती अशक्तच.वजन कमी नुसतीच उंच. अकरावीत ती कॉमर्स ला गेली तरी मी सकाळी व मधल्या सुट्टीत न चुकता तिच्या वर्गापाशी जाऊन बर्याचदा तिच्या वर्गातल्या अन्य मित्रांशी व कधी कधीच तिच्याशी बोलायचो. मी घाबरत होतो अस नाही.पण माझ्या बोलण्यातून तिला माझ्या मनात काय चालू आहे हे समजेल कि काय अशी भीती होती.व समजल तर हे जे थोड फार बोलन होतंय तेही जायचं अशी मला भीती होती. मी योग्य वेळी सांगणार होतोच.माझ्या मते ती वेळ म्हणजे १२ वी नंतर.कारण जेव्हा आयुष्याची एक दिशा नक्की झालेली असते. तेव्हा तुमच्या प्रेम भावनेचा समोरचा जरा तरी विचार करतो.शाळेत जर हे करयला गेल तर समजून घेण दूर पण उलट तक्रार व्हायची भीती व कायमचे संबंध तुटणे हे धोके होते.पण मला तिला मिळवायचं होत आणि त्यासाठी मी इतकी वर्ष गप्प होतो.योग्य वेळेची वाट पाहत होतो. अशा प्रकारे माझ्यातला राजकारण्याने माझ्यातील प्रेमवीरावर बंधन घातलं होत. 
(माझ हे राजकरण योग्यच होत.ते पुढे येईलच.)  

पण आता कसलं काय? मी फेल.ती १२ वी पास. तसेही कॉलेज वेगळेच असले असते.पण कधी तरी जाऊन भेटता आले असते.पण आता फेल झाल्यावर कोणत्या तोंडाने जाणार? शिवाय मी इस्ट ला राहायचो ती वेस्टला.येत जाताना भेट होईल अशी पण शक्यता नाही.एकवेळेस आम्ही इस्ट वाले वेस्ट ला जायचो.कारण त्या भागात बाजारपेठ,नगरपरिषद व अन्य कार्यालये.पण ती कशाला इस्टला यायला?  मी तिचा विचार सोडून दिला. दरम्यान मला नवीन ग्रुप मिळाला.
त्या ग्रुप मध्ये माझ्या विभागातले सगळे १२ वी नापास होतो.व एक जण डिप्लोमा फेल तर एक जण फर्स्ट इयर फेल.  ह्या ग्रुप मध्येही सुरुवातीला काही बोललो नाही.पण नंतर ह्याच ग्रुप ने ह्या स्टोरीत मला मनापासून साथ दिली.मी ह्या ग्रुप मध्ये राहून १२ वीचे अपयश विसरलो  व आम्ही सगळेच दिवसभर अभ्यास करून संध्याकाळी एकत्र जमून फेल व्हायचे दुख हवेत धूर करयचो.व्यसन ह्याच ग्रुप मध्ये वाढली.पण जगण्याच शिक्षण इथेच मिळालं.एक एक जण एक दंतकथा आहेत.त्यावर नंतर कधीतरी.

सन २००५ 
मी पूर्णपणे विसरून गेलो.जोमाने अभ्यासाला लागलो. आषाढी-कार्तिकी प्रमाणे ऑक्टोबर ला २ विषय व फेब ला २ विषय करत बारावी पास झालो. नंतर मी कर्जत ला बी.एससी. आय. टी. ला प्रवेश मिळवला.आमचे वर्ग इंजिनियरिंग क्याम्पास मधेच होते.  नवीन शहर,नवीन कॉलेज नवीन मुल  मुली.इथली मुल तर मुंबई हून अप डाऊन करणारी,कुणी स्थानिक,कुणी कल्याण डोंबिवली व आमच्या भागातली तर कुणी महाराष्ट्राच्या अन्य भागातली तर काही जम्मू काश्मीर मधली.तर काही पुर्वांचलामधली. 

मी तनूला पूर्ण पणे विसरलो कि काय अस वाटू लागयच पण नाही.दिवसभर जरी आठवण नाही आली तरी रात्री पलंगावर   अंग टाकले,डोळे मिटले कि प्रथम तिचाच विचार यायचा.भले पूर्ण दिवस नाही येणार पण तेव्हा मात्र जरूर यायचा. काय करत असेल,सेकंड इयर ला असेल ना?बघितलंच नाही दिडेक वर्षात.कशी दिसत असेल? आता.कसा संपर्क करू? जावू का तिच्या कॉलेज मध्ये आणि भिडू का डायरेक्ट.काही डोकच चालत न्हवत.   

आणि अचानक  एक दिवस मयूर चा फोन आला.......

मग एके दिवशी मयूर चा फोन आला. मयूर तेव्हा पुण्यात आय.एल.एस.ला होता. मध्ये मध्ये अंबरनाथला जाण येण त्याच व्हायचंच. तर फोन वर- हाय, हेल्लो काय चाललंय? झाल्यावर तो म्हणला कि परवा तनू अंबरनाथला भेटली होती. मी एकदम खुश झालो.पण बोलण्यातून जाणवू दिल नाही. मी म्हंटल काय म्हणाली? काय करतीये आता ती? त्याने सांगितलं कि ती सेकंड  इयर बीकॉम ला आहे व AHA करतीये. मला ऐकून शॉक बसला. हि आणि AHA .कस शक्य आहे. AHA म्हणजे एयर होस्टेस Academy . मी हसयालाच लागलो.मग तो पण हसयला लागला. मग तो म्हणाला,अरे लगेच काय ती हवाई सुंदरी होणार नाही.ती खाजगी प्रशिक्षण संस्था आहे. तिथे जवळ जवळ कुणालाही घेतात. आणि नुसत हवाई सुंदरी नाही तर Hospitalityच देखील प्रशिक्षण असत त्यात.मग मी विचारलं नंबर वैगेरे दिलाय का? तर मयूर हो म्हंटला व त्याने नंबर दिला मी लिहून घेतला.

आता नंबर तर आलाय.पण कॉल नक्की कसा करयचा? काय निमित्त काढून फोन करावा हे  समजेना मग मी ठरवलं कि आपण sms पाठवू.  मग निमित्त हि मिळाल, मकर संक्रातीच आणि मकर संक्रांतीला मी तिला शुभेच्छा  संदेश पाठवला.माझ्या अपेक्षेप्रमाणे त्या दिवशी काही प्रतिसाद आला नाही.पण दुसर्या दिवशी मात्र तिचा कॉल आला.         
 मी कौस्तुभ बोलतोय हे समजल्यावर तिला फार आनंद झाला. काय करतोयस वैगेरे विचारण झाल. इतर थोडफार बोलण  झाल आणि ठेवला.    

असेच काही दिवस फोनवर बोलण होत होत. आमची पहिली भेट झाली गुढी पाडव्याच्या  आदल्या दिवशी. मार्केट मध्ये उभ्या  उभ्याच. नंतर एकदा तिच्या कॉलेज जवळ. काहीतरी काम काढून गेलो होतो. अशा जवळ जवळ ४-५  भेटी महिन्याभरात झाल्या. जेव्हा जेव्हा भेट व्हयाची किंवा फोनवर बोलण व्हायचं, तेव्हा मी तिच्या बद्धल अधिक जाणून घ्याचा प्रयत्न करत असे. करियर शिक्षण ह्यावर बोलण तर झालच होत. मग मी थोडा पुढे सरकलो. जस तिच्या घरात नक्की काय मत आहेत लग्नाबाबत. म्हणजे प्रेम विवाहा बाबत. तिच्या काय अपेक्षा आहेत.वैगेरे कुणी प्रपोज केला होता का वैगेरे? ती म्हणाली तिला ३ प्रपोज आले होते. ऐकून मी शॉक झालो. मला अस वाटल न्हवत. मग मी नाकारण्याचे कारण विचारले. तिने विचार करून उत्तर  दिले. ती म्हणाली कि," माझ्या वडिलांना अजून एक सक्खे भाऊ आहेत. त्यांना दोन्ही मुलीच आहेत.माझ्याहून लहान. मी आमच्या सर्व भावंडात मोठी.  आमच्या सांगली कडील  मराठी जैन समाजात  लग्न ठरवताना  त्या मुलीचे इतर भाऊ बहिण व त्यांनी कुणाशी लग्न केली आहेत ह्याचाही विचार केला जातो.मी
मोठी आहे व मी इतर समाजातील मुलाशी लग्न केल तर  त्यामुळे  माझ्या बहिणींच्या लग्नात प्रोब्लेम येऊ शकतो." मुद्दा पटण्यासारखा होता.         

मी तिच्या तेव्हा जो ग्रुप होता कॉलेजचा आणि AHA चा त्यांना हि नियमित भेटू लागलो. तेव्हा मला जाणवलं कि तनू फार भावना प्रधान आहे. ग्रुप मध्ये मुलच जास्त आहेत. आणि प्रत्येकाशीच ती इतकी आणि अशा तर्हेने बोलते कि बघून कुणाला वाटाव  कि अफेयर असाव. पण तिच्या मनात तस काहीच नसाव. नसत. ती पटकन कुणाशीही मैत्री करते हे मला पटत नाही अस तिची एक मैत्रीण श्वेता म्हणाली. आणि म्हणूनच हिला ३ प्रपोज आले असावेत.             

तिला थोडा थोडा अंदाज येऊ लागला होता. शेवटी मी १५  एप्रिल २००५ ला प्रपोज केलेच. थेट बोलण्याची हिंम्मत न्हवती. फोन केला. मी तिला आठवी इयत्तेपासून कसा तिच्या प्रेमात आहे हे सांगितलं. आणि इतकी वर्ष स्वतःला वेळ दिला. प्रेम आहे कि आकर्षण ह्याच 
उत्तर मला हव होत. आणि जेव्हा हे प्रेमच आहे हे समजल तेव्हाच मी तुला सांगतोय हे तिला सांगितलं. मी इतकी वर्ष थांबलो ह्यावर मी भर देत होतो. आणि हा मुद्दा तिला पटलाच. ते तिने मान्य केल. मी उगाच टिपी करत नाही हे तिला समजल. पण तिने नकारच दिला. तिने मला घरातल्या लोकांच कारण (वर दिल आहे ते) सांगितल. मी तिला म्हणालो कि अजून बरीच वर्ष आहेत हातात. लगेच उद्या लग्न नाही करायचं आहे. माझ प्रेम खर आहे. हे तर तू मान्य केलस ना ? ती म्हणाली कि आता जास्त बोलण्या पेक्षा भेटून बोलू. लगेच नाही जमणार पण जेव्हा फ्री असेल तेव्हा नक्की बोलावेल.

मग मी त्या दिवशी रात्री गुड नाइट मिस कॉल केला नाही. गुड नाइट मिस कॉल हा प्रकार असा  कि रात्री झोपण्या आधी ती मला आणि अन्य काही फ्रेंड्सना मिस कॉल द्यायची. आणि पोच म्हणून आपण परत तिला करायचा. म्हणजे आता मी झोपत आहे काय आहे ते आताच बोला किंवा मेसेज करा नंतर सकाळ पर्यंत करू नका. मी मिस कॉल केला नाही. नंबर आल्यापासून रोजच करायचो. पण प्रपोज केल्यावर नाही केला. दुसरा दिवस उजाडला. मी तिला फोन मेसेज गुड नाइट मिस कॉल काहीच केल नाही.  मग तिसर्या दिवशी  तिचाच फोन आला.तिने मला पक्क सुनावलं. ती म्हणाली तू मला प्रपोज केल हे खरय पण त्या आधी आपली मैत्री नाहीये का ? तू मला मित्र म्हणून हवाच आहेस. पूर्वीसारखाच राहा. फोन मेसेज करत जा. कधी भेटायचं ते ठरवते लवकरच.

७-८  दिवस असेच गेले.एके दिवशी ती मला म्हणाली कि माझा वाढदिवस येत आहे.मी तो वेगळ्या पद्धतीने साजरा करते. वृद्धाश्रमात जाते.तिथल्या वृद्धाना मिठाई फळे वाटते. त्यांचा आशीर्वाद घेते. वाढदिवशी जमणार नाही म्हणून आपण आधीच जावू. हायवेला आहे. तूच घेऊन चल. हि कल्पना मला चांगली वाटली. तिच्या बद्धल प्रेम, आदर अजून वाढला.     

मग आम्ही दुसर्यादिवशी स्टेशनला भेटलो. फळ,मिठाई घेतली. गाडीवरून निघालो. वृद्धाश्रमात मी पूर्वी कधी गेलोच न्हवतो. तिकडच वातावरण वेगळच भासल. अनुने  सर्वाना फळे मिठाई दिली. सर्वांच्या पाया पडली. एक दोन तिच्या ओळखीचे ज्येष्ठ होते त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. तिथे थोडावेळ बसलो. आणि मग आम्ही निघालो. माझ्या प्रपोजल बधल चर्चा करण्यासाठी. मी जागा पण अशी निवडली होती कि आम्ही मोकळेपणे बोलू शकू. इतर लोक नसतील आणि तरी जागा सेफ असेल. एक तळ आहे तिथे गेलो.    
मग तळयापाशी पोहोचलो. दुपारी ४ वाजता. एकदम शांतता. माणस फारशी नाहीत. मी सुरुवात केली.पुन्हा मी इतकी वर्ष कसा थांबलो हे सांगितलं. त्यावर तीने माझी भावना खरी आहे  हे मान्य केल. तिने पुन्हा घरच कारण दिल. मी तिला समजावलं  कि लगेच काही उद्या लग्न नाही करायचं. आता २००५ चालूये. निदान ५ वर्ष तरी आहेत. आणि खरच हेच कारण आहे का? हे मला पटत नाही. मी तुला त्या दृष्टीने नसेल आवडत तर तस स्पष्ट सांग. पण उगाच गुंडाळू नकोस. 

त्यावर ती पुन्हा पुन्हा घरच कारण देत राहिली. जी गोष्ट होणार नाही त्याचा विचार का करावा अस म्हणाली. आपण पूर्वी मित्र होतो नंतरही राहू अस म्हणाली. मला काही सुचेना. ठीक आहे अस म्हणून निघालो. 

मग काही  महिने असेच गेले.मग साधारण नोवेंबर २००५ च्या दरम्यान आमचा संपर्क बंद झाला. तो बंद होण्याच कारण अस कि जेव्हा जेव्हा आम्ही बोलयचो तेव्हा तेव्हा आडवळणाने किंवा थेट मी पुन्हा पुन्हा तिला विचारायचो. मग तिनेच  फोन उचलणे  
बंद  केल. मलाही माझी चूक समजत होती. आपण केवळ मित्र राहू शकत नाही त्यापेक्षा बोलण, बंद  झालेलं बर, लवकर बाहेर पडता येईल  अस समजून मी सुधा तिला विसरण्याचा प्रयत्न केला. 

पण जेव्हा माझ  शेवटच बोलण झाल तेव्हा मी एक  डायलॉग मारला.

 "तू आणी मी आपण एकमेकासाठीच बनलो आहोत अशी माझी ठाम श्रद्धा आहे. मी तुला contact करणार नाही. पण जेव्हा कधी तू कुणाशी लग्न करशील तेव्हा तुला कायम वाटत राहील आणि आपले मित्रही म्हणतील कि खरच कौस्तुभ काय वाईट होता? त्याला नाकारून चूक केलीस. तुला पश्चाताप होईल. " 

3 Years Later
ऑगस्ट २००८ 
                                  

माझा मित्र धवल त्याचा  मला फोन आला. आज  फ्रेंडशिप डे आहे. आपल्या १० वि फ च जी२जि करूयात. मी सर्वाना कळवल  आहे. आधीच.तुझा नंबर आज मिळाला. उशीर
 झाला  कळवायला. येतोस का? मी  म्हणालो. कोण कोण येतंय? त्याने ७-८ नावे घेतली. 
त्यात तनू  पण होती.त्याला येतो सांगितलं. तनू  येतीये म्हंटल्यावर दिल गार्डन गार्डन हो गया. आज ती तीन वर्षांनी मला भेटणार होती.  

मी
 संध्याकाळी हॉटेलवर पोहोचलो. हॉटेलचा वरचा मजला बुक होता.धवलने व्यवस्था चांगली केली होती. गेलो सर्वाना भेटलो. सगळे बोलावलेले हजर होते. फक्त  तनू सोडून. मी आहे म्हणून ती येत नाही अस वाटल मला. मी सोडून दिला विचार आणि 
इतरांच्यात गप्पात रमलो. थंड पेय,सूप अस एक राउंड झाला. माझा हा सीन बहुतेक सगळ्यांना समजला होता. मी २-३ जणांना तनूने २-३ जणांना अस करत समजल होतच. त्यावर  २-३ कमेंट्स येउन गेल्या.

शेवटी ती आलीच. आणि पुढे जे होते त्यांच्याशी बोलून थेट माझ्याकडेच आली. एकदम व्यवस्थित पूर्वीसारख बोलली. हा माझ्यासाठी धक्काच होता. मीही बोललो. मग कार्यक्रम सुरु झाला. कोण काय करतय वैगेरे.कस वाटल इतक्या दिवसांनी भेटून अस बोलायचं  होत. ते चालू होत. मी जास्त तिच्याकडे लक्ष देतोय अस दाखवलं नाही.बोलण्यारच  ऐकतोय दाखवत मी आपला व्होडका मारत होतो. (सुमडीत घेऊन गेलो होतो).

कार्यक्रम संपला. घरी निघालो. आणि मी तिचा निरोप घेतला. तर तिनेच मला तुझा नंबर तोच आहे का विचारलं. मी हो म्हणालो. तिने तीच कार्ड दिल. आणि निघालो.  दुसर्या दिवशी पासून पुन्हा contact चालू. पण कमी पुर्वीसारख रोजच फोन नाही. ८- १५
दिवसातून. 

आपण मध्येच बोलण सोडलं हे तिला मनातून पटत नसेल. गिल्टी वाटत असेल म्हणून स्वतःहूनच ती बोलली असावी.           
पण भेट मात्र पुन्हा झाली नाही. आणि मी सुधा कसा बसा तृतीय वर्षाला गेलो होतो म्हणून मी सुधा जास्त लक्ष दिल नाही.   

दीड वर्षानंतर
३०  डिसेंबर २० ० ९ 


पुन्हा धवलनेच पुढाकार घेऊन नवीन वर्षाच्या निमित्ताने जी २ जी ठेवलं.तनूला मीच फोन करून कळवल. जवळ जवळ
वर्षाने फोन केला होता. आणि दीड वर्षाने भेटणार होती. ह्यावेळी लोक बरीच कमी होती. १०-१२ जणच होतो.  त्यामुळे हॉटेल काही बुक केल न्हवत. टेबल खाली होएस्तोवर आणि नंतर बर्याच  गप्पा झाल्या. नंतर शेवटी जाता जाता  तनूने सर्वाना सांगितलं 

"मला एक announcement करायची आहे. "      

आम्ही सगळे-,"काय आहे? "

धवल- "काय लग्न वैगेरे ठरलं का ?"

अनु- "मला बोलू तर द्या "

मी-"बोला "
तनू
-" तुम्ही सर्व माझे शाळेपासून मित्र मैत्रिणी आहात. आज एका जागी सगळे जमलोय. म्हणून मला सांगायचं  आहे  कि मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचे नाव ---- आहे."

लगेच सगळे अभिनंदन करू लागले. मी पण केले.   इथवर मी ठीक होतो.  ती म्हणाली पूर्ण ऐकून तर घ्या

"ह्या लग्नाला घरून मान्यता मिळण्याची शक्यता कमी. तेव्हा मला तुम्हा सर्वांची मदत लागेल. "

हे ऐकून मात्र माझी सटकली. साला आम्हाला घरची कारण. आणि आता काय. तेव्हाच नाही म्हण्याच होत. पण मी शांत राहिलो. मला काही फरक पडत नाही. अस दाखवलं. शिवाय  मदतीच आश्वासन हि दिल.

2010

नंतर मात्र मी अनूचा विचार करण सोडून दिल. आठवण यायची पण ती आठवण अप्रिय होती. तिला आपण नको होतो हे तिने स्पष्ट का नाही सांगितलं ? उगाच इतर कारण कशाला दिली ? असे विचार मनात काही दिवस आले पण नंतर विसरलो.

कारण तेव्हा मी पुण्यातील दोन पैकी एक flat विकून आमच्या इथे दुसरा flat घेण्याच्या गडबडीत होतो. पुण्यातला विकला व इथे बदलापूर मध्ये घेतला. हे व्यवहार पूर्ण करण्यात आणि अंबरनाथहून बदलापूर ला शिफ्ट होण्याच्या गडबडीत तिचा विचारच आला नाही. एकदा आठवण आली तेव्हा सहज फोन केला.तिला मी शिफ्ट होतोय हे सांगितलं.   तेव्हा ती म्हणाली ,"अरे काय खो खो आहे का ?  मी तुमच्या इथे राह्यला येणार आहे. बी केबिन रोडला. आणि तू चालला."  च्यायला आम्ही इथून चाललो आणि नेमकी हि इथे येतीय. पुढे ती म्हणाली कि," मला नक्की सांगता  येणार नाही कि तिथे मी राहू शकेन कि नाही. कारण त्या आधीच लग्नाचा
विचार आहे. आणि घरचे तयार होतील अस वाटत नाही. त्यामुळे न सांगताच कोर्ट Marraiage करून मग सांगाव लागेल". मी तिला म्हणालो कि," पूर्ण विचार करून निर्णय घे. उद्या पश्चाताप नको. काही मदत हवी असल्यास सांग." ती बर म्हणाली आणि फोन ठेवला.

नंतर नवीन घरी शिफ्ट झालो.तर अंबरनाथचा flat भाड्याने देण्याची गडबड. तसेच नवीन घरत काही छोटी मोठी काम चालूच होती.
अशात १९ जून २०१० आला. आमचा शिवसेनेचा वर्धापन दिन. वर्धापन दिनाला गेलो. मानकर साहेबांनी तिकीट काढून ठेवलेली.षण्मुखानंद बाहेर भेटलो.  मला म्हणाले," सध्या काय करतोस? मी म्हणालो सध्या CA मिन्स Complete आराम चालूये. साहेब बोलले नाहीतरी आपण दुपारी  १२ वाजता उठता.  ये परवापासून माझ्याकडे.मला संध्याकाळीच जास्त गरज आहे.  काम काय आहे ते समजावलं. मी ठीके म्हंटल. शिवसेना पक्षामुळे मला मिळालेला हा तिसरा जॉब.  शिवसेनाप्रमुखांची हि
अप्रत्यक्ष कृपा.

२१ जून २०१०
मानकर साहेबांच ऑफिस.


इथे सर्व काम फोनवर असायचं. नेट वापरायला भरपूर वेळ. नवीन घरी  अजून नेट घेतलं न्हवत. गेला १ महिना मी लॉग इन  झालो न्हवतो. ऑर्कुटवर  आलो. स्क्राप चेक करत होतो. एका मित्राचा- बंटीचा  स्क्राप आला "तनूने लग्न केल.फोटो टाकलेत.आता सगळ संपल." 
ह्या बंटीने माझ्यासाठी तनूकडे फार आग्रह धरला होता. पण काही उपयोग झाला न्हवता. हा एकच  मित्र असा कि ज्याची मनापासून इच्छा होती कि तनू मला मिळावी. 

 ती लग्न करणार हे माहिती होतच. फोटो बघितले.आजवरच सर्व चित्र झर झर डोळ्यासमोरून  गेले. दुख झालच.  कितीही नाही म्हंटल तरी एक भाबडी आशा होती. ती सुधा आज संपली. 
पण चला एकदाचा हा चाप्टर बंद झाला.

2011
December
अस म्हंटल जात कि मानव जे जे बोलतो ते कधी नाहीस होत नाही. शब्द हे अवकाशात अनंताच्या दिशेने प्रवास करत असतात. इथेही तेच झाल. माझे शब्द नाहीसे नाही झाले.कारण ती अंतः करणातून आलेली खरी प्रेम भावना होती. ते शब्द खरे झाले. काय होते ते शब्द? ते शब्द होते.  

"तू आणी मी आपण एकमेकासाठीच बनलो आहोत अशी माझी ठाम श्रद्धा आहे. मी तुला contact करणार नाही. पण जेव्हा कधी तू कुणाशी लग्न करशील तेव्हा तुला कायम वाटत राहील आणि आपले मित्रही म्हणतील कि खरच कौस्तुभ काय वाईट होता? त्याला नाकारून चूक केलीस. तुला पश्चाताप होईल. "माझे शब्द खरे ठरले होते. 
तनूच बिनसलं तनू  आपल्या नवर्याला सोडून परत आई वडिलांकडे राह्यला आली होती. 

2014
September

आज तीच लग्न मोडून ३ वर्ष होतील.आजही आम्ही बोलतो. रोज रोज नाही तरी महिन्यातून एखाद वेळी बोलण होत.तिचा एकटेपणा तिने स्वतःला  कामात गुंतवून दूर केला आहे. तीच्या समाजात पुनर्विवाह तसा कठीणच. तिने लग्नाचा विषयच सोडून दिलाय.पण बोलण्यातून पश्चाताप जाणवतो. आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध घरातून पळून जाऊन लग्न केल, आणि शेवटी पुन्हा त्यांच्याकडेच याव लागल हि अपराधीपणाची भावना तिच्या मनात आहे.  

लग्न मोडण्याच कारण काय? तर तिला लहानपणापासूनच कसलासा त्रास आहे. ती कधी आई बनू शकत नाही. काहीतरी नाव सांगितलं तिने आता आठवत नाही. तिने नवर्याला लग्न करतेवेळीच  हे स्पष्ट सांगायला हव होत. त्याची तरी काय चूक ? मुल असावीत अस कुणाही  पुरुषाला वाटणारच. त्याला वाटत हिने फसवल आणि हि म्हणते मला त्या आजारानी मूल होणार नाही हे माहिती न्हवत. खर खोट देव जाणे.          

 मला आजही वाटत धावत तिच्या घरी जाव. तिच्या आई वडिलांना भेटून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा सांगावी. पण  माझ्या घरी हे चालणार नाही.परजातीय त्यात घटस्फोटित मुलीशी  लग्न करतोय हे एकवेळ चालेल. पण तिच्या आई न होऊ शकण्याच काय ? ह्याच काय उत्तर देणार आहे मी माझ्या आई वडिलांना ? मी खूप विचार केला. मी स्वतः काय आहे ? कुणीच नाही. आई वडिलांच्या भरवशावरच माझा उद्योग सुरु आहे. त्यांनी कधीच कोणत्याच गोष्टीला मनाई केली नाही.सकाळी नाश्ता काय असावा ते रात्री जेवण काय असाव ? घरात काय फर्निचर असाव,कोणती गोष्ट कुठे असावी  इथपासून सगळ ऐकल. बारावी फेल ,पदवीला ६ वर्ष घेतली, तरी काहीच बोलले नाहीत. फक्त व्यसन करू नको म्हणत. मी एकटाच मुलगा. आई वडिलांनी सगळ काही कमावल. ३-३ घर, बर्यापैकी बँक ballance ,दागिने,उद्योगाला भांडवल दिल,  डोक्यावर एक रुपयाच कर्ज नाही. माझ्या कडून खूप काही अपेक्षा नाहीत. फक्त आमच्या मर्जीने लग्न कर इतकीच अपेक्षा त्यांना असेल.  त्यांना अव्हेरून मी प्रत्येक निर्णय घेतले.

पण हा निर्णय मात्र मी नाही घेऊ शकत..नाही घेऊ शकत.  

समाप्त  

ता. क. -    तो सैफ आणि राणीचा पिक्चर होता. ह्याच नावाचा. त्यात पण असेच आहे आपल्यासारख  2 years later, 4 years later म्हणून हे नाव दिल.             

Sunday, September 21, 2014

शिवसेना-भाजप युती

काही नवीन उत्साही कार्यकर्ते युती अगोदर भाजप किती ताकदवर होती हे सिद्ध करताना ७८-८६ काळातले आकडे फेकत आहेत.जनसंघाने शिवसेनेला पहिला पाठींबा १९६७ साली पोटनिवडणूकीसाठी दिला. १९७१ सालच्या शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात जनसंघाचे बलराज मधोक उपस्थित होते अधुन मधून जनसंघी शिवसेनेच्या कार्यक्रमाला येत. ७१ च्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबईच्या जागेवरून जनसंघ-शिवसेना युती फिस्कटली होती. शिवसेनेच्या हिंदुत्वाने लॉस होतो असा मतप्रवाह होता. अरे बाळानो ७८ ते ८६ जनसंघ व नंतर भाजप हे शरद पवार ह्यांच्या पुलोद प्रयोगात होते. सो त्यांची स्वताची ताकद किती व पवार पॉवर किती हे अनुत्तरीतच राहणार. नुसते एवढेच नाही तर भाजप तेव्हा गांधीवादी समाजवाद ह्या विचारावर आधारित होता. रामजन्मभूमी वैगेरे विषय न्हवतेच तेव्हा.

मग पार्ल्याच्या ८७च्या निवडणुकीत भाजपवाले गांधीवादी समाजवादाचा राग आळवत होते. आणि त्यांनी जनता दलाच्या प्राणलाल व्होराना पाठींबा दिला. परिणाम शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी.कॉंग्रेसचे कुंटे पराभूत तर व्होरा तिसर्या स्थानी फेकले गेले . आणि ह्या निवडणुकीत अवतरले कोण तर सय्यद शहाबुद्दीन. सय्यद शहाबुद्दीनच्या येण्याने कट्टर हिंदुत्ववादी गट सतर्क झाला आणि हा गांधीवादी समाजवादाचा बुरखा परवडणार नाही तेलही जायचे आणि तूपही हे जाणले. मग आले आमच्याकडे युती करा युती करा करत. आम्ही न्हवतो आलो कधी तुमच्या दारात.

अधिक माहिती- शिवसेना १९६७ साली कल्याणच्या दुर्गाडी किल्ला आंदोलन व १९७० च्या महाडच्या महिकावती प्रकरणापासून हिंदुत्ववादी आहे. आणि किती कट्टर त्याची झलक बघायची असल्यास कल्याणच्या दुर्गाडी प्रकरणातली हि काही स्टेटमेंट बघा.
१) शिवसेना पाकी मुस्लिमांना हाकलून देईन. - मनोहर जोशी
२) मी जमावबंदी तोडून स्वतः भगवा फडकावेल.-साहेब
३) कृष्णराव धुळूप शेकापचे कल्याणचे आमदार आणि विरोधी पक्षनेते होते.
साहेब म्हणाले- कल्याणातील ६ हजार मुस्लिम मतांसाठी धुळप स्वताच्या आईला विकायला पण कमी करणार नाही.

Thursday, September 4, 2014

आम्ही पोलिसांचा विरोध मोडून विसर्जन वाहत्या पाण्यातच केले.

ह्यावर्षी आमच्या इथल्या गणेश घाटावर विसर्जन करू नये अशी विनंती नगरपालिकेने केली होती.त्यासाठी खोटी कारणे  देण्यात आली होती. जसे गणेश घाटावरील पाणी दुषित आहे. (वाहते पाणी दुषित असते हा नवीन शोध लावल्याबद्धल लावणार्यांचे सत्कार करावयास हवे.) खरे तर ह्या घाटावरून जो रस्ता-पूल  जातो त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यात घाटात काही गाळ पडला तो साफ केला गेला नाही.पुलाचे एका बाजूचे काम थोडे बाकी आहे. अशी खरी कारणे देण्याऐवजी खोटी कारणे देण्यात आली होती. मोठ्या मूर्तींसाठी हे योग्यच आहे. पण आमची मूर्ती अगदीच छोटी. आणि  पर्यायी व्यवस्था ह्या घाटापासून १ किमी लांब होती. मग आम्ही का पायपीट करून लांब जायचे तेही वृद्ध वडिलांना घेऊन ? आणि आम्ही हिंदू आहोत.मूर्तींचे नैसर्गिक वाहत्या पाण्यातच विसर्जन करणार तेही जवळच्याच. 



आमचा बाप्पा 
(दरवर्षी ह्याच आकाराची मूर्ती असते. रंगसंगती फक्त बदलते.)

मग आम्ही गणेश घाटावरच गेलो. मी व माझे वडील दोघेच. घाटात उतरत असताना एक पोलिस शिपाई आडवा आलाच.

तो म्हणाला- इथे ह्यावर्षी विसर्जन बंद केले आहे.तुम्ही तिकडे आत जा. तिकडे सोय केली आहे.          

मी (त्याच्या दुप्पट आवाजात) -इथे विसर्जन करू नये अशी "विनंती" केली आहे. विनंतीच आहे. "आदेश" नाहीये. मला हि विनंती मान्य नाही. मी इथेच विसर्जन करत आलोय आणि इथेच करणार. जा कुणाला बोलवायचं त्यांना बोलाव.        

मी तरुण, नसेल ऐकत म्हणून त्याने मोर्चा आमच्या वडिलांकडे वळवला. त्यांनी पण सांगितलं आम्ही इथेच विसर्जन करणार. पोलिस परत माझ्याकडे आला. म्हणाला- आपण इतके दिवस मनापासून पूजा केली बाप्पाची. मी पण मानतो गणपतीला. म्हणून सांगतो इथे खराब पाण्यात विसर्जन करू नका.

मी त्याला म्हणालो- कधी ड्युटी लागली इथे ?

तो- आजच

मी- माहिती नाहीये तर माहिती करून घ्या. आम्ही इथेच राहतो. इथेच दरवर्षी विसर्जन करतो. हे वाहते पाणी आहे. गेले २ तास पाऊस पण मोठा  जोराचा पडलाय. शुद्ध आहे हे पाणी. आणि हे जे नाटक ह्यावर्षी केलंय ते कुणासाठी हे वेगळ सांगायला नको.पुलाचे काम वेळेत पूर्ण केले नाही , काम चालूये त्यासाठी असेल.त्यासाठी  मी का लांब जाऊ ? मी इथेच करणार. काय करायचं ते करा.
मग त्याच्या वरची महिला अधिकारी बाजूच्या दुकानात बसली होती. ती आली. त्या शिपायाला विचारलं काय झाल ? त्याने सांगितलं.  आमची मूर्ती लहान आहे बघून तिने हरकत घेतली नाही.

 मी आणि बाबांनी  आरती केली.नंतर मी विसर्जन केल. कधी नाही ते इतक्या वर्षात मी पहिल्यांदाच स्वतः पाण्यात उतरून विसर्जन केल. एरव्ही विसर्जन करून देणारी मुल असत. ते प्रवाहाच्या मधोमध जाऊन विसर्जन करत. ह्यावर्षी स्वतः केल.

आमच पाहून एक क्वालीस गाडीमधील गणपतीवाले कुटुंब पण आमच्या मागे आले . त्यांनीही तिथेच विसर्जन केल. नंतर अजून ३ जण आले.  निघताना मी त्या पोलिस शिपाई आणि त्याच्यावरील महिला अधिकारी ह्यांना खिरापतीचा प्रसाद दिला व कमी जास्त बोललो असेल तर मनावर घेऊ नका अस हसत हसत म्हणालो. त्यांनीही हसून निरोप दिला  आणि आम्ही निघालो.

विसर्जन वाहत्या पाण्यात करायचे हा नियम  पाळा. विहीर,कुंड,तलाव ह्यात विसर्जन करू नये. हे शक्य नसेल तर पंचधातूची/चांदीची मूर्ती आणावी व तीच दरवर्षी प्राणप्रतिष्ठा करावी. विसर्जनाच्या अक्षता वाहाव्यात मग घासून पुसून ठेऊन द्यावी व पुढच्या वर्षी वापरावी.एकदाच खर्च.  पण जर मातीची(पार्थिव) मूर्ती आणत असाल तर तिचे विसर्जन हे वाहत्या पाण्यातच करावे. 


आपला 
कौस्तुभ गुरव, बदलापूर          
          

Monday, June 23, 2014

शिवसैनिक असल्याचे सार्थक झाले!- एक चांगला अनुभव!

आज सांयकाळी बदलापूर पूर्वेत मी आपल्या घराकडे निघालो होतो. दुचाकीवर होतो. नवरत्न हॉटेल पासून कात्रपकडे जात होतो. रस्त्याने समोरून एक बाई धावत आली.साधारण चाळीशीची असावी.निळ्या रंगांचा पंजाबी ड्रेस,गळ्यात पर्स,हातात पिशवी.  गाडी स्लो होती.तिने हात लाऊन मला थांबवले. " मला जरा सोडा,माझ्या आईला छातीत दुखायला लागले आहे. माझी प्लीज मदत करा " मी म्हंटल," बसा.कुठे जायचे आहे?" ती म्हणाली,"बँक ऑफ बडोदा बिल्डींग."  मी चाललो होतो त्याच्या विरुद्ध दिशेला होते ते ठिकाण.मी गाडी फिरवली आणि ती बसली. 

आम्ही निघालो. ती सांगू लागली,"मी कामावरून घरी जाताना अचानक आईचा मला फोन आला. तिने छातीत दुखू लागल्याच सांगितलं. मला प्लीज मदत करा आणि वर घरीही या. कदाचित आपल्याला तिला खाली आणून admit कराव लागेल."
मी ठीक आहे म्हंटल आणि घरात काही औषधे आहेत का विचारलं. पण त्या बाईला काही सुचतच न्हवत. मग मी धीर देत म्हणालो बदलापूर मधले चांगली  दोन विख्यात हॉस्पिटल तेथून अगदी लागूनच आहेत काळजी करू नका.आपण करू. सर्व नीट होईल.त्या बाईला जरा बर वाटल.

मग आम्ही तिथे पोहोचलो. तशी ती धावतच सुटली आणि धावता धावता मला पहिल्या मजल्यावर या म्हणाली. मी गाडी लाऊन वर गेलो. त्या बाईच्या आईने दार उघडल होत. हि बाई तिच्या आईला विचारात होती नक्की काय झाल? . तिची आई म्हणाली,"  अचानक छातीत जोरात दुखू लागल पण पण आता बरे आहे.तरी  आपण आपल्या नेहमीच्या डॉक्टर कडे थोड्या वेळाने जाऊ."
मग हि बाई म्हणाली,"Thanks.  फार मदत झाली तुमची. मला सुचत न्हवते. बर झाल तुम्ही भेटलात " आणि शेकह्यांड साठी हात पुढे केला.
मी हाथ मिळवला.नो मेन्शन म्हंटल.मग तिने नाव विचारलं मी माझ  नाव सांगितलं आणि विचारलं," मला  एक नाही समजल रस्त्याने एवढी लोक जात होते. तरी तुम्ही मलाच का मदत मागितली. तेही मी विरुद्ध दिशेने जाताना.?"

ती म्हणाली " आईचा असा फोन आणि तो तिचा त्रास होतानाचा आवाज ऐकून  मी रस्त्यावरून पळत होते,मला काही सुचत न्हवत.स्टेशन जवळ पण तरीही अर्ध्या रस्त्यातून रिकामी रिक्षा कुठे मिळणार? म्हणून मी धावत सुटले. तेवढ्यात तुम्ही दिसलात. तुमच्या गाडीवर शिवसेनेचा वाघ आणि भगवा झेंडा आहे. बस. म्हंटल ह्याला मदत मागू. हा शिवसैनिक आहे, आपली नक्की मदत करणार. अगदी उलटे जावे लागले तरी करणार. "

हे ऐकून मला फार बरे वाटले, अभिमान वाटला स्वतःचा,स्वतःच्या पक्षाचा.शिवसेनाप्रमुखांची ताकद काय आहे हे समजल.
शिवसैनिक मित्रानो,  हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण केलाय शिवसेनाप्रमुखांनी. तो कधीही ढळू देऊ नका. सत्ता वैगेरे सेकंडरी आहे. लोकांची मदत करणे हीच आपली प्राथमिकता आहे.    
          
हीच ती माझी गाडी त्यावरील शिवसेनेचे बोध चिन्ह वाघ,भगवा आणि जय महाराष्ट्र.  


                   

Thursday, January 9, 2014

अलका पुणेवार निमित्ताने

हि बाई अभिनेत्री म्हणून मला तरी माहिती न्हवती. गदर वैगेरे चित्रपटात छोट्याशा भूमिका व स्टेज शोज करते अस हे प्रकरण झाल्यावर समजल. ह्या बाईंच आधी एक लग्न झाल . पहिल्या पतीपासून त्यांना एक मुलगी(वय २१ काही वृत्त पत्रानुसार २५ ) आहे व ती विवाहित आहे. त्यांनी दुसरे लग्न हवाई दलातील माजी अधिकारी संजय पुणेवार ह्यांच्याशी केल. त्यांच्यापासून त्यांना दोन जुळी मुल आहेत.अलका बाईंचे वय महाराष्ट्र टाईम्स नुसार ४७ व इतर वृत्तपत्रानुसार ४४ आहे. त्यांच्या प्रियकराचे वय महाराष्ट्र टाईम्स नुसार २७ व इतर वृत्तपत्रानुसार २३ आहे.


माझ्या मनात दोन प्रश्न आले. हि बाई म्हणते कि मला माझ्या नवऱ्याचा त्रास होता.त्याचेही एका मुलीशी संबंध होते. मी फार त्रासले होते. अलोक नसता तर मी माझ्या जीवाच बर वाईट केल असत. पण माझ्या मुलांना माझ्या वागण्याचा त्रास होऊ नये व त्यांनी वडिलांची दुसरी बायको accept करायची असेल तर मी मेले अस त्यांना समजायला हव,म्हणून मी आत्महत्येचा बनाव रचला.अस हि कबूल करतीये तर त्यांना सोडलं का ? त्यांनी स्वतःच स्वताच्या अपघाताचा बनाव रचला. आणि त्यांच्यामुळे पोलिसांचा वेळ वाया गेला. नवी मुंबईतील संध्या सिंह प्रमाणे तर हे प्रकरण नसेल ना अशी शक्यता वाटून पोलिसांनी जीवतोड मेहनत घेतली. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग व कट रचणे आणि फसवणूक असे आरोप त्यांच्यावर का लावले नाहीत ? त्यांना सोडून का दिले?


दुसर अस कि दोन दोन लग्न होऊन पुन्हा तिसरे. तेही इतक्या लहान तरुणाशी. तो अलोक पालीवाल चांगला इंजिनियर आहे. मूळचा बंगलोरचा आहे व त्याचे वडील नामांकित सर्जन आहेत. एक भाऊ परदेशात तर एक मुंबईत स्थायिक आहे. त्याने हिच्यात काय बघितलं ? मला वाटल अभिनेत्री म्हणजे फार सुंदर असेल तर तेही नाही. तसेच हि बाई अलोकच्या आई वडिलांना भेटली. त्यांना स्वतःच नाव निकिता मिश्रा सांगितलं. तसेच माझे आईवडील अपघातात गेले व त्यात माझा चेहरा खराब झाला. तुम्ही सर्जन आहात तर माझी प्लास्टिक सर्जरी करून द्या. सगळाच झोल.

नक्की काय म्हण्याच ?इतक्या जास्त वयाच्या महिलेशी लग्न करून त्याला नक्की काय सुख मिळणार आहे ? ती फार काही सुंदर नाही कि श्रीमंत नाही. तिने ह्या पोराला नादाला लावलं कि तोच हिच्या प्रेमात पडला ?पण मग प्रेमात पडण्यासारखे तिच्यात काय आहे ?

आणि समजा अलका पुणेवार ऐवजी तिच्या वयाचा माणूस असता तर ? तर मात्र मिडिया आणि महिला संघटनानी त्यांना फाडून खाल्ल असत. आता कुठे गेली ती टीनपाट महिला आघाडी ?कुठे गेला तो महिला आयोग ?

Tuesday, December 17, 2013

अखेर लोकपाल मंजूर-माझेही मत

संसदेसमोर असलेले लोकपाल विधेयक अण्णांनी मान्य  केले ह्यावरून आम आदमी पक्ष बरीच टीका करत आहे त्यावर काही लिहावास वाटल ते लिहितोय.

आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास जेव्हा राळेगणला गेले व हे लोकपाल विधेयक जन लोकपाल नाही तर सरकारी लोकपाल आहे, तुलनेत तेवढे प्रभावी नाही अस बोलू लागले. त्यावरून वाद झाला. अण्णांचे काही कार्यकर्ते विश्वास ह्यांच्यावर धावून गेले.
मला वाटत ह्यावेळच्या उपोषणाचा हा टर्निंग point होता. ह्या घटनेपर्यंत देश,राजकारणी  व मिडिया  अण्णा हजारेंचे अजून एक उपोषण इतकच त्याकडे पाहत होता. व गेल्यावेळी प्रमाणे सरकार आश्वासनावर बोळवण करेल व हे उपोषण संपेल असच सर्वांच मत होत.(जरी कुणी उघड बोलून दाखवत नसले तरी ).  पण अण्णा व सहकारी ठाम होते.     

ह्या सीन मुळे आप व अण्णा ह्यांच्यातील मतभेद किती टोकाचे आहेत हे स्पष्ट झाले. आधी ते उघड झालेच होते. ह्याच दिवशी अण्णांचे सहकारी विश्वंभर चौधरी ह्यांनी काहीना वाटत हा मुद्दा असाच पडून राहावा व पुढल्या निवडणुकीत त्याचा वापर करता येईल पण आम्हाला ते नको असून जितक्या मागण्या  मान्य होऊन मंजुरीसाठी पटलावर आल्यात तेवढे तर तेवढे लोकपाल पाहिजे अशी भूमिका घेतली. तिथून हालचालींना वेग आला.

ह्यापूर्वी आंदोलनात अण्णा व सरकार ह्यांच्यात दिल्लीचे ठग होते.अण्णांच्या वतीने हे दिल्लीचे ठगच चर्चा करीत. आजच ऐकल कि रामलीला मैदनावर अण्णांची वैयक्तिक भेट केवळ आयबीएन लोकमतच्या वागळे ह्यांनीच घेतली. आणि त्यावेळी केजरीवाल वागलेंवर चिडले होते. म्हणजे आंदोलन आपल्या तंत्राने चालावे,इतरांना अण्णा भेटू नये अशी पुरेपूर काळजी केजरीवाल आणि टीमने घेतली होती. शेवटी जेव्हा पोपटराव पवार,विलासराव देशमुख वैगेरे पुढे आले  आणि ते आंदोलन मागे घेण्यात आले.

हे आंदोलन चिघळावे व पुढे त्याचा आपल्याला फायदा मिळावा अशीच केजरीवाल टीमची अपेक्षा असावी.एकीकडे राजकरणी चोर म्हण्याचे,संसदेवर टीका करायची आणि जराही तडजोडीची भूमिका घ्याची नाही ह्यामागे वातावरण पेटते ठेऊन आपला स्वार्थ साधण्याची त्यांची मानसिकता दिसून येते.

अण्णांनी ह्यापूर्वी वेगवेगळ्या मागण्यांसाठी १३ उपोषण केली व लोकपाल साठी ३. १ रुपयाची मागणी केली तर चाराणे मिळतात हा फंडा काय त्यांना नवीन नाही.आणि हळूहळू वेळोवेळी चार आण्याचा रुपया करायचा असतो. कोणतेही आंदोलन असेच चालते.एकदम सरकार एक रुपया काढून देत नाही-एकदम सर्वच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत. हे अण्णा जाणतात. आताही पुढे सुधारणा करू ह्या विश्वासावर आहे ते तरी स्वीकारुया ह्या भूमिकेवर अण्णा आले . ह्यावेळी  त्यांच्या सोबत त्यांचे जुने व खरे सहकारी होते. ह्यावेळी वाटाघाटी थेट आण्णा व सरकार अशा होत्या. म्हणूनच लोकपाल मंजूर झाले.

असो. जे लोकपाल येते त्याचे स्वागत करूया. आणि अजून एक भावाना मनात आलीये
    मराठ्यांनी पुन्हा एकदा  हादरवले दिल्लीचे तख्त!

जयहिंद! जय महाराष्ट्र!                            

Wednesday, April 17, 2013

रानडेंचा उंच झोका पण इतरांचं काय ?

महाराष्ट्रात बरीच थोर  लोक होऊन गेली. पण फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी त्यापलीकडे लोक पाहतच नाहीत. त्यापलीकडे फारस   बोलतही  नाही. सध्या उंच माझा झोकामुळे न्यायमूर्ती रानडे ह्यांची आमच्या पिढीला ओळख  झाली पण अनेक  खूप थोर व्यक्तिमत्वे महाराष्ट्रात होऊन गेली. ज्यांची फारशी ओळख महाराष्ट्रास  नाही. असलीच तर इतिहासात कुठेतरी वाचेलल  नाव इतकच. अशी थोर लोक महाराष्ट्रासमोर मालिकेच्या माध्यमातून यायला हवीत. पूर्वी अशा मालिका होत्या.  अशा मालिका अजून यायला हव्यात.

मला आठवत साधारण २००० साली  झी  मराठीवर दोन मालिका लागत.

एक होती मर्मबंध. हे मर्मबंध होते टिळक व आगरकर ह्यांच्यातील. टिळकांच प्रथम  लक्ष्य होत  स्वातंत्र्य  व नंतर सामाजिक सुधारणा. आगरकर हे मवाळ. त्याचं म्हणणं होत आधी सामाजिक सुधारणा नंतर स्वातंत्र्य. आगरकर हे केसरीचे संपादक  हि होते. टिळकांच्या नित्य संपर्कातील होते. पण सुधारणा आधी कि स्वातंत्र्य आधी ह्यातून दोघांचे वैचारिक मतभेद वाढत गेले. आगरकर केसरीतून बाहेर पडले. त्यांनी आपले समाज सुधारणाविषयक मत मांडण्यासाठी  सुधारक हे पत्र काढले. तेव्हा आगरकर Fergusson   कॉलेज जवळ राहत. तो भाग ओसाड  माळरान  होता.  त्यांना दमा  हि होता.  टिळकांनी आगरकर ह्यांना माळावरचा महारोगी म्हंटले. असा वैचारिक  मतभेदाचा  इतिहास आणि आगरकर ह्यांचे कार्य हे उत्तमरीत्या त्या मालिकेत दाखवलेलं होत.  

दुसरी मालिका होती तीच नाव आठवत नाही. ती त्या संतती नीयमन  बाबत कार्य केलेल्या कर्वे ह्यांच्यावर होती. लोकांना संतती नियमनाचा उपदेश करत असताना आपल्याला मुल नको असा विचार करणारा हा माणूस. त्यासाठी आपल्या भावना मारणारा अस  चित्रण त्यात दाखवलं. स्वतःचा वंश वाढू देणार नाही असा हा निर्धार.  ग्रेट, थोर  हि विशेषण  हि कमी पडतील.  शिवाय लोकांच्या टिका,शिव्या शाप ते कसे सहन करतात. अस सर्व त्यात होत.

अशा मालिका आता का येत नाहीत?  किती किती म्हणून नाव घेऊ ? टिळक, आगरकर,कर्वे,सार्वजनिक काका, गांधीजींचे गुरु नामदार गोखले,मुंबईचे शिल्पकार   नाना शंकरशेठ, विठ्ठल रामजी
शिंदे,कर्मवीर भाऊराव पाटील.        

Saturday, January 26, 2013

गणपती महाराज व त्यांची अजात चळवळ

अजात
यंदाचा महाराष्ट्र टाइम्स दिवाळी अंक  वाचला.त्यातील गणपती महाराज व त्यांची अजात चळवळ हा लेख वाचून मी हादरलो. .अशा कितीतरी गोष्टी आपल्याला
माहिती नसतात.म.टा.चे आभार कि त्यांनी हि माहिती आपल्यापुढे आणली. त्या लेखाचा हा सारांश.- 

गणपती महाराज .१८८७ सालचा त्यांचा जन्म.मंगरुळ दस्तगीर हे त्याचं  गाव तिवसा तालुक्यात  आहे. राष्ट्रसंत तुकडोजी आणि गाडगे महाराज यांचे ते  समकालीन होते. ते माळी समाजाचे होते. ते वारकरी-कीर्तनकार होते. अजात.जाती सोडून द्या,आज पासून आपण अजात  अशी चळवळ त्यांनी विदर्भात १९२४  साली केली होती.बर्याच लोकांनी जाती सोडून दिल्या.जात लावयाची नाही,अजात म्हण्याचे स्वतःला. त्यात सर्वच जातीचे लोक होते  त्यांना ह्या कामात इतरांकडून त्रास हि झाला तसेच सहकार्य हि मिळाले.

 एकदा अजात झाला कि त्या व्यक्तीच्या घरावर  पांढर निशाण ते लावत.जात सोडली म्हणजे आपण स्वच झालो,स्वचतेच प्रतिक म्हणून पांढर निशाण त्यांनी स्वीकारलं होत.त्यांनी श्वेत  निशाणधारी अजातीय मानव संस्था निर्माण केली.  ते सामुदायिक काल्याचा कार्यक्रम करत.पिठल  भाकरी घर-घर फिरून एकत्र करायची,व गावाच्या मंदिरात सर्व समाजाने एकत्र येऊन  हा काल्याचा प्रसाद घ्याचा. म्हणजे कुणाच्या घरातली भाकरी कोणाला हे समजत नसे.अशा प्रकारे रोटी व्यवहार  त्यांनी सुरु केले.जे जात सोडून अजात
झाले अशांची लग्न त्यांनी आप आपसात लावून दिली.  नागपूरचे  महाराज  भोसल्यांनी हि त्यांचा रत्नजडीत पोशाख देऊन सन्मान केला होता. 

त्यांनी  ‘श्वेत निशाणधारी अजात मानव संस्था’ स्थापन करुन शेकडो अनुयायी
निर्माण केले. जातीचा विरोध, विषमतेचा विरोध सर्व पातळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. जात निसर्गाच्या विरोधी आहे. मानवाच्या आत्मस्वरुपाकडे जाण्याचा मार्ग जातीमुळे अवरुद्ध होतो, असे त्यांचे तत्त्वज्ञान होते.
आपल्या कीर्तन, प्रवचनातून सर्वांभूती समभावाने वागण्याची, निष्काम वृत्तीने ईश्वरभजन करण्याची, दारु-गांजा इत्यादी व्यसनापासून अलिप्त राहण्याचा आचारधर्म त्यांनी प्रतिपादन केला. त्यांनी 
त्याकाळी अस्पृश्यांसाठी मंदिर खुले करुन दिले. कोणतेही अवडंबर न माजविता कमी खर्चात विवाह करण्यावर भर दिला. आंतरजातीय विवाहावर त्यांनी दिलेला भर व  त्यासाठी त्यांनी केलेले विशेष प्रयत्न आजही प्रेरणादायी आहेत. 

अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश, मिश्र विवाहाचे ग्रामीण भागात आयोजन, श्राद्ध, तेरवी अशा कर्मकांडाना जाहीर विरोध त्यांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टीचे द्योतक आहे. 1987 साली विदर्भातील अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन गणपती महाराजांची जन्मशताब्दी साजरी केली. सव्वाशे वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील जन्माला आलेल्या या सामाजिक व आर्थिक दृष्टीने अभावात जगणार्या संताने आपली क्रांतिकारी व जनमानसाला धडे देणारे विचार सामान्यांच्या गळी उतरविले व श्वेत  निशाणधारी अजातीय मानव संस्था निर्माण केली याचे आश्चर्य वाटते. 


त्यांनी हिंदू धर्मातील जातींचा नव्हे, तर हिंदू-मुस्लिम भेदाचाही धीटपणे विरोध केला. ज्योतिष, मुहूर्त, कर्मकांड यांना त्यांनी टाळले. एकनाथांनी काळानुरूप वेळोवेळी आपल्या वाणी व साहित्याद्वारे विरोध केला. त्यांनी विपुल अशी काव्यसंपदा निर्माण केली आहे. भारुड, भजने, भूपाळी, हरिपाठ यासोबत त्यांनी आपली सहजसिद्धानुभवर पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन खंडात आणि श्री पापलोप ग्रंथात खोट्या पांडित्याचा निषेध केला व आत्मस्वरुपाचे मर्म तार्किक पद्धतीने मांडले आहे. गुलाबराव नायगावकर यांच्या सत्यशोधकी
जलशाला, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शिक्षण प्रसाराला व तुकडोजी, गाडगेबाबांच्या समाजकल्याणार्थ त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे पाठिंबा दिला.या कामात सनातन्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही केले. पण,
त्यांनी अंगीकृत कार्य सोडले नाही. गणपती महाराजांची काव्यसंपदा व चरित्र  जिज्ञासूंनी मुळातून वाचण्यासारखी आहे.

तसेच महाराष्ट्र जात निर्मुलन परिषदेचे ते अध्यक्ष होते. पण १९३४ साली त्याचं निधन झाल.त्यांच्या नंतरही त्यांच्या अनुयायांनी आंदोलन सुरूच ठेवलं. 


पुढे भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाले,मग जात आधारीत आरक्षण सुरु झाल. त्यात ह्या लोकांची नोंद "अजात" म्हणून झाली.ह्यांना कोणतेच आरक्षण मिळत नाही कि सवलती नाहीत.ह्या लोकांना दुख हे कि ज्या कारणासाठी आपण जात सोडली त्याची साधी दखल हि कुणी घेत नाही.हि चळवळ उपेक्षित राहिली. 

काही लोकांना आपल्या इतर भावांच्या जातीच्या  दाखल्या आधारे जात प्रमाणपत्र मिळाले.पण  जे जात सोडून अजात झाले त्यांच्याशी त्यांच्या नातेवाइकानी संबंध तोडलेच होते.   त्यामुळे बर्याच लोकना आरक्षणाचा  लाभ घेता येत नाही.  शिवाय बर्याच जाती ह्या मंडल आयोगामुळे आरक्षित झाल्या.हा आयोग लागू होता होता मध्ये ३ पिढ्या गेलेल्या.त्यामुळे इतकी जुनी प्रमाणपत्र ,कागपत्रे मिळणे  अशक्यच 

२००४ साली मुख्य  सचिव अशोक खोत ह्यांनी एक जनसुनावणी घेऊन अजातांच्या प्रश्नी तोडगा काढू असे आश्वासन दिले होते.त्यात समाजातील बर्याच व्यक्तीने आपले गाऱ्हाणे मांडले.पण पुढे काही झाले नाही.

जात सोडण्याची चळवळ,अजात होण्याची चळवळ जातीच्या रकान्यावर "अजात " म्हणून नोंद होऊन संपली.   

Wednesday, August 8, 2012

टीम अण्णा बरखास्ती बद्धल



आणा टीम-कोअर कमिटी बरखास्त  झाली आणि त्या आंदोलनाच मूल्यमापन सुरु झाल. आम्ही ह्या आंदोलनाच्या कायम विरोधात होतो.अगदी थोरल्या साहेबांनी पाठींबा दिला तरी.पण ह्या सर्व चर्चा चालू असताना एक मुद्दा कुणीच लक्षात घेत नाही.कि 
चाराणे हवे असतील १ रुपयाची डिमांड करावी लागते. सरकारने चाराणे सरकारी लोकपाल मधून मंजूर केले मग ते सोडून ह्यांना मधेच भ्रष्टाचार कसा काय आठवला तोही जुना?          
 हा मुद्दा कुणीच लक्षात नाही घेतला ना आणा टीम ने ना आणा विरोधकांनी  .तो असा -

जुलै मधील आंदोलन हे लोकपाल पारित करा म्हणून नाही तर १५ मंत्र्यांची चौकशी करा व त्यासाठी समिती नेमा अस होत. जर ह्या अधिवेशनात लोकपाल मग तो सरकारी तर सरकारी पास करा अस म्हंटल असत तर जन समर्थन हि मिळू शकल असत आणि कदाचित ते पास हि झाल असत.

पण सरकार १५ लोकांना काढणार नाही,किवा चौकशी समिती नेमणार नाही कारण हे सरकारने आरोप मान्य केल्यासारखं होईल.हे लोकांना समजलं म्हणून लोक आली नाहीत.आता मुंबईला गर्दी का न्हवती तर कारण वेगळी आहेत.मुंबईत सध्या फक्त ठाकरे आणि ठाकरेच जनमान्य आहेत तेच गर्दी जमवू शकतात.(तेही संध्यकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी.वर्किंग डेज ला किंवा सकाळी- दुपारी नाही)तेव्हा मुंबई ला हि जन लोकपाल साठी आंदोलन होत व गर्दी न्हवती,अपयशाची सुरुवात तिथून झाली हे पहिले डोक्यातून काढून टाका.

तेव्हा टीम अण्णा ची हि मागणी चूक आहे हे त्यानाही माहिती होत व लोकांना हि समजल. पण मग त्यांनी अशी मागणी का केली? तर मला ह्याच उत्तर अस वाटत कि मुळात जे UPA २ चे पहिले दोन वर्ष २ जी,कॉमन वेल्थ आणि कसले कसले घोटाळे बाहेर आले त्यातून एक अराजक माजत होत.पूर्वी घोटाळे झाले नाहीत का? झाले आणि पचवले.कारण मिडिया न्हवती.रेडीओ च्या सरकारी बातम्या व वृत्तपत्र.आता रोज रोज मिडिया ट्रायल होऊ लागली.रोज वाभाडे निघू लागले. म्हणूनच सरकारने माफ करा सोनिया च्या कृपेने हि मंडळी पुढे आली असावीत. आणि त्यांनी अण्णाना  पुढे केल असाव. म्हणजे सरकार चा राग आहे तर तो इथे व्यक्त करा. असे. सेफ्टी wall

१५ मंत्री भ्रष्ट हा मुद्दाच नाही.१५ लोकांनी विरोधी मतदान केल तरी अडणार नाहीये.सभागृह सर्वोच्च आहे. मग तरी हा मुद्दा का काढला? कोणतेही आंदोलन पहिल्या दिवशी जे डिमांड करते १०० टक्के पूर्ण होत अस नाही.आंदोलनात २ पावलं मागे पुढे होतच असत.अण्णा ह्यांचा जन लोकपाल नाही तर सरकारी लोकपाल तरी घेता आला असता. काही मागण्या नसतील त्यात पण बर्याचशा मागण्या त्यात पूर्ण होत होत्या.आणि अण्णा सारख्यांना हे समजत नाही अशातला भाग नाही.त्यांची आंदोलन आठवा. ज्या मागण्या त्यांच्या  आहेत त्या १०० टक्के मानल्या अस होता का कधी? एकाच उपोषणात?चाराणे हवे असतील तर एक रुपया मागवा लागतो हे कामगार चळवळ,सामाजिक चळवळ पासूनच सूत्र ह्या टीम ला माहिती नाही अस कस असू शकेल? आणि कदाचित म्हणून अण्णा व टीम मध्ये काही काही स्टेटमेंट मध्ये मतभिनता येत होती.आता तर सुरेश पठारे-अण्णा चे स्वीय सचिव पण मी केवळ अण्णाबाबत बोलणार म्हणतात. ह्यात काय ते समजा.                                   

तसेच राजकीय विश्लेषक म्हणतात कि आता जर हा पक्ष निघाला तर हा पक्ष कॉंग्रेस विरोधी मतांचे विभाजन करणार.तसेच आंदोलनात दलित-मुस्लीम-आदिवासी नाहीत व शेवटी शेवटी आंदोलन हे शहरी भागातच मर्यादित झाले.म्हणजे ह्या पक्षाला शहरी भागात जास्त प्रतिसाद मिळेल.म्हणजे हा पक्ष भाजप ची मत खाणार.त्यामुळे हे कॉंग्रेस चेच हस्तक असतील हि शंका बळावते.   
कुमार सप्तर्षी म्हणतात -
1)अण्णा नि आपली मानगूट लोकपाल मधून सोडवली.
2)आणांच्या एका आंदोलनातले लोक पुढच्या आंदोलनात  नसतात. 

आता अण्णा ह्यातून बाजूला होणार व एखादा नवीन मुद्दा  घेऊन निदान महारष्ट्रात तरी आपली चालते हे दाखवणार.व आपला पूर्वीचा आब परत मिळवणार.हे नक्की.आणि त्यांनी कराव.आमच्या शुभेच्छा. किंवा अगदीच लोकपालच अपयश बोचल असेल तर महाराष्ट्रात विद्यमान लोकायुक्त पद्धतीत सुधारणा करून घ्याव्यात.       

Saturday, March 31, 2012

उद्धवजी आगे बढो,हम तुम्हारे साथ है


ठाण्यात कोन्ग्रेस आपल्याला सपोर्ट करणार हे ऐकून मला उद्धव साहेबांच्या राजकरणाबधल पुन्हा एकदा समाधान वाटल. खरे तर ठाण्यासाठी दादर ला जायची गरज न्हवती.३ जण आपण आधीच फोडले होते. तरी गेले तें गेले.असो.जेव्हा कल्याण डोंबिवलीत पेच निर्माण झाला तेव्हा मोठे साहेब बोलले कि मनसेने कोन्ग्रेस ला पाठींबा द्यावाच,येवू द्या एकदा लोकांसमोर तें.त्या मुळे दादरकर गप्प बसले.

मग इथे दादरचा टेकू घ्याची गरज न्हवती.पण घेतला.व आता जो आकंड तांडव दादरकरांचा चालू आहे तो कशामुळे? नाशिक मुळे कि standing चे अंडर standing जमल नाही म्हणून? जेवढे महाराष्ट्राला दादरकर बाबत माहिती त्यानुसार तें त्या त्या गावच त्या त्या गावापुरत ठेवतात.त्यांच वाक्य -"इथे पाठींबा दिला म्हणून दुसरीकडे द्यावा अस काही ठरलं नाहीये. "

म्हणजे खरी गेम हि.पण कारण पुढे करयचं नाशिकच.आणि काय नाशिक नशिक चालवाल आहे? आम्ही गप बसलो म्हणून तुम्ही आलात ना? आणि राष्ट्रवादी तटस्थ मग त्यांना हे राज्यसभेला मदत करणार.काहीही. तेवढे वाईट दिवस अजून पवार साहेबांचे आलेले नाहीत. तस काही न्हवत.खर हे कि त्यांना स्थायी हवी होती नाही मिळाली मग हे सगळ चालू केल.

पण आमचे उद्धव साहेब काय कच्या गोट्या नाही खेळले.त्यांनी एकाच वेळीस दादर,रेशीमबाग, बारामती सगळ्यांच्या गोट्या बाद केल्या.लय हौस आहे भारत जलाव पक्षाला आमचे चुलते एकत्र आण्याची.घ्या बसवून तुम्हीच उरावर.आम्हाला फरक नाही पडत.उद्धवजी मध्ये म्हणाले ज्यांनी दादरला आमच्या शिवसैनिकांच्या डोक्यात पहिल्या मजल्यावरून नारळ फेकले त्या शिव्सैनाकांची आठवण आहे आम्हाला अजूनही. त्यांच्याशी प्रतारणा आम्ही करणार नाही.

तेव्हा नाद करयचा नाही.सत्ता आम्ही कशी पण आणू.आम्हाला तात्विक गोष्टी शिकवू नयेत.पाठींबा कुणाचाही घेऊ.मराठी माणसासाठी काहीही. हा पण ती सत्ता राबवायला कमी पडलो तर मात्र आम्हाला खाली खेचायचा पूर्ण अधिकार जनतेला आहे दादरला किंवा बारामती ला नाही.

ता.क.स्थायी नाही तर परिवहन द्या. जो देईल तो माझा. मी सत्तेचा,सत्ता देणार्याचा.

अवांतर: मार्मिक वरून साहेबांचे सदर - टपल्या आणि टिचक्या

कर्नाटक पाठोपाठ गुजरात मध्ये भाजप आमदार ब्लू फिल्म बघताना आढळले.---बातमी
तरीच भाजप व मनसे च एवढ हल्ली जमतंय.मनसे कडे ब्लू प्रिंट(?) आहे आणि भाजप कडे ब्लू फिल्म


Tuesday, September 20, 2011

मनी लॉंड्रिंग एन्जिओ- काळा पैसा पांढरा करणार्‍या स्वयंसेवी संस्था!

अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आता व्यक्तींसोबत अशा क्षेत्रांकडेही बोट दाखवले जात आहे की जेथे भ्रष्टाचार फळफळतो आणि ज्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पैसा मिळवून समाजात आपली प्रतिष्ठा वाढवतात. यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे कुठली तरी सामाजिक संस्था स्थापन करणे. अशी एखादी संस्था स्थापन केल्यानंतर त्यासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे ही पहिली गरज बनते. त्यावेळी अशा संस्थांचे संस्थापक आपली शक्ती आणि पदाचा वापर करून पैसा जमवण्यास सुरुवात करतात. यात त्यांना सरकारचे सहकार्य मिळाले तर त्यांच्यासाठी दुधात साखर पडल्यासारखे होते. हिंदुस्थानी राज्यघटनेअंतर्गत ज्याप्रमाणे राजकीय पक्ष बनविण्याचा लोकांना अधिकार आहे, त्याचप्रमाणे सामाजिक संस्था बनविणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचीही तरतूद आहे. याला सर्वसाधारणपणे ‘एनजीओ’ ( अशासकीय किंवा स्वयंसेवी संस्था) असे म्हटले जाते.

सध्या देशात ३ कोटी ४० लाख एनजीओ (स्वयंसेवी संस्था) नोंदणीकृत आहेत. या नोंदणीकृत संस्थांवर एक दृष्टिक्षेप टाकला तर असे दिसून येते की, त्यांच्या संख्येत इ.स. २००० नंतर प्रचंड वाढ झाली आहे. सूक्ष्मपणे अभ्यास केला तर बहुतांश स्वयंसेवी संस्था या नेते, अधिकारी आणि त्यांच्याभोवती फिरणार्‍या लोकांच्याच असतात. त्यांच्या डोक्यावर ज्याचा वरदहस्त असतो तो सरकारात उच्चस्तरीय पदावर विराजमान व्यक्तीशी संबंधित असतो. वास्तविक तो त्यांच्या नावावर कारभार करतो. स्वातंत्र्यापूर्वी अशा स्वयंसेवी संस्था नव्हत्या अशातला भाग नाही. प्रत्येक शहरात कुणी पाण्याची पाणपोयी चालवत होता, मंदिरात भंडारे होत होते आणि श्रीमंत लोक आपल्यातर्फे गरीबांसाठी थंडीमध्ये गरम कपड्यांची व्यवस्था करत होते. शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य सर्वाधिक होते. आपल्या आसपासच्या गावांमध्ये ही हिंदुस्थानी परंपरा आजही थोड्याफार प्रमाणात पाहावयास मिळते. थोडेफार सुखी असणारे लोक गरीबांची मदत करत असत. त्यामुळे आदिवासी आणि वनवासी क्षेत्रात जाऊन काम करणारे असंख्य लोक आपापली संस्था बनवून हे काम करत होते. जागतिक स्तरावर सांगायचे तर लायन्स आणि रोटरी अशाच प्रकारच्या संस्था होत्या. या संस्थांना सरकारच्या पैशाविषयी काहीही देणेघेणे नव्हते. त्यांच्याकडे पैशांचा जास्त ओघही नव्हता, जेणेकरून कुणी त्यात घोटाळा करू शकेल.

परंतु जेव्हा अशा प्रकारच्या संस्था राजकीय आणि संवैधानिक आधारावर अस्तित्वात आल्या तेव्हा त्या ‘एनजीओ’मध्ये परिवर्तीत झाल्या. केंद्र सरकारकडूनच तसेच राज्य सरकारकडूनही त्यांना मदतीसाठी पैसा मिळू लागला, शिवाय समाजसेवा आणि मानवसेवेच्या नावावरही परदेशातून पैसा मिळू लागला, तेव्हा यांच्यामध्ये आर्थिक घोटाळे वाढले. अमेरिकेची आर्थिक परिस्थिती दुबळी आहे, तरीही एनजीओला सहाय्य करण्यासाठी ती मागे राहिली नाही. २००८ मध्ये हिंदुस्थानातील स्वयंसेवी संस्थांना अमेरिकेकडून दोन अब्ज १५ कोटी डॉलर्सची मदत मिळाली.

यूपीए सरकार शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाही, परंतु या सरकारने या स्वयंसेवी संस्थांच्या रकमेत २००५-०६ मध्ये ५५ टक्के वाढ केली. म्हणजे फिरून फिरून हा पैसा खासदार, आमदार, मंत्री आणि नोकरशहांच्या खिशात अप्रत्यक्षपणे पोहोचला. त्यांचे काळे कारनामे जाणण्यासाठी एवढेच पुरेसे आहे की, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कौन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट तथा पीपल्स ऑफ ऍक्शन ऍण्ड टेक्नॉलॉजी जिला संक्षेपात ‘कपार्ट’ म्हटले जाते. तिने आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपात एक हजार स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर प्रतिबंध लादले आहेत.

चिकण्या चेहर्‍याचे ज्या स्वयंसेवी संस्थांचे संचालन करवितात ते वर्षात एक-दोनदा आपल्या चाहत्यांना कुठल्या न् कुठल्या उद्देशाने विदेशात पाठवत असतात. त्यातील कुणी एखाद्या परिषदेला जातो, तर कुणी चर्चासत्राला. एका डाव्या विचारसरणीच्या महिलेने हिंदुस्थानच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या एका सदस्याला मोठ्या अभिमानाने सांगितले की, मी आमच्या ‘एनजीओ’च्या कृपेने जगातील जवळपास सर्व मुख्य शहरांत फिरले आहे. कुणी विज्ञान क्षेत्रात एनजीओ चालवत असेल तर तो संशोधनाच्या निमित्ताने अमेरिका आणि युरोपची वारी करून येतो. ‘एनजीओ’ची लीला अपरंपार आहे. बिचार्‍या प्रामाणिक आणि खरोखर सेवाभावी ‘एनजीओ’ आहेत, त्यांच्या माथी मात्र बदनामीचे भांडे फोडले जाते.

या ‘एनजीओ’ सरकार आणि खासगी संस्थांकडून जो पैसा मिळवतात त्याचा उपयोग कसा केला जातो, ते या पैशाचा हिशेब कशाप्रकारे ठेवतात, यावर तर चर्चा नेहमीच होत असते. परंतु सर्वाधिक खळबळजनक बाब म्हणजे या ‘एनजीओ’ काळा पैसा पांढरा करून ज्याप्रकारे देशद्रोही कारवाया करतात तो सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे. सध्या देशात दडलेल्या काळ्या पैशाची चर्चा सर्वत्र होत आहे. स्वीस बँकेत ठेवलेला काळा पैसा सरकारने हिंदुस्थानात कसा आणावा या मुद्यावर सार्‍या देशाने सरकारवर दबाव टाकला आहे.

फारच थोड्या लोकांना हे माहिती असेल की, ज्या एनजीओंना (स्वयंसेवी संस्थांना) आपण समाजसेवेचा स्तंभ समजतो, वास्तविक त्यांचा वापर मनी लॉंड्रिंगसाठी केला जातो. काळा पैसा पांढरा करण्यात या संस्थांना भरपूर लाभ मिळतो. त्या वाट्टेल तेवढे मानधन वसूल करू शकतात आणि आपले भविष्य सुरक्षित बनवू शकतात. एनजीओंकडे जाणार्‍या लोकांचीही कमी नाही. असे लोक विचारतात की, आम्ही तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून अन्नधान्य, कपडे, औषधी, कांबळी आणि तुमच्या वापरात येणारी स्टेशनरी देऊ केली, तर तुम्ही आम्हाला किती कमिशन द्याल?

जी व्यक्ती आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी एनजीओकडे जाते, ती साधीसुधी तर नसणारच. कोट्यवधीत खेळणार्‍यांचा काळा पैसा याप्रकारे ‘एनजीओ’ पांढरा करत असतील तर त्यांना फायदाच फायदा आहे. ‘एनजीओ’वाल्यांना त्या श्रीमंताकडून मागेल तितकी मदत आणि वस्तूही मोफत मिळतात आणि काळा पैसा पांढरा करण्याचे मागाल तेवढे बक्षीसही! त्यामुळे ‘एनजीओ’ हे असे एक दुकान आहे ज्यात कुणालाही तोटा होत नाही. या एनजीओंकडून काम करवून घेण्यातही कसली भीती नाही. कारण या एनजीओंचे खरे मालक मंत्रालय आणि सरकारमध्येच बसलेले असतात. खोट्या पावत्या देऊन ते काळा पैसा पांढरा करत असतील याची आकडेवारी मिळविणे अशक्य नसले तरी कठीण नक्कीच आहे.

सरकारने अशा एनजीओंना कसा लगाम घालावा याचा विचार करणे आवश्यक आहे. सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्‍न हा आहे की, धोकेबाजीची ही दुकानदारी बंद करण्यामुळे कुणाचे नुकसान होणार आहे?

जर ३ कोटी ४० लाख स्वयंसेवी संस्था भारतात आहेत ह्याचाच अर्थ १२० कोटी जनतेच्या मध्ये प्रत्येक ३५ लोकांच्या पाठी १ स्वयंसेवी संस्था आहे.तरी देशातले प्रश्न का सुटत नाहीत? आज दुर्गम भागात आज किती एन्जिओ पोहोचल्या आहेत? अशा ठिकाणी जिथे खरच गरज आहे तिथे पोहोचणे हे खरच ह्यांचे उद्दिष्ट आहे का? कि थोडफार काम करून, निरनिराळे टी शर्ट,टोप्या घालून मिरवणे आणि फोटो काढून पेपरात छापून आणणे आणि निधी गोळा करणे एवढेच ह्यांचे काम आहे का? नक्कीच आहे.

काही संस्था काम करतही आहेत.पण एवढ्या मोठ्या संख्येने ज्या एन्जिओ दिसतात त्यातील अर्ध्याहून अधिक ह्या काळा पैसा पांढरा करणे-मनी लॉंड्रिंग च्याच कामात आहेत.नाहीतर वर मी जे लोकसंख्या आणिस्वयंसेवी संस्था ह्यांची जी आकडेवारी दिली आहे त्यानुसार तर सगळे प्रश्न सुटायला हवे होते.तसे काही होताना दिसत नाही.

!!जय महाराष्ट्र!!