Thursday, March 31, 2011
आजचा सवाल? खेळातल राजकारण!
गिलानी आले -
1)ते काय गिळलेला पाक व्याप्त काश्मीर चा तुकडा घेवून आले ?
2)कि त्यांच्या इशार्यावर भारतातील आतंकवादी कारवाई थांबणार आहेत?
3)किंवा हाफिज सेद ला आपल्या ताब्यात देणार आहेत?
4)कि आपल्याला पाकी भूमी वर लष्करी तळ उभे करून दहशतवादी तळ जेथे आहेत त्यावर हल्ले करून ते बेचिराख करू देणार आहेत?
मजबूर सिंघ तुम्ही काय करणार?
घोटाळे जावू दे हो. खापर तुम्ही आघाडीच्या राजकारणावर व स्वतःच्या पक्षातील नालायक लोकांवर फोडलेच आहे.
पण एका लढवय्या अशा धर्माचे-कौम चे तुम्ही आहात ज्याची स्थापना हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी झाली.मग काय कर्तव्य बजावणार? देशाचे?धर्माचे? बोला हे -
युनो मध्ये पाक व्याप्त काश्मीर ची मागणी(जी नेहरू घेवून गेले.अशा वेळेला जागतिक प्रश्न.५५ कोटी द्याला दो भायोका बटवारा) गंभीरतेने लावून धरणार आहात?त्यावर निर्णय घेण्यास त्यांना भाग पडणार आहात?
करणार काय तुम्ही?
काय फायदा ह्या वांझोट्या चर्चेचा?
ज्या घोटाळ्याच्या गर्तेत मनमोहन सिंघ सरकार बुडाले आहे त्यातून लोकांचे लक्ष वळवणे एवढाच या डिप्लोमसी चा अर्थ आहे,सावधान! विसरू नका घोटाळे.
जर क्रिकेट हा धर्म आहे.आणि धर्म हि अफूची गोळी आहे.(दोन्ही वाक्ये कथित बुद्धिवाद्यांची आमची नवे) तर हि अफूची गोळी पाजण्याचे काम आज सरकारी वरद हस्ताने होतंय अये वाटत नाही का तुम्हाला?
शोर्ट टर्म मेमरी लोस बनू नका? थंड डोक्याचे राहाल व शांत बसाल तर चिरडले जाल.चिरडले जातच आहात तुम्ही.
येत्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवून द्या.अण्णा हजारे सारख्या समाज सेवकांना लोकपाल बिल च्या मागणीसाठी साथ द्या.
Thursday, February 3, 2011
मी नथुराम गोडसे बोलतोय.

नथुराम गोडसे!
आज ह्या नाटकाला पुन्हा विरोध झाला.आज ह्या नाटकाचा गडकरी रंगायतन,ठाणे येथे प्रयोग होता.मुंब्र्याचे आमदार श्री,जितेंद्र आव्हाड व कार्यकर्ते ह्यांनी त्यास विरोध केला.पण प्रयोग झाला.सुमारे ११ वर्षापूर्वी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे ह्यांनी ह्या नाटकाचे प्रयोग ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठेवले होते.त्यास तेव्हा ठाणे कोन्ग्रेस चे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर ह्यांनी विरोध केला होता.त्यांनी हा प्रयोग होऊ दिला नाही तसेच ह्या नाटकाची बस मुलुंड येथे जाळली होती.तेव्हापासून ह्या नाटकाचे ठाण्यात प्रयोग झाले नाहीत.
आज मात्र निदर्शन झुगारून प्रयोग झाले.ठाण्याची शिवसेना व जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे हे शिवसैनिकासाहित प्रयोगाच्या सुरक्षेकरिता हजर होते.त्यांनी हा प्रयोग होऊन दिला.
मी गेली १२ वर्ष हे प्रकार पाहतो आहे. कोन्ग्रेस व हल्ली राष्ट्रवादी ह्याला विरोध करीत आहे.आणि जे गोडसे ह्यांचे तत्वज्ञान अथवा तात्कालिक गांधी हत्येच्या (त्यांच्या भाषेत वधाची) कारणे आपल्या अनुयायी ला सांगतात ते इथे कुठेच दिसत नाही.मला वाटले एखादे पथक येईल संपूर्ण गणवेशात दंड घेवून आणि दंड कधीतरी प्रयोग करीन.असो.
आता आपण नाटकाच्या वाटचालीकडे वळूयात.ह्या नाटकाचे निर्माते उदय धुरत हे म्हणतात-"आम्हाला ह्या नाटकाला न्यायालयाने परवानगी दिली.आम्ही एकूण ६२८ प्रयोग केले.आज ६२९ व प्रयोग ठाण्यात करतोय.मग न्यायालय परवानगी देत असून ह्यांचा विरोध कळत नाही का आहे? नथूरामची भूमिका करणारे श्री शरद पोंक्षे पण हेच म्हणाले(कंसात त्यांना अभिप्रेत असेल अशी वाक्ये) -"एकीकडे गप्पा मारता अभिव्यक्ती स्वातंत्र्य.(फक्त मुस्लीम पुरते)मग आम्ही नथूरामची बाजू मांडली तर फरक काय पडतो? गांधी पण तेच म्हण्याचे माझा विरोध माझ्या समोर येवून करा.(समोर ये मग बघतो तुला?)"
पण काही म्हणा ह्या पोंक्षे ला मानायला हवे.मध्ये साम वर त्याची मुलाखत पहिली.तो बोलला कि मला फार धमक्या आल्या,दबाव आला पण मी प्रयोग केले आणि करणार.जर त्यांचा उद्देश रंगकर्मी म्हणून असेल नाटकवेडा व dediketan म्हणू असेल तर खरच सलाम.
जेव्हा शाळेत दोन पोर एकेमेकाला मारतात व मी त्यांची मारामारी सोडवतो तेव्हा मी दोघांना विचारतो -बाबानो काय झाल.अर्थात हा लहान पोरांचा प्रश्न आहे.तो मी त्यांचे एवढा होऊन solve करतो.समजूत घालतो.त्यांना बंधुत्व शिकवतो.जे माझे कर्तव्य आहे.पण मुख्य मुद्दा हा कि मी दोन्ही बाजू विचारात घेतो.(मग ती संधी नथुराम ला पण द्या कि.पुस्तकरूपाने त्यांच्या बंधूना दिलीये मग नाटकाला का विरोध? ह्यात राजकारण असू शकते.आहे)
एवढे प्रयोग राज्यभर होत होते तेव्हा आव्हाड हे राष्ट्रवादी युवक कोन्ग्रेस चे प्रदेशाध्यक्ष होते.मग त्यांनी राज्यात ठीक ठिकाणी जावून विरोध का केला नाही.मान्य आहे ठाण्यात त्यांची ताकद असेल जास्त पण एक संघटना जी सत्ताधारी पक्षाची अंगीकृत संघटना आहे तिचा वापर त्यांना इतर ठिकाणी का करता आला नाही?(त्यांना मेहेरबानी म्हणून पद दिलेले वास्तविक त्यांना कोणीच विचारत नाही,किंवा ठाण्यापुरता आपल्या मतदारसंघ पुरता ते विचार करतात)आम्ही पोरांना शिकवतो कि प्रभू रामचंद्र ,महाराणा प्रताप,शिवराय, हे राष्ट्राचे सुपुत्र मग अलीकडचे गांधी हे राष्ट्रपिता कसे? मग राष्ट्रपती काय प्रकार असतो?
माझे एक शिक्षक मित्र (स्वयं घोषित संघ प्रवक्ते) मला बोलले कि "नथुराम च्या केस चा अभ्यास अजून चालू आहे.कोणी घैसास गुरुजी म्हणून आहेत.व अजून दोन जण.(त्यापैकी एक ब्राम्हण नाही.हा आम्हाला टोमणा किंवा विश्वास बसावा म्हणून)हे त्याकाळातील कागदपत्रे तपासत आहेत.त्यात असे निष्पन्न झाले कि नथुराम ह्यांच्या केस मध्ये गांधी ह्यांच्या बोडीचा पंचानामाच झाला नाही.व दबाव आल्यामुळे तशीच केस पुढे चालू आहे.शिवाय ह्या घैसास ह्यांचे असेही म्हणणे आहे कि त्या खटल्याचे न्यायाधीश हे नथुराम ह्यांना भेटले व बोलले कि -"तू पंचनामा कोपी माग.आता ति उपलब्ध होणे शक्य नाही.लगेच सोडतो तांत्रिक करणावर निर्दोष." नथुराम ह्यास नाही म्हणाले.
तसेच नथुराम ह्यांना गांधी ह्यांचे पुत्र जे वकील होते ते भेटले व म्हणाले -"बापुजीना अहिंसा मान्य न्हवती व तुम्ही जरी त्यांचे मारेकरी असलात तरी तुम्हाला फाशी होऊ न देणे माझे कर्तव्य मानतो म्हणून तुमचे वकील पत्र घेतो.पण नथुराम ह्यांना ह्या गांधी काव्याची जाणीव झाली व अशाने आपण गांधी ह्यांना मोठे करू व आपली बाजू जगासमोर कधीच येणार नाही म्हणून त्यांनी हे नाकारलं.
(तार्किक दृष्ट्या योग्य.नायाधीश वैगेरे ह्या बधल सांगू शकत नाही.पंचनाम कोपी होती कि नाही ह्या बधल माहिती नाही.माहिती अधिअक्रत मिळेल असे वाट नाही.शिवाय १३ वर्षाने बंद सुनावणी चा तपशील खुला करायचा असतो तो हि केलेलं नाही.)
नथुराम हे दाउद,छोटा शकील,छोटा राजन,अरुणभाई गवळी(ड्याडी) ,नाईक बंधू ,थापा, ग्यांग चे सुपारी किलर न्हवते.शिकलेले मध्यमवर्गीय होते.पत्रकार होते.सावरकरांच्या आदेशावरून हैद्राबाद स्टेट मधल्या निदर्शनात सहभागी होते.स्वातंत्र्यसैनिक होते.
त्यामुळे त्यांच्या ह्या कृत्याला आजच्या "दिली सुपारी वाजवली गेम" ह्या पेक्षा निश्चितपणे वेगळे परिणाम असावेत ह्यात तथ्य आहे. ते समोर यायलाच हवे.
गोपाल गोडसे ह्यांची ह्यावरची दोन्ही पुस्तकें मी वाचली.मी सदाशिव पेठ,कुमठेकर रोड,पुणे ह्या गोपाल गोडसे ह्यांच्या राहत्या घरी मी त्यांना भेटलो देखील आहे.त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे जास्त बोलणे चर्चा झाली नाही.नथुराम ह्यांच्या अस्ठीचे पण मी दर्शन घेतले आहे.
( ५५ कोटींचे बळी व गांधी हत्या आणि मी.त्यात समकालीन पुरावे देत त्यांनी भाष्य केल आहे.शिवाय आता ति पिढी नाही तेव्हा होती पण तेव्हा कोन्ग्रेस सत्ता असून ते खोड्याला कोणी आले नाही.त्यामुळे त्या पुस्तकावर आधारित जर नाटक असेल तर त्यात गैर ते काय?कि कोन्ग्रेस ने लालभाई व समाजवादी लोकांची एकजूट फोड्याला मुद्दामहून ह्या प्रवृतीना खतपाणी घातले?)
माझा अनुभव म्हणून सांगतो -एखादी गोष्ट जर झाकल तर तिची उत्सुकता वाढते.त्यामुळे ती ओपन करा.काय म्हणतात ते आय टी वाले freeware ते करा.
Wednesday, February 2, 2011
शिवसेना काल आज आणि उद्या.

महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी जनतेच्या
इच्छाआकांक्षांना मूर्तस्वरूप देण्यासाठी जन्म पावलेल्या शिवसेनेची राजकीय
हत्या करण्याचा विचार महाराष्ट्रातल्या बहुतेक राजकीय पक्षांच्या मनात
शिवसेनेच्या जन्मापासून होता. पण जनतेच्या बळावर व बाळासाहेब ठाकरे यांच्या
खंबीर नेतृत्वामुळे शिवसेना उभी आहे व याच शिवसेनेने सामान्यातल्या
सामान्य माणसाला वैभवाने दिवस दाखवले. ज्यांना हे वैभवाचे दिवस सर्वाधिक
दिसले त्यांनीच शिवसेना सोडली. शिवसैनिक व मराठी माणूस शिवसेनेबरोबरच आहे.
शिवसेनेचे एकत्रीकरण करणे असे ज्या चळवळ्यांना वाटते. त्यांनी काही
प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
१) शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी
माणसाच्या कल्याणासाठीच शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना मराठी माणसापासून
दूर गेली. मराठी माणसाचे नुकसान शिवसेनेने केल्याचे एकतरी उदाहरण समोर आहे
काय?
२) शिवसेनेचे फक्त मराठी मराठी केले तेव्हा शिवसेना
मुंबई-ठाणे महानगरपालिकेच्या पुढे सरकली नाही. मराठी माणूस अठरापगढ जातीतच
विखुरलेला राहिला. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची गर्जना करताच जातीभेद
विसरून सर्व मराठी एक झाले व महाराष्ट्राची सत्ता, दिल्लीचे तख्तही
शिवसेनेला काबीज करता आहे. हिंदुत्वाची गर्जना करीत मिळवलेल्या सत्तेमुळे
महाराष्ट्रात कल्याण झाले ते ‘मराठी’ माणसाचेच ना?
३) शिवसेना ‘मराठी’पासून दूर गेल्याची टीका करीत जे बाहेर
पडले त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्वामुळे मिळालेल्या सत्तेमुळेच
त्या सगळ्यांची भरभराट झाली. आर्थिक स्थिती सुधारली. कोट्यवधी रुपयांच्या
जमिनीचे व्यवहार त्यांना करता आले. ‘हिंदुत्व’ यशस्वी झाले नसते तरया
सगळ्यांचे उद्योग, व्यापार शिखरावर गेले असते काय?
४) नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते हिंदुत्वाने दिलेल्या सत्तेमुळेच. हे सत्य नाही काह?
५) मुंबईची वाटा कॉंग्रेसच्या महाराष्ट्रद्वेष्ट्या धोरणांनी
लावली. मुंबईवरील लोंढे व बांगलदेशांचे आक्रमण हाच खरा धोका आहे.
शिवसेनेतून काही नेते बाहेर पडून कॉंग्रेस पक्षात गेल्याने हे लोंढे थांबले
काय? ‘मनसे’सारख्या पक्षांनी दोन रिक्षावाले व टॅक्सीवाल्यांना मारल्याने
मराठीजनांचे सर्व प्रश्न मार्गी लागले काय? मराठीची लढाई अखंड आहे. ती
कधीही न संपणारी लढाई शिवसेना सदैव लढत आहे हे खरे नाही काय?
६) महाष्ट्रात शिवसेनेचे खच्चीकरण करून देशातील हिंदुत्वाची
मान पिळायची हे कारस्थान आहे व त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी
कॉंग्रेससारख्या पक्षाची आहे. देशविरोधी शक्तींना भीती शिवसेनेचीच आहे.
शिवसेना मजबूत राहिली तर धर्मांध, राष्ट्रद्रोही शक्तींना हिंदुस्थानात
डोके वर काढता येणार नाही. त्यामुळे शिवसेनाच फोडायची सध्या ते घडताना दिसत
नाही काय?
७) कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्यांची पूजा होते असे
एकमेव हिंदू नेते फक्त शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे व ते ‘मराठी’
आहेत याचा अभिमन बाळगायचा नाही काय?
८) अमरनाथ यातेकरूवर हल्ले होताच अतिरेक्यांना जशास तसे-(तेव्हा बाळासाहेबांनी गर्जना केली कि जर अमरनाथ यात्रेकरूना धोका झाला तर मुंबईतून एकही यात्रेकरू हजला जावून देणार नाही.)
उत्तर देऊन यात्रा सुरळीत पार पाडणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता
कश्मीरातील हिंदूंच्या अमरनाथ यात्रेवर जबर करवाढ केली व अमरनाथ यात्रेचे
दिवस कमी करावेत अशी मागणी फुटीरवादी कश्मीरी पुढाऱ्यांनी केली. हिंदुत्व
कमजोर पडत असल्याचे हे लक्षण नाही काय?
९) राज ठाकरे यांच्यासाठी कुराणाचे भाषांतर ‘मराठी’त झाले व
मुसलमानांनी हे मराठी कुराण त्यांना भेट दिले. एका बाजूला हिंदूंच्या
यात्रांवर कारवाई होत असताना मराठी मुसलमानांना हज यात्रेसाठी जादा अनुदान
मिळाले यासाठी राज ठाकरे यांच्या पक्षाने आंदोलन केले. अशा पक्षाचे
शिवसेनेत विलीन व्हावे असे करंच कुणाला वाटते काय?
१०) शिवसेनेने मराठी माणसांचे अहित चिंतले नाही व मराठी
माणसांच्या कल्याणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सतत खस्ता खाल्ल्या. शिवसेना
सोडून वेगळा पक्ष काढणाऱ्यांनी हा विचार कधी केला काय? उद्धव ठाकरे
यांच्या नेतृत्त्वाचा व कार्यपद्धतीचा विषय उकरून काढला व बाहेर पडण्याचे
कारन शोधले. त्यात काही अतिशययोक्ती आहे काय?
११) संपूर्ण विदर्भात कॉंग्रसने शेतकऱ्यांच्या जीवनाचे
स्मशान केले. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्माहत्याग्रस्त
शेतकऱ्यांच्या कुंटुबीयांना आधार देण्यासाठी सावकारी पाशातून त्यांची
मुक्तता व्हावी. त्यांचे कर्ज माफ व्हावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी
विदर्भासह महाराष्ट्रात अक्षरशः रान उठविले, झंझावती दौरे केले. हे सर्व
शेतकरी बांधव मराठी नव्हते काय?
Saturday, January 22, 2011
महाराष्ट्राला बाळासाहेबांचेच नेतृत्व हवेय!

महाराष्ट्रात अनेक महान नेते होऊन गेले, ज्यांनी देशासाठी आपले आयुष्य पणाला लावले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखे नेते हे तमाम जनतेच्या गळ्यातील ताईत बनून राहिले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला शूर-वीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध केले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच शिवरायांचे भक्त बनून अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार करताना इंग्रजी राजवटीला हलवून सोडले, त्याच शिवबाच्या मातीत त्याच शिवबाचा भक्त बनून आज जर कोणी महाराष्ट्राला किंबहुना मराठी माणसाला मान-सन्मानाने जगायला शिकवले असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनीच!
Wednesday, January 12, 2011
शिवसेना-एक नजर
बर्याच लोकांना हल्ली स्वप्न पडत असतात कि शिवसेना संपली.काल एक पावटा आमच्यातून गेला मग हि मळमळ अजून बहरून येते.त्या पावस्काराना काय कमी केल होत?विधान परिषदेवर आमदार केल होत.४ वर्ष आमदारकी बाकी होती तरी सोडून गेला? का गेला हे आम्हाला ह्या पीत पत्रकारांकडून समजले.म्हणे त्यांच्या कामगार सेनेत त्यांचे पंख छाटत होते.
आता आमदारांचे नुकतेच पगार वाढले.सोयी सवलती तर चिकार असतात तरी पण हे सोडून जातात का तर म्हणे कामगार सेनेत वर्चस्व कमी केल होत. म्हणजे पहा जेवढ्या थैल्या कामगार सेनेत ह्याने कमावल्या तेवढा पैसा आमदारकी मध्ये नाही असा अर्थ काढू का आम्ही?
राज ह्यांनी सोबत नेलेली विद्यार्थी सेना! एक बागुलबुवा
राज साहेब बाहेर पडले ते विद्यार्थी सेना सगळी सोबत घेवून हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं.विद्यार्थी सेना संपली अशी ओरड सर्व पत्रकार ओरडत होते. बरोबर ना?
फरक पडला. नाही पडला असे नाही.नंतरच्या सिनेट निवडणुकीत आम्ही ३ जागांवर घसरलो. एकूण जागा असतात १०.
पण आज आदित्य व अभिजित पानसे ह्यांच्या नेतृत्वात ३ च्या ८ जागा झाल्या हे लक्षात घ्या.
मिडिया ने ह्याला प्रसिद्धी दिली ती उलट कि आदित्यचे केवळ नाव आहे सगळी रणनीती जुन्या लोकांनी आखली.हो ना मान्य आहे आदित्य ने काय किंवा प्रबोधनकार ह्यांच्या पासून कोणाही ठाकर्यांनी कधीच यश आपले मानले नाही कायम सामान्य सैनिकाच यश आहे असे म्हणाले.
पण हीच मिडिया अशी बातमी का देत नाही राज ह्यांच्याबरोबर बाहेर पडलेली विद्यार्थी सेना सावरायला शिवसेना यशस्वी.का देत नाही?कारण उघड आहे आम्ही पाकीट देत नाही.मग कोणीतरी पावटे उठतात आमच दुकान एक एक खाली होतंय शटर बंद होणार अशी स्वाभिमानी बांग देतात पण त्या स्वाभिमान ची टपरी सिनेट मध्ये फुटली हे हि मिडिया ठळक पणे का सांगत नाही.
शिवसेनेचे ४५ आमदार आहेत.११ लोकसभा खासदार आहेत.मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली,संभाजीनगर,नाशिक,येथे महापौर आहेत.नागपूर मध्ये उप महापौर आहेत.हे सर्वांनाच माहिती आहे.आता पुढे जी माहिती देतो ती फार कमी लोकांना माहिती आहे.
शिवसेना महाराष्ट्राबाहेर!
शिवसेना हि केरळ मध्ये समाजकारण करीत आहे.त्याची हि लिंक.
http://shivsena-kerala.org/history.htm
इतर राज्याचे बोलायचे म्हणजे गुजरात,गोवा, मध्य प्रदेश,छत्तीसगढ,दिल्ली येथे शिवसेना हिंदू संघटना म्हणून ताकद ठेवून आहे.
वाराणसी(उत्तर प्रदेश) मध्ये वाटर चित्रपटाच्या निदर्शनात शिवसेनाच पुढे होती.
मोहाली(पंजाब) व दिल्ली ची खेळ पट्टी शिवसैनिकांनीच उखडली.
कर्नाटक च्या श्रीराम सेनेचा अध्यक्ष हा शिवसेनेत होता.आज जी झुंड शाही तो करतोय त्याचे ट्रेनिंग त्याने शिवसेनेकडूनच घेतलं. त्याने बेळगाव प्रश्नी कर्नाटक ची तळी उचलली म्हणून साहेबांनी त्याची हकालपट्टी केली.
नेपाळात माववाद्याना उत्तर द्यायला शिवसेनाच पुढे आहे.हे त्या चित्रावरून दिसतच आहे.
दिल्लीत आमदारकीला आमच्या उमेदवार साध्वी विजया समल ह्यांना दुसर्या क्रमांकाची मते होती.
हिमाचल प्रदेश भाजप प्रवक्ते मध्ये बोंब मारत होते कि विधानसभेला शिवसेनेने उमेदवार उभे करून सत्ता घालवली.दोन -चार जागा द्यायला हव्या होत्या थोड नुकसान वाचल असत.
कर्नाटक मध्ये पण शिवसेना राजकीय दृष्ट्या nusence का काय म्हणतात ती value ठेवून आहे.
भोपाल,जबलपूर (मध्य प्रदेश) महापालिकेत आमचे नगरसेवक आहेत.
शिवसेना संपली असे दिवास्वप्न कोणी हि पाहू नये, आम्ही का संपणार नाही?
>>>>>>>>>>>>>>>.
१)कारण आम्ही बँका बुडवत नाही.
२)आम्ही साखर कारखाने आजारी दाखवून प्याकेज मागत नाही.
३)आम्ही अजून अमुक अमुक दिवस अमुक जिन्नस मिळणे मुश्कील सांगून काळाबाजाराला प्रोत्साहन देत नाही.
४)कमुनिस्त व समाजवादी ह्यांना कधीच कामगार ह्या पलीकडे दृष्टी न्हवती.कथित अन्यायावर ते लढत होते.म्हणून ते संपले.
आम्ही कायमच समाजकारण केले.
५)मराठी आमचा श्वास आहे हिंदुत्व आमचा प्राण आहे.आमची हि दोन तत्व हजारो वर्ष आक्रमकांना तोंड देत उभी आहेत.व ती आता आमच्या हातात सुरक्षितआहेत.
शिवसेना काल आज आणि उद्या हे शिवसेना नेते खासदार डॉक्टर मनोहर जोशींचे पुस्तक वाचा.ह्या पुस्तकावर त्यांनी डोक्तारेत मिळवली,त्यात अजूनही मुद्दे मिळतील.
लेखन सीमा! जय महाराष्ट्र!
Friday, January 7, 2011
विद्रोही संघटना व वास्तव

सध्याच्या काळी स्वत:ला सुधारणावादी, समाजसुधारक, विद्रोही, परिवर्तनवादी, निधर्मी, चळवळवादी, बहुजनवादी अशाच नाना प्रकारची विषेशणे स्वत:ला लावुन घेणारी बरीच मंडळी सध्या आपल्या आजुबाजुला आढळतील. याचे कारण म्हणजे सध्या वारेच यांच्या विचारांच्या दिशेने वाहत आहे यांना हवी असलेली परिस्थिती सध्या महाराष्ट्रात चालू आहे. “आरोप” हे या लोकांचे क्रमांक एक चे अस्त्र आहे. याच अस्त्राच्या आधारावर हिंदु धर्मावर, संस्कृतीवर, शिवचरित्रावर, वेद-वेदांत, देश, संत-महंत, महापुरुष यांच्यावर अनेक आरोप ही मंडळी करायला मागेपुढे पाहत नाहीत. अगदी यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर सावरकर हे स्वातंत्र्यविर नसुन 'संडासविर' आहेत. हेडगेवार, टिळक ही देशद्रोही पिलावळे यांच्या दृष्टीने ठरतात, तर झांसीची राणी लक्ष्मीबाई या इंग्रजांच्या बटीक ठरता. ही झाली पहीली बाजू ज्यांनी या देशाची आजन्म सेवा केली ते यांच्या दृष्टीने देशद्रोही वगैरे ठरतात. दुसरी बाजू म्हणजे हे लोक कोणाला चांगले म्हणतात ?? तर ...औरंगजेबाला स्त्रि-दाक्षीण्यवादी असे विषेशण या लोकांनी लावले आहे. हिंदु-मुस्लिम दंगलीमध्ये हे नि:संकोचपणे मुसलमानांची बाजू उचलून धरतात. अफजलखान वधाचे चित्र लावण्यास विरोध करण्यामध्ये हेच लोक आग्रभागी असतात. म्हणजे सावरकर, हेडगेवार, राणि लक्ष्मिबाई, समर्थ रामदास, टिळक हे देशद्रोही आणि औरंगजेब, अफजलखान हे देशप्रेमी .. साधारण अशाप्रकारचे एक अभद्र समिकरण या स्वयंघोषीत समाजसुधारकांनी आज मांडलेले आहे. खरे तर यांच्या या समिकरणाला किती लोकांचा पाठिंबा आहे हा एक संशोधनाचा विषय आहे.
या लोकांकडे प्रसिद्धी हे एक हत्यार आहे . आमुक-आमुक या एखाद्या सभेला पच-पन्नास लोक उपस्थित असले की पाच-पन्नास चे पाचशे-पन्नास करुन आपल्या समविचारी प्रसिद्धी माध्यमामध्ये याची बातमी द्यायची . हा एक रोजचा भातुकलीचा खेळ असावा याप्रमाणे चालत आहे. या विद्रोही वादी लोकांच्या काही संघटना आहेत व या संघटनांवर कॉंग्रेस मधील काही 'बड्या' नेत्यांचा वरदहस्त आहे. अगदी लहानातल्या लहान सभेसाठी या नेत्यांकडून यांना आर्थिक ओघ येत असतो तसेच उपस्थितांची संख्या जास्त दिसण्यासाठी हे 'बडे' नेते आपल्या कार्यकर्त्यांना या संघटनांच्या कार्यक्रमांना पाठवत असतात व याचा मोबदला म्हणुन निवडणुकी वेळी या विद्रोही संघटनांचे कार्यकर्ते आपल्या 'बड्या' नेत्याचा प्रचार करण्याच दंग असतात. अर्थात पैसे, भ्रष्टाचार, लाच-खोरी अशाप्रकारच्या लोकशाहीला काळीमा फासणारे प्रकार यावेळी सर्रास केले जातात.
हिंदु समाजामजामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मोठी जन-जागृती होत आहे. मग त्याला कारण मिरज दंगली सारखी प्रकरणे असोत, धुळे दंगली सारखी प्रकरणे असोत, काश्मिर मध्ये हिंदुंचे हनन , इस्लामी दहशतवाद , आणि ना जाणो किती अशा अनेक प्रकरणांमुळे हिंदु समाज हळू-हळू जागृत होत आहे. बेगडी धर्मनिरपेक्षतेला लात मारुन ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करनारे हिंदु तरुण तयार होऊ लागले आहेत. हेच हिंदुत्व अशाचप्रकारे वाढू लागले तर आपल्या उद्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल असे या देशातील काही अहिंदुंना वाटू लागले. वेग-वेगळ्या माध्यमांतून अगदी प्रतिकूल परिस्थितिमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असलेली हिंदुजागृती पाहून काही लोकांची झोप उडाली आणि याच कारणामुळे वामन मेश्राम (नवबौद्ध), जैमिनी कडू (ख्रिश्चन), व रफिक कुरेश(मुसलमान) या त्रिकुटाने मिळून हिंदुधर्म, हिंदु संस्कृती, देशप्रेमी संत-महंत-महापुरुष, हिंदुधर्मग्रंथ तसेच हिंदुसमाज यांच्या विरोधात 'बामसेफ' ही संघटना स्थापण केली, सध्याची मराठा सेवा संघ या संघटनेमागील बाबसेफ ही सुत्रधार संघटना आहे. ती दलित संघटना असल्यामुळे तिला मराठा संघाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती म्हणुन सुरवातीला 'मराठा महासंघ' या मसाठा संघटनेचा वापर करून घेण्याचे प्रयत्न करुन घेण्यात आले. परंतु या प्रयत्नांना पुरेसे यश मिळत नसल्याचे दिसून आल्यावर या कटाच्या सुत्रधारांनी मराठा सेवा संघ या नावची वेगळी संघटना स्थापन केली आणि कळसूत्रीप्रमाणे पुरुशोत्तम खेडेकर यांस अध्यक्ष केले. या संघटनांच्या स्थापणे संबंधी मराठा विकास परिषदेने ऑगस्ट २००९ रोजी प्रकाशीत केलेल्या 'शिवरायांचा देशधर्म, पुरुषोत्तमांचा द्वेशधर्म' या पुस्तिकेमध्ये श्री अशोक राणे यांचा एक परिच्छेद उल्लेखनिय आहे , तो असा.. “अयोध्या आंदोलनामुळे देशामध्ये हिंदुत्व पुनर्जागरणाला सुरवात झाली आणि त्याचा प्रभाव समाजीवनाच्या विविध क्षेत्रावर जाणवून प्रचंड हिंदुत्व जागरण झाले. त्यामुळे हिंदुत्वविरोधी कळपामध्ये खळबळ माजली व हिंदु समाजामध्ये जातीय संघर्ष उभा करणार्या चळवळी देशामध्ये सक्रिय झाल्या किंवा हिंदू समाजामध्ये जातीय संघर्ष निर्माण करणार्या संघटनांना खतपाणी घालण्याचे काम सुरु झाले. वर्ष १९९९ ते २००० या काळात हिंदुत्व हिंदुत्व जागरणामुळे गुजरातमधील डांग मध्यप्रदेशातील झाबुआ, ओरिसातील आनंदपूर येथील कमजोर हिंदुंची ख्रिश्चन मिशनरिंनी बाटवाबाटवी केली होती. तो ख्रिश्चन झालेला हिंदु समाज घरवापसी करुन हिंदु धर्मात पुनप्रवेश करु लागला. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी जगतामध्ये खळबळ निर्माण झाली व हिंदु समाजातील कमजोर वर्गाचे धर्मांतर करण्याऐवजी हिंदू समाजामध्ये केवळ जातीय संघर्ष निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्याचवेळेस सन २००१ मध्ये डरबन येथे विश्वसंमेलन झाले. त्यामध्ये w.c.c संघटनेच्या (world church council) नेतृत्वाखाली भारतीय दलित नेत्यांनी हजेरी सुद्धा लावली. त्यामुळे विद्रोही साहीत्य संमेलनाला महत्व आले. आणि त्यामधून वहारू सोनावणे यांनी 'आदिवासी हिंदु नाहीत' अशी भूमिका जाहीर केली. दया पवार, लक्ष्मण माने यांना विदेशी पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाने 'मराठा जोडो' यात्रा काढून हिंदु धर्म सोडण्याचे आवाहन मराठा समाजाला केले.”
या संघटनांच्या कार्यपद्धतिविषयी संत श्री बाबुराव महाराज वाघ आपल्या 'हिंदुजागृती' या पुस्तकात म्हणतात , ''.....नंतर खोडेकर मराठा सेवा संघाचा अध्यक्ष होताच माने मराठा 'समाजाचे संघटन' या गोंडस नावाखाली सर्व मराठा समाजास ब्राम्हणद्वेष, हिंदद्वेष, हिंदूधर्मद्वेष, हिंदूधर्म ग्रंथांचा द्वेष, वारकरी सांप्रदायीक संतांचा द्वेष, वारकर्यांचा द्वेष, विठ्ठलाचा द्वेष इत्यादी शिकवण देण्यास आरंभ केला. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु, हिंदूधर्म, हिंदूस्थान यांच्या रक्षणाकरीता अहोरात्र ३६ वर्षे संग्राम केला त्या हिंदुधर्माच्या विरोधात बामसेफ प्रणित मराठा सेवा संघ आणि त्याच्या उपसंघटना यांनी काम करणे हा शिवाजी महाराजांचा घोर अपमाण होय.''
याचप्रमाणे प्राचार्य श्री अशोक बुद्धीवंत आपल्या एका लेखामध्ये मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा काढून आपली पोळी भाजू पाहणार्या तथाकथीत स्वयंघोषीत समाजसुधारकांबद्दल म्हणतात, ''ज्या नेत्यांच्या घरात अनेक टर्म आमदारक्या आहेत, जे निवडणुकांवर कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करतात, ज्यांच्याकडे आजच्या काळातही शेकडो एकर जमिनी आहेत, ज्यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत, ज्यांच्या संघटनांमध्ये हिशोब न दिल्यामुळे फुटी पडलेल्या आहेत ती मंडळी जेव्हा गरिबीबद्दल आणि गरिबांबद्दल खोटय़ा कळवळ्याने लिहितात तेव्हा ते अपराधभावातून आलेले लेखन आहे असेच म्हणावे लागते.'' तर श्री सुनिल चिंचोळकर आपल्या समर्थ चरित्र : आक्षेप व खंडन या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात, ''शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडॆ दुष्काळ. ''
Tuesday, December 14, 2010
लाल महाल,ब्रिगेड व दादोजी

सध्याचा लाल महाल ही मूळ वास्तु नाही
ब्रिगेडी लेखक कोकाटे म्हणाला,“लाल महाल पुरात्त्वखात्याकडे असला पाहीजे. तो पालीकेच्या अधिकारात का ?”
ब्रिगेडी कोळसे-पाटील म्हणाला, “२००२ मध्ये लाल महालात दादोजी कोंडदेवचा पुतळा बसवला आणि २००४ मध्ये जेम्स लेनने वादग्रस्त पुस्तक लिहीले. या दोन्ही ठरवून केलेल्या गोष्टी आहेत.”
लाल महालाची थोडक्यात माहिती – या वाडयाची जागा झांब्रे पाटीलकडून विकत घेतली होती आणि त्यावर लाल महाल हा वाडा बांधण्यात आला होता. त्याचा पाया ५२ ½' x ८२ ½' या व्यासाचा होता आणि उंची ३० ½' होती. त्यास १३ ½' खोलीची तळघरे होती. १६४६-४७ मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांची राजधानी राजगडला हलवली आणि लालमहालाचा उपयोग प्रशासकीय कामासाठी होऊ लागला. इ.स.१६८९ ते इ.स.१७०७ या धामधूमीच्या काळात लाल महालाची अगदी दुर्दशा झाली. मोडकळीस आलेल्या लाल महालाची १७३४-३५ मध्ये डागडूजी करून थोरल्या बाजीरावांनी तो राणोजी शिंदेंना आणि रामचंद्रपंतांना रहायला दिला.
राणोजी शिंदे गेल्यानंतर लाल महालाचा उपयोग गोदाम म्हणुन झाला. त्याला लोकांनी अंबरखाना या नावाने पुकारण्यास सुरुवात केली होती. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी तो पुर्ण उध्वस्त करून त्याची लाकडं व दगडी ` ३१५ ला विकली. या लाल महालाच्या प्रांगणात एक विहीर होती. दोन करंजे होते. इ.स.१९२५ मध्ये जिजामाता उद्यान बांधण्यात आले. आज जिथे हे जिजामाता उद्यान आहे तिथेच हा वाडा होता. दुर्दैवाने तो कसा दिसत होतो, त्याची रचना कशी होती या बाबत कुणालाच माहिती नाही.
१९५० मध्ये पुणे महानगरपालीकेने पुण्याचा सांस्कृतीक वारसा जपण्याचे ठरविले. त्यापैकी पुन्हा लाल महालाच्या प्रतीकृतीची उभारणी हा उपक्रम १९८४ मध्ये हाती घेतला. ही वास्तु इ.स.१९८८ बांधून पुर्ण तयार झाली. सोन्याच्या नांगरच्या प्रकरणामुळे लाल महालला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. म्हणुन त्या प्रसंगाला धरून बाळशिवबाची ब्राँझची प्रतिमा तयार केली. त्याच बरोबर नजर ठेवून देखरेख करणार्या राजमाता जिजाबाईसाहेब तसेच प्रशासकीय आणि शिवबाच्या प्रशिक्षणाची बाजू संभाळणारे दादोजी कोंडदेव लाल महालाशी निगडीत असल्या कारणाने त्यांचेही पुतळे उभारले.
२००४ मध्ये दादोजींचा पुतळा उभारला गेला हा कोळसे-पाटलाचा कपोलकल्पीत आरोप बिनबूडाचा आहे. हा मूळ लाल महाल नसल्याने पुरातत्त्वखात्याचा या वर काहीच अधिकार नाही. ती पालीकेची मालमत्ता आहे. स्वत:ला इतिहास लेखक म्हणुन प्रसिद्धी मिळवू पाहणार्या कोकाटयाला एवढेसुद्धा माहीत नाही ?
ब्रिगेडी आक्षेप व माझे मत.
तिथे दादोजी ह्यांचा पुतळा का?शहाजी राजांनी जिजाऊ बरोबर शिवरायांच्या शिक्षणासाठी विविध विषयात निपुण बरेच लोक दिले होते.(उत्तर:असतील.देणारच कि)
.मग दादोजी गुरु होते असे भट का ओरडतात? शिवाय सरकारने जी समिती ह्या प्रश्नी स्थापन केली होती तिने देखील दादोजी गुरु नाहीत असे म्हणाले व दादोजी ह्यांच्या नावाचा प्रशिक्षक पुरस्कार देखील मागे घेतला.त्या समिती मध्ये पण पुरंदरे आले नाहीत.
(उत्तर:इतिहास हा पूर्णपणे उलगडला जातोच असे नाही.बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी कोणत्या काळात चरित्र लिहिले व आता काय साल चालू आहे? इतक्या वर्षात नवीन उत्खनन झाले असेल तसेच नवीन कागद पत्रे हाती लागली असतील.असो.पण काही असो दादोजी हे पुण्याचे कारभारी होते ह्यात दुमत नसावे त्यामुळे सोन्यचा नांगर फिरवला त्यावेळी ते तिथे उपस्थित असणारच कि.मग सध्याच्या पुतळ्याला नावे द्या व वाद संपवा)