Thursday, July 28, 2011

दीप अमावस्या (aka गटारी)

आषाढ अमावस्या हल्ली गटारी म्हणून प्रसिद्ध झाली आहे.पण ह्याला खर तर दीप अमावस्या म्हणतात.ह्यादिवशी घरातील दीप -निरांजन-कलश-ताम्हण इत्यादी पूजेचे साहित्य धून- घासून-पुसून ठेवावे हे मुख्य काम त्या दिवशी असते.ह्या दिवशी दिव्याची पूजा करतात.
कारण श्रावण दुसर्या दिवसापासून चालू होणार असतो.व हा अत्यंत पवित्र धार्मिक महिना असतो.ह्या महिन्यात वेग वेगळी पूजा, व्रत वैकल्य,अभिषेक केले जातात.त्यामुळे ह्या सर्वासाठी जे पूजा साहित्य लागते ते पुन्हा जरा घासून पुसून लक्ख करणे हा त्यामागचा उद्देश असतो.
जसे अभिषेक पात्र म्हणा होम कुंड म्हणा हि काही रोजच्या पूजेतील वस्तू नाहीत.तर अशा गोष्टी काढून त्या साफ करून श्रावण महिन्यासाठी सज्ज करणे हा त्याचा उद्देश आहे.

ह्या दिवसाचा नैवेद्य

ह्या दिवशी माझ्या घरी उडदाचे वडे,खीर,पुरी,भाजी,भात,वरण असा नैवेद्य दाखवला जातो.
केळीच्या पानावर जेवण असत.गाईचे पण एक पान वेगळ काढल जात.हा नैवेद्य मला फार आवडतो.हा नैवेद्य बहुदा रात्रीच असतो.(नैवेद्य रात्रीच का? आमवस्या रात्रीच असते असे कारण कळले)बर्याच लोकंकडे ह्या दिवशी पुरणाचा नैवेद्य असतो.

तीर्थरूप ह्या दिवसाला गटारी संबोधून ह्या दिवसाचे धार्मिक महत्व कमी करणाऱ्या लोकांना दिवसातून ३-४ वेळा शिव्या हसडतात.त्यामुळे मित्रांबरोबर मी ह्या दिवशी गटारी साजरी करत नाही.आम्हाला नोन वेज खायचेच नसल्याने आम्हाला बारा महिने श्रावण.माझ्या घराण्यात २८ व्यक्तींपैकी मीच एकटा मासाहार करतो. मग खर्या श्रावणामुळे आमचे कुठे अडते? मग गटारी तरी कशाला?

त्यापेक्षा ह्या दिवसाचे धार्मिक महत्व ओळखून त्यानुसार वागणे बरे असे मला वाटते.आणि हे मला अलीकडे वाटू लागले आहे.लहान होतो तेव्हा कळतच न्हवते.कळू लागले तेव्हाच पिवू लागलो.(११ वीत) मग २-४ वर्ष गटारी म्हणून साजरी केली.पण आता नाही.खाणे पिणे श्रावणात पण चालूच असते.(समोरचा पाजत असेल तर) मग गटारी गटारी चा गळा काढत हा इवेन्ट साजरा का करू? कशाला करयचा?

Sunday, July 24, 2011

सिंघम:परीक्षण-मराठीपण भावलं

सिंघम

कलाकार:अजय देवगण,काजल अग्रवाल,प्रकश राज आणि १६ मराठी कलाकार

संगीत:अजय अतुल

दिग्दर्शक-रोहित शेट्टी

My Ratings:***

रोहित शेट्टी चे विनोदी चित्रपट पाहिले होते.पण action सिनेमा कसा करतो हे बघायचं होत.अजय देवगण चा अपहरण नंतर चा हाच action चित्रपट आहे.(हल्ला बोल कोणाला कळला?) शिवाय अजय अतुल च पहिलाच हिंदी संगीत.(महेश मांजरेकर च्या पिक्चर ला पण होत.पण ते घरचेच आहेत.बाहेरच्या निर्मात्या सोबत हे त्याचं पहिलाच काम) शिवाय सोनाली कुलकर्णी,सचिन खेडेकर,पुष्कर जोग सारखे मराठी कलाकार ह्या मुळे उत्सुकता होती. वेगवेगळी तीन टोक एकत्र आली कि एकतर ते पिक्चर आपटत किंवा खूप हिट होत. पण मी चित्रपट कोणासाठी बघितला तर तो "प्रकश राज" साठी बघितला.wanted पासून मी त्याचा फ्यान झालो.

सिंघम चा उल्लेख मी चिंगम असा केला होता.पण तसा तो नाही.

हा चित्रपट टिपिकल बॉलीवूड पिक्चर ला थोडी सौथ त्रितमेंट देवून बनवला आहे.टिपिकल मसाला action पिक्चर.स्टोरी जुनीच आहे.एक पोलीस विरुद्ध ग्यांग्स्तर.पण अजय देवगण आणि प्रकश राज ह्यांनी उत्तम अभिनय आणि संवाद ह्यामुळे चित्रपट निदान एकदा बघण्यासारखा झाला आहे.प्रकश राज चा अभिनय आणि संवाद बोलण्याची पद्धत(डायलॉग डीलेवारी)वर मी फार फिदा आहे.त्याचा टायमिंग आहे शब्द्फेकीच.त्याने मजा येते.

सौथ स्टायल म्हणाल तर अजय देवगण प्रकश राज कडे जावून त्याला आव्हान देतो किंवा तो पोलीस स्टेशन मध्ये येवून त्याला बोलतो हे प्रसंग व त्यातील संवाद हे कितेक सौथ सिनेमात पाहिले आहेत.

शेवट चांगला झाला आहे.आणि त्यात जी विनोद निर्मिती आहे ती चक्क प्रकश राज कडून व्हिलन कडून झाली आहे.प्रकश राजच हे वेगळेपण आहे.एकाचवेळी राग येईल अशी काम आणि हास्याला येईल असे वाक्य हे त्यालाच जमू शकत.खंडणी मागायची त्याची पद्धत- सोलिड राग पण येतो आणि त्याची बोलण्याची ढब पाहून हसायला पण येते.

अजय अतुल च संगीत ठीक आहे.अगदी एक नंबर वैगेरे म्हणणार नाही.त्यांनी क्लब बेसड मुजिक(जे हल्ली सगळेच देतात) न देता सिनेमा बेस मुजिक दिल आहे.

सिंघम च मराठीपण भावलं

त्यात मराठी वाक्य-माझी सटकेल,आता माझी सटकली,आईच्या गावात.त्याने मजा आली.आजवर हिंदीतला मराठी माणूस म्हणजे कामवाली बाई आणि फार तर मंत्री-पोलीस ते हि भ्रष्ट हेच होत.(अपवाद असतीलही).एक दोन मराठी वाक्य त्यांच्या तोंडात घातली कि झाल.पण ह्या चित्रपटात तस नाही.मराठी वाक्य बर्यच पात्रांच्या तोंडी आहे.जसे आपण पंजाबी पिक्चर पाहून बरेच पंजाबी शब्द समजू लागलो तसे मराठी इतर लोकांना का कळणार नाही.हे लक्षात घेवून आजवर पंजाब दाखवताना जेवढी पंजाबी भाषा ह्या हिंदिवाल्यानी दाखवली तेवढीच मरठी ह्या चित्रपटात आहे.हि गोष्ट जास्त महत्वाची आहे असे मला वाटत.

अवधूत गुप्ते आणि गौतम राजाध्यक्ष ह्यांनी दाजीबा आणि विंचू चावला गाणी दिल्ली हरयाणा पंजाब मध्ये फुकट सीडी वाटून प्रसिद्ध केली.महेश मांजरेकर आणि आणि मधुर भांडारकर ह्यांनी बर्याच मराठी कलाकारांना हिंदीत इतर कलाकार म्हणून आणले.त्याचाच हे फळ आहे.ह्यात आईच्या गावात- सटकली सारखे मराठी शब्द असल्यामुळे काही कोणी गळे काढण्याची आवश्यकता नाही.इतर लोकांना समजेल अशीच हि भाषा आहे.(इतर लोकांना सदाशिव पेठी भाषा कळणार आहे का?)

पिक्चर टिपिकल बॉलीवूड -सौथ मिश्रण-अंग्री यंग म्यान स्टायल असला तरी ह्या चित्रपटाच्या माध्यामातून मराठीला हिंदीच्या मुख्य प्रवाहात मिळालेले स्थान हे मला जास्त महत्वाचे वाटते.

Friday, July 15, 2011

बिगर मुसलमानांवर 10 टक्के 'जिझिया'कर! 'दारूल उलुम देवबंद' या मुस्लिम संघटनेचा फतवा!!

'दारूल उलुम देवबंद' या मुस्लिम संघटनेचा फतवा!!

नागपूर/विनायक पुंड

मुस्लिमबहुल भागात राहणार्‍या बिगर मुसलमानांनी आपल्या

महिन्याच्या उत्पन्नापैकी 10 टक्के रक्कम 'जिझिया' कर म्हणून द्यावी, असा फतवा 'दारूल उलुम देवबंद' या मुस्लिम संघटनेने काढला आहे. अशा आशयाची पत्रके नागपूर येथे वाटण्यात आली आहेत. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

दारूल उलुम देवबंद इंडिया या संघटनेची 'जिझिया' करासंबंधीची पत्रके नुकतीच नागपूर शहरात आढळून आली आहेत. हा देश 'इंडिया' कधीच हिंदूंचा नव्हता. या देशावर मुसलमानांनी वर्षानुवर्षे राज्य केले आहे. मुस्लिमबहुल भागात मुसलमानांचेच 'शरिया' कायद्यानुसार राज्य असावे, अशी आमची 'तहरिक-ए-तालिबान- हिंदुस्थान'ची मागणी आहे. यानुसार मुस्लिमबहुल भागात राहणार्‍या बिगर मुसलमानांना 'मुलीम' अंतर्गत राहणे व काम करण्याकरिता 'जिझिया' कर द्यावा लागेल, असे आवाहन या पत्रकातून करण्यात आले आहे.धर्मपरिवर्तनाद्वारे आमचा इस्लाम धर्म स्वीकारून सुखरूप राहा किंवा आमच्या अटीनुसार 'जिझिया' कर द्यावा, अन्यथा

आमच्यासोबत लढण्याकरिता तयार राहावे. आपण आपल्या महिन्याकाठी असलेल्या उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम प्रत्येक

महिन्याच्या 1 तारखेला स्थानिक मुस्लिम फंडात जमा व्हायला पाहिजे. या आदेशाला न मानणार्‍या किंवा याकडे लक्ष न देणार्‍याला भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर 'दारूल उलुम देवबंद इंडिया' असे संघटनेचे नाव देण्यात आले असून ई-मेल अँड्रेस व मोबाईल फोन आणि फॅक्स नंबरही देण्यात आला आहे.मुस्लिम राजवटीत औरंगजेबाच्या कारकिर्दीत 'जिझिया' कर लावण्यात आला होता. 'दारूल उलुम देवबंद' या संघटनेने नागपूरसह अन्य शहरातही नमूद पत्रके वाटली असल्याचे वृत्त आहे.

----------

संबंधित वृत्त आज १४ जुलै २०११ च्या नागपूर पुण्य नगरी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.

Link- http://www.punyanagari.in/epapermain.aspx?queryed=9&eddate=07%2f14%2f2011

---------------

आता मला खालील प्रश्न पडले आहेत.

१) परवा मुंबईत ३ बॉम्ब फुटले तेव्हा "दहशत वादाला धर्म नसतो " म्हणणारी गांडू ची औलाद कुठे गेली?

२) हीच गांडूची औलाद आम्हाला सांगत होती -"बॉम्ब स्फोटात राजकारण आणू नये.रालोआ आघाडी च्या काळात पण बॉम्ब फुटले" पण राहुल बाबा च्या बेताल वक्तव्याचा निषेध करायला हि बेगडी निधर्मी (छुपी कोन्ग्रेसी) मंडळी आली नाहीत.

३) कुठे गेले ते घटनेचे रक्षक? हे फतवे घटने विरुद्ध नाहीत काय? कि शहा बानो प्रमाणे ह्या वेळी पण शेपट्या घालणार? आणि खैरलांजी- रमाबाई वरून कोकलणार?

४) पुरुष नसलेला खेडेकर आणि दरिद्री कोकाटे ह्यांना झिजीया देणे मान्य आहे काय?हा मराठ्याचा अपमान नाही काय?

हिंदुनो गांडू राहिलात तर दांडू जाईल.वेळीच जागे व्हा.

जय महाराष्ट्र! जय हिंदुराष्ट्र!


Wednesday, July 13, 2011

निषेध बॉम्बस्फोटाचा आणि कसाब ला दोनदा जन्माला घालणाऱ्या मिडीयाचाही.

आज दिनांक १३ जुलै २०११

झवेरी बाजार,ओपेरा हाउस व दादर च्या बॉम्ब स्फोटाचा तीव्र निषेध.मृत व्यक्तींना श्रद्धांजली,जखमी लोकांसाठी प्राथना.

पण सगळ्यात जास्त निषेध करावासा वाटतो तो मिडीयाचा.का? -

कसाब चे दोन दोन बर्थडे : पहिला १३ सप्टेबर आणि दुसरा १३ जुलै.

पहिला १३ सप्टेबर हा दिवस बर्थडे म्हणून २००९ (आज पासून साधारण २ वर्षे आधी) साली बर्याच मोठमोठ्या वर्तमानपत्रांनी सांगितला होता अगदी जेल आणि कोर्टरेकॉर्ड म्हणून

उदा : http://www.indianexpress.com/news/kasab-turns-22-today-but-no-cake-in-jail-for-him/516508/%E0%A5%A6

आज तो सरकून २ महिने पुढे आला १३ जुलै , बहुतेक कसब मराठी तिथी प्रमाणे बर्थडे सेलेब्राते करत असावा नाही तर दोनदा जन्माला आला असावा.

वारे भारतीय मेडिया बनवा उल्लू अजून आमच्या सारख्या जनतेला.

Saturday, June 18, 2011

बहुजन समाज म्हणजे काय?मला तरी हा शब्द फसवा वाटतो.

हल्ली जो कोणी सोम्या गोम्या उठतो तो बहुजन समाज, बहुजन समाजावर अन्याय झाला हो अशी बांग देतो.मग मला प्रश्न पडतो कि बहुजन म्हणजे काय? मग मी जरा विचार केला.ह्या शब्दाचा मराठी-हिंदी भाषेतील अर्थ व बहुजन बहुजन म्हणून ओरडणारे ह्यांची जात लक्षात घेण्याचा यत्न केला असता मी गोंधळलो.

हा शब्द बहुतेक ब्राम्हण(धर्म सत्ता) ,मराठा(राज सत्ता) व्यतिरिक्त उरलेले जे समाज -जाती आहेत त्यासाठी वापरला जात असावा अशी माझी धारणा होती.पण इथे ओर्कुटवर-फेसबुकावर काही मराठा लोकांना स्वतःला बहुजन म्हणवून घेताना पहिले आहे.त्यामुळे गोंधळ उडाला आहे.

जर मराठी भाषा म्हणून बहुजन शब्दाचा अर्थ शोधण्याचा यत्न केला. तर ह्या शब्दात एखादी जात किंवा काही जातींचा समूह अपेक्षित असावा असे त्या ओरडणाऱ्या लोकांकडे पाहून वाटत होते.मग मी भाषेतील त्या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला.तर तो असा-

बहु = मोठा आणि जन = लोक

म्हणजे ज्यांची संख्या मोठी ते लोक.मग त्यातून जात कशी काय अपेक्षित असेल?

उदा. क्रिकेट वेडी मंडळी.देशात फार थोड्या लोकांना क्रिकेट आवडत नाही.मग ज्यांना आवडते ते बहुजन झाले नाहीत काय? ह्यात सगळेच आले ना.हिंदू धर्मातील जातीच कशाला? त्या तर आहेच शिवाय अन्य धर्मीय व पंथीय पण आलेच ना?

मुंबईत बरीच लोक लोकल ने प्रवास करतात मग ते बहु- जन लोकल ने प्रवास करतात म्हंटल तर त्यात व्याकरण शास्त्रानुसार त्यात वावगे ते काय?ह्यात कुठे आली जात?

अजून खोलात विचार केला तर:

जास्त संख्या असणे म्हणजे बहुजन तर मग केवळ मराठा समाज हाच बहुजन असणार नाही का?कारण मराठा व कुणबी धरून हा समाज जवळजवळ ३०-३५ टक्के आहे असे बर्याच ठिकाणी उल्लेख आहे. मग बाकी जातींचे काय?मग ते कसे काय स्वतला बहुजन म्हणवून घेतात.

किती गोंधळाचा शब्द आहे.मला तरी हा शब्द फसवा वाटतो. ह्यावर चर्चा व्हायला पाहिजे.

Tuesday, May 17, 2011

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग ६)


आज २६ एप्रिल चेर्नोबिल अणुस्फोट दुर्घटनेला २५ वर्षे झाली. याच स्फोटात लाखो निरपराधांना आपले प्राण गमवावे लागले, इतकेच नव्हे तर आजही जन्माला येणारे सजीव व्यंग घेऊनच जन्माला येत आहेत. जपानच्या फुकुशिमामध्ये घडलेली दुर्घटना आपण पाहिलीच आहे. या दोन्ही घटना जैतापूरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडत आहेत. सर्वसामान्यांना फक्त अणुऊर्जा देशाची गरज असल्याचे दाखवून जनतेचा पाठिंबा मिळवू पाहणारे सरकार याच्या दुष्परिणामांबद्दल का बोलत नाही? कोकणाकडे कधीही चांगल्या गोष्टींसाठी दुर्लक्ष करणारे सरकार यावेळेस मात्र मेहरबान झाल्याचे आव का आणत आहे, यातील दुष्परिणाम पाहता कोकण संपविण्याचा तर प्रयत्न यांचा नाही ना? अशा शंका घ्यायला वाव आहे.

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रमया लेखमालिकेतील आजचा हा शेवटचा भाग. मागिल भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा व आता पुढे...

इतिहासाचा विकृत वारसा

दुस-या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर अणुबाँम्ब निर्मितीने वेग घेतला. याच काळात वैज्ञानिक इतिहासात प्रथमच वैज्ञानिकांचा, विशेषत: पदार्थविज्ञानाचा अणुशास्त्रज्ञांचा गुप्ततेशी संबंध आला. १९४० पासून लष्कराशी संबंध आल्यावर हा गुप्ततेचा पडदा अधिक गडद झाला. मुळातच हा लष्कराचा संबंध अनिष्ट होता. त्यातून आली सर्वंकष गुप्तता. जनतेच्या जीवनाशी, आरोग्याशी खेळ सुरू झाला. असा खेळ करण्याचा अधिकार यांना कुणी दिला?

त्या काळात हिटलरच्या आधी बाँम्ब बनविण्याच्या उद्दिष्टाने अनेक शास्त्रज्ञ भारावले होते. परंतु हिटलरच्या पराभवानंतर या उद्दिष्टाचे रूपांतर जेव्हा युध्द संपविण्याच्या आत बाँम्ब बनविण्यात आले तेव्हा आपली चुक शास्त्रज्ञांच्या लक्षात आली. पण तोवर वेळ निघून गेली होती. आता राजकारणी, लष्करी अधिकारी आणि अभियंत्यांना त्याचा कसेही करून वापर हवा होता. आणि लक्ष्य ठरला जपान, त्यातही त्यांचा नागरी विभाग. अमेरिकेचा पूर्वेकडील युध्द आघाडीचा उमदा सेनापती डग्लस मॅकार्थर हा खुद्द अण्वस्त्राच्या वापराच्या विरोधात होता. त्याने तीन महिन्यात जपानला शरण आणून युध्द समाप्ती करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अणुबाँम्ब बनविणा-या शास्त्रज्ञांसह सर्वांकडे दुर्लक्ष करून हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबाँम्बचा वापर केला गेला. मानवाच्या सर्वंकष दहशतीच्या आणि संहाराच्या सत्रात प्रवेश झाला. याच इतिहासाचा विकृत वारसा अणुक्षेत्रातील उच्चपदस्थ चालवितात.

हिरोशिमा, नागासाकीतील अणुबाँम्बच्या किरणोत्साराचे दुष्परिणाम पुढच्या पिढ्याही भोगत आहेत. यातच अणुऊर्जेची भीषणता आहे. अणु बाँम्बच्या वापरानंतर जगभरात अणुविरोधी लाच उसळली. परंतु तोपर्यंत या पाशवी शक्तीची राजकारणी आणि लष्करशहांना चटक लागली होती.

अणुभट्टयांतून प्लुटोनियनम या अधिक संहारक बाँम्बना जन्म देऊ शकणा-या समस्थानिकाची निर्मिती होत होती. म्हणून क्लुप्ती काढली गेली. शांततेसाठी अणुअशी नवी घोषणा जिनेव्हा येथील परिषदेत १९५५ साली दिली गेली. वीजेची निर्मिती हे केवळ निमित्त होते. कारण त्यामुळे भट्ट्या चालवता येणार होत्या. ती नगण्य असणार याची अणु प्रवर्तकांना पूर्ण जाणिव होती. दुर्दैवाने जगभरातील जनतेला आजही याची जाणीव नाही. आणि तथाकथित वीजनिर्मितीच्या विधायक वापराचा मुखवटा घालून अण्वस्त्रप्रसार मात्र जोरात चालू राहिला.

जैतापूर प्रकल्प आणि अणुकार्यक्रम हा देशासाठी कर्जाचा साफळा

मुळातच अणुऊर्जा अयोग्य आहे आणि जैतापूर प्रकल्प अनिष्ट आहे. त्यामुळे कोणती कंपनी हा प्रकल्प करणार हा प्रश्नच गैरलागु आहे. तरीही जनतेपर्यंत काही माहीती पोहचणे गरजेचे वाटते.

फ्रान्सची अरेवा ही सरकारी कंपनी हा प्रकल्प करू इच्छिते. या कंपनीची युरेनियम प्रेशराईज्ड रिएक्टर ही अणुभट्टी बांधण्याचा फिनलंड देशातील प्रयत्न त्या देशाला चांगलाच तापदायक ठरला आहे. त्या देशाच्या मंत्र्यांनी याबाबत पश्चात्ताप व्यक्त केला आहे. तेथील नुतनीकरणक्षम, प्रदुषणरहित ऊर्जास्त्रोतांसाठी ठेवलेला पैसा या अणुभट्टीमुळे खर्च झाला. विलंब वाढत गेला व खर्च अनेकपट झाला आहे. देश त्यात पोळून निघाला. फ्रान्सला फ्लॅमव्हिले भट्टीबाबत असाच अनुभव आला.

अरेवाच्या भट्टीत सुमारे २१०० दोष संबंधित यंत्रणेने दाखविले, ज्याचे स्वरूप धोकादायक आहे. फ्रान्सने अणुऊर्जादेखील कार्बन ऊत्सर्जन करते हे लपविले आहे. तरीही फ्रान्स देश क्योटो शिष्टाचाराने घालून दिलेले कार्बन ऊत्सर्जन कमी करण्याचे उद्दीष्ट पार पाडू शकला नाही. फ्रान्स वीज उत्पादनापैकी ७८ टक्के उत्पादन अणुऊर्जेद्वारे करते याचा वारंवार उल्लेख केला जातो. परंतु त्याच्या एकूण ऊर्जाउत्पादनात अणुवीजेचे प्रमाण फक्त १७ टक्के आहे हे सांगितले जात नाही. खर्चिक अणुऊर्जा कार्यक्रम हे फ्रान्सच्या गळ्यातील लोढणे ठरले आहे. युरोप व अमेरिकेत अणुऊर्जेविरोधात जनमत असल्याने हा उद्योग धोक्यात आला आहे म्हणून त्यांच्या कंपन्या चालू ठेवण्यासाठी भारताला बळीचा बकरा बनविला जात आहे. चेर्नोबिलपासून युरोपने, तर थ्रीमाईल्स दुर्घटनेपासून म्हणजे १९७९ पासून अमेरिकेने नव्या अणुभट्टी बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला नाही.

सध्याच्या जैतापूरच्या फक्त सहा अणुभट्ट्यांसाठी देशाला एकूण एक लाख ऐंशी हजार कोटी रूपये मोजावे लागणार आहेत. इतर खर्च वेगळा होईल. हा पैसा कर्जरूपाने उभारला जाईल व अनायसे हा देश जागतिक बँकेच्या म्हणजे पर्यायाने अमेरिकेच्या दावणीला बांधला जाईल. त्यानंतर हे कर्ज फेडले जाणार नसल्याने अमेरिका व इतर पाश्चात्य देश भारताच्या नैसर्गिक संसाधनावर ताबा मिळविणार आणि अनेक धोरणे व निर्णय त्यांना हवे तसे घेण्यास भारताला भाग पाडणार. खरेतर हे सध्याच चालू आहे. संभाव्य भ्रष्ट्राचार हा मुद्दा आहेच. नुकतेच स्वीस बँकेच्या संचालकाने सांगितल्याचे प्रसिध्द झाले आहे की, काही भारतीयांचा २०० लाख कोटी रूपये एवढा पैसा स्वीस बँकेत जमा आहे. हा पैसा विकासकामांच्या पांघरुणाखालीच जमा झाला हे जनतेने लक्षात घ्यायला हवे. आर्थिक मारेक-याचा कबुलीजबाब (confessions of a economic hit man) या ग्रंथात लेखकाने प्रकल्प लादण्याची पध्दती उघड केली आहे.

चेर्नोबिलच्या नुकसानभरपाईची रक्कम तेव्हा सुमारे २५ लाख कोटी रूपये एवढी प्रचंड होती. भारतासारख्या दाट वस्तीच्या देशात काय घडेल त्याची कल्पना करावी. त्यामुळेत विमा कंपन्या अणुभट्ट्यांचा विमा उतरवीत नाहीत. कारण एखादा अपघात त्यांचे दिवाळे काढू शकतो. यातून भट्टी बांधणा-या कंपन्यांना वाचविण्यासाठी सरकारने संसदेत अलिकडे विधेयक संमत करून फक्त सुमारे दिड हजार कोटी रूपये ची मर्यादा घातली आहे. याचा अर्थ हा प्रचंड बोजा भारतीय जनतेवर पडणार शिवाय किरणोत्सारामुळे भावी पिढ्यांमध्ये होणा-या आजारांची जबाबदारी कोण घेणार?

एका एक हजार मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीत हिरोशिमासारख्या एक हजार अणुबाँम्बचा किरणोत्सार सामावलेला असतो. अणुभट्टी स्विकारणे म्हणजे कोकणवासियांनी रोज उशाशी हजारो अणुबाँम्ब घेऊन झोपण्यासारखे आहे. यातून यातील गांभिर्य लक्षात येईल. पंचवीस वर्षांपूर्वी घडलेल्या भोपाळ दुर्घटनेबाबतचा आपल्या सरकारचा लज्जास्पद अनुभव पाहता अणुअपघातामुळे काय हाहाकार होईल याची कल्पना करावी.

डॉ. गॉफमन यांनी उद्गार काढले आहेत की, अणुतंत्रज्ञानाला मानवी चेहरा नाही.
जैतापूरचे सत्य आणि अणुचा हा महाभ्रम ओळखून आपल्या भावी पिढ्यांच्या आणि जीवसृष्टीच्या निरोगी अस्तित्वासाठी निसर्गसमृध्द कोकणाच्या निकोप पर्यावरणासाठी कार्यरत होऊ. जैतापूर प्रकल्प रद्द करवून घेऊया आणि अणुचा महाभ्रम झुगारून देऊ या.

एक मुखाने गर्जा, नको अणऊर्जा

धन्यवाद,

आपला

गिरीश राऊत
फोन २४३७८९४८
दूरध्वनी ९८६९०२३१२७

समाप्त

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग ५)


चालू अणुभट्टी हीच एक सततची दुर्घटना!

दुर्घटना कायमची – कारण अणुभट्टी शांतपणे सुरु आहे असे वाटले तरी सतत किरणोत्साराचे उत्सर्जन व प्रसारण होत राहते. भट्टीपासून ३५ किमीच्या परिघात तर हा प्रभाव तीव्र असतो. भट्टीतील किरणोत्सारी वायु व द्रव्ये वातावरणात अधुन मधुन सोडली जातात त्यांना व्हेंट म्हणतात. भट्टीतील किरणोत्सारी गंज तसेच किरणोत्सारी पाणी नजिकच्या नदी, तळे वा सागरात वरचेवर सोडली जातात, त्यास क्रुड म्हणतात. वातावरण व जमिन तसेच जलसाठे किरणोत्साराने प्रदुषीत होत राहतात. पृथ्वीवर पूर्वी कधीही अस्तित्वात नसलेली शेकडो भयानक स्वरूपाची किरणोत्सारी अणुकेंद्रके व द्रव्ये भट्टीत निर्माण होतात व पृथ्वीच्या पर्यावरणात शिरतात यांची किरणोत्साराची प्रक्रिया काही तासांपासून ते शेकडो, हजारो, लाखो किंवा कोट्यावधी वर्षे चालू राहते. मानवासह सर्व सजीवांना हा अनंत काळासाठी असणारा धोका, अणुभट्टीच्या चाळीस ते साठ वर्षाच्या वीजनिर्मिताच्या अत्यल्प काळात निर्माण होतो.

किरणोत्सार हा जीवनाचा मुळ घटक असलेल्या पेशींवर आघात करतो. कॅन्सरचे विविध प्रकार, जन्मजात व्यंगे, इंद्रिये निकामी होणे, मतिमंदत्व, अर्भके बालकांमधील पुढील असंख्य पिढ्यांमधील दोष व व्यंग, मासिक पाळीविषयी समस्या, वंध्यत्व, अशक्तपणा अशा अनेक व्याधी होतात हे निर्विवाद सिध्द झालेले आहे. याशिवाय होणा-या असंख्य व्याधींबाबत अजुनही वैद्यक शास्त्रास पुरेशी कल्पना आलेली नाही.

सुप्रसिध्द अणुवैद्यक तज्ञ डॉ. हेलन कॉल्डीकॉट आपल्या अणुचे खुळ या ग्रंथात म्हणतात, एक डॉक्टर म्हणून मला खात्रीने सांगावे लागते की अणुतंत्रज्ञानात पृथ्वीवरील जीवनाचे उच्चाटन करण्याची धमकी सामावली आहे. जर सध्याचाच कल चाली राहिला तर आपण श्वास घेतो ती हवा, खातो ते अन्न आणि पितो ते पाणी लवकरच एवढ्या प्रमाणात किरणोत्सारी प्रदुषकांनी प्रदुषित होईल की त्यामुळे मानवजातीने कधीही न अनुभवलेला आरोग्याचा धोका निर्माण होईल.

महत्वाचे म्हणजे कर्मचारी आणि कामगारांना त्यांच्या शरिरात किती किरणोत्सार गेला आहे याचा अहवाल दिला जात नाही. कॅन्सरसारख्या आजारात प्रत्यक्ष प्रगट होण्याचा काळ दिर्घ असल्याने अणुउद्योग त्याची जबाबदारी टाळतो.

गळती झाल्यास होणारी किरणोत्सार हा नैसर्गिक किरणोत्सापेक्षा कमी असल्याचे ठोकून दिले जाते. मात्र डॉ. कॉल्डीकॉट व इतर वैज्ञक तज्ञ व शास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की, कोणताही मानवनिर्मित किरणोत्सार हा घातकच ठरतो. कारण ती नैसर्गिक किरणोत्सारात होणारी भर असते.

अनेकदा अणुउद्योगातील कामगार कर्मचा-यांना सांगितले जाते की, तुमच्या शरिरात गेलेल्या किरणोत्साराची मात्रा अत्यल्प आहे. परंतु अशी अत्यल्प मात्रा सातत्याने जात असल्याने त्याचा एकत्रीत होणारा परिणाम हा मोठ्या मात्रेएवढा असतो. शिवाय किरणोत्साराची कोणतीही किमान सुरक्षा मात्रा नसते. परंतु अज्ञानामुळे काम करणारी माणसे आपण सुरक्षित आहोत अशी भ्रामक कल्पना बाळगतात. जेव्हा कर्करोग किंवा इतर घातक व्याधी लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अत्यंत तीव्र किरणोत्साराच्या जागी मुद्दामच हंगामी कामगार-कर्मचा-यांना नेमले जाते. त्यांना कामावरून काढले जाते. भावी आयुष्यात होणा-या प्राणघातक-दुर्धर व्याधींबाबतची जबाबदारी अर्थातच अणुउद्योग झटकून टाकतो.

किरणोत्सारी अणुकेंद्रकांमुळे फळे, मासे, पिके, दुध, मांस, जमीन, जलस्त्रोत इत्यादी प्रदुषित होतात. अशा अन्नाच्या सेवनामुळे मानवी शरीर प्रदुषित होते. म्हणूनच अणुभट्ट्यांच्या परिसरातील वातावरणात व जलस्त्रोतांत सोडले जाणारे किरणोत्सारी प्रदुषण स्थानिक तसेच विस्तृत परिसरातील अन्नस्त्रोतांना प्रदुषित करते. यामुळेच तेथील फळे, मासे, पिके, दुध, मांस इ. निर्यातदेखील शक्य होत नाही. कोकणात आंबे, काजू व इतर फळे, पिके, मांस, मासे यावर याचा विपरीत परिणाम होणार आहे. येथे अणुप्रकल्प आल्यास परदेशांतील जागृत झालेला ग्राहक येथील उत्पादनांस नकार देणार आहे.

चेर्नोबिल, थ्रीमाइल्स आयलंड, चेल्याबिन्स्क, विंडस्केल, हॅनफोर्ड स्वरुपाची भावी दुर्घटना

चेर्नोबिल अणुभट्टीचा स्फोट २६ एप्रिल १९८६ रोजी झाला. या दुर्घटनेत निर्माण झालेल्या किरणोत्साराचा वर्षाव युरोपातील २० देशांत प्रामुख्याने झाला. युनोच्या अहवालाप्रमाणे हा वर्षाव हजारो किलोमीटर अंतर कापून अटलांटीक महासागर ओलांडून कॅनडा या देशात व पुढे प्रशांत महासागराच्या पलिकडे पार जपानपर्यंत पोचला. दुर्घटनेपासून काही वर्षात लाखो माणसे किरणोत्साचे बळी गेली. या दुर्घटनेच्या वीसाव्या स्मृतीदिनाच्या प्रसंगी २००६ सालातील भाषणात युनोचे सरचिटणीस कोफी अन्नान यांनी म्हटले की, आजही सुमारे सत्तर लाख माणसे किरणोत्साराने बाधित आहेत. त्यापैकी तीस लाख बालके आहेत आणि अशी शक्यता आहे की, ती बालके प्रोढावस्था गाठण्याआधीच मृत्यूमुखी पडतील. चेर्नोबिल होऊन खुप काळ लोटला. आता तेच तेच काय सांगता असे म्हणणा-यांना इतर आजार आणि किरणोत्साराचे आजार व इतर अपघात आणि अणुभट्टीचा अपघात यातील फरक समजलेला नाही. किरणोत्सार पुढील अगणित पिढ्यांमध्ये अस्तित्व दाखवत राहतो. कारण तो पुनरुत्पादनाच्या पेशी व जनुक गुणसुत्रांवर आघात करतो, बदल घडवतो.

चेर्नोबिल अणुभट्टीपासुन ३० किमी त्रिज्येच्या वर्तुळातील माणसांना कायमचे इतरत्र हलविले गेलेले आहे. पिप्रियाट हे चेर्नोबिल येथील कर्मचा-यांच्या निवासाचे शहर याच क्षेत्रात येते. हे ५०००० लोकवस्तीचे शहर आता कायमचे निर्मनुष्य झाले आहे. मोटार आणि विमान अपघात होत नाहीत काय? असे म्हणणा-या अज्ञानी अणुसमर्थकांनी अणुअपघात आणि इतर अपघातातील फरक लक्षात घ्यावा. अशीच परिस्थिती रशियातील किश्तिम या शहराजवळच्या भूभागात आहे. चेल्याबिंन्स्क येथील दुर्घटनेनंतर येथील शेकडो किमीचा प्रदेश एखाद्या जीवन नसलेल्या परग्रहाप्रमाणे भयाण, वैराण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जैतापूरचा प्रकल्प मुंबईसह महाराष्ट्र भारतावरील संकट ठरणार आहे.

पृथ्वावरील जीवनाची निर्मिती आणि त्यातील बहुविविधता हा खरा विकास होता. ती खरी प्रगती होती. हायड्रोजन या प्रथम क्रमांकाच्या मुलद्रव्यापासून पुढे ९२ मुलद्रव्यांची निर्मिती, त्याला मिळालेली चैतन्याची जोड व त्यातून अवतरलेले सजीव असा हा जीवन फुलवणारा प्रवास होता. मात्र विज्ञानाच्या अपु-या आकलनाने आणि तंत्रज्ञानाला विज्ञान मानण्याच्या चुकीमुळे पुन्हा उलट प्रवास सुरु झाला. जीवन संपुष्टात आणणा-या भंजनाकडे आणि किरणोत्सार्गाकडे होणारा प्रवास ही अधोगती व विनाश आहे. निसर्गाने अणु जोडले होते मानवाने उन्मादात, अज्ञानापोटी ते तोडले. पदार्थाच्या, द्रव्याच्या सर्वात छोट्या कणाला म्हणजेच अणुला तोडण्याच्या मानवाच्या प्रमादामुळे निर्माण झालेल्या किरणोत्साराने सजीवांच्या घडणीचा, बैठकीचा मुलभूत आधार असलेल्या पेशीचे, त्याचा भावी आराखडा असेलेल्या जनूकाचे भंजन केले. भंजनाच्या अनियंत्रीत शक्तीद्वारे प्राप्त झालेल्या अणुबॉंम्बच्या संहारक उपलब्धीमुळे माणूस बेहोश झाला. पण या नादात त्याने किरणोत्साराला म्हणजेच पर्यायाने पेशींच्या अनियंत्रीत भंजनाला व वाढीला, एका संहारक प्रक्रियेला, कर्करोगाला व इतर व्याधींना मोकाट सोडले. अणुऊर्जेच्या राक्षसाला पुन्हा बाटलीत बंद केल्यानेच जीवन वाचवता येईल.

अनंत पसरलेल्या पृथ्वीवरील जीवन अतुलनीय आहे. त्याच्यासमोर चलन, पैसा किंवा तंत्रज्ञान या क्षुद्र गोष्टी आहेत. हे जीवन जपण्याची मोठी जबाबदारी मेंदूचा विकास झालेल्या मानवावर आहे. कारण निसर्गानेच दिलेल्या मेंदूच्या क्षमतेचा गैरवापर तो करत आहे.

चेर्नोबिलसारखी प्रचंड किरणोत्साराची दुर्घटना, एखादा दहशतवादी हल्ला किंवा गुन्हेगारी मानसिकता असलेल्या गटाच्या अथवा देशाच्या हाती प्ल्युटोनियम पडणे अशा शक्यतांची टांगती तलवार अणुकार्यक्रमाच्या प्रसारामुळे मानवजातीच्या डोक्यावर राहणार आहे. अणुभट्ट्यांमधून अणुबॉंम्ब निर्मितीसाठी आवश्यक अशा प्लुटोनियमची मोठी निर्मिती होत असते. एका एक हजार मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीला वर्षाला तीस ते पन्नास अणुबाँम्बसाठी पुरेसे ठरेल एवढे प्लुटोनियम (सुमारे ३०० ते ५०० किलो) तयार होते. अण्वस्त्रप्रसाराला आळा घालणे त्यामुळे अशक्य बनते. आज पृथ्वीवरील जीवनाला शेकडो वेळा नष्ट करू शकतील इतके अण्वस्त्राचे साठे करून ठेवले आहेत. वीजनिर्मितीच्या नावाने साळसुदपणे चालणा-या अणुभट्टयांचे हे छुपे भयावह रुप आहे. अनेक देशांना त्याचेच आकर्षण आहे.

क्रमश: