Wednesday, February 2, 2011

शिवसेना काल आज आणि उद्या.


महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी जनतेच्या
इच्छाआकांक्षांना मूर्तस्वरूप देण्यासाठी जन्म पावलेल्या शिवसेनेची राजकीय
हत्या करण्याचा विचार महाराष्ट्रातल्या बहुतेक राजकीय पक्षांच्या मनात
शिवसेनेच्या जन्मापासून होता. पण जनतेच्या बळावर व बाळासाहेब ठाकरे यांच्या
खंबीर नेतृत्वामुळे शिवसेना उभी आहे व याच शिवसेनेने सामान्यातल्या
सामान्य माणसाला वैभवाने दिवस दाखवले. ज्यांना हे वैभवाचे दिवस सर्वाधिक
दिसले त्यांनीच शिवसेना सोडली. शिवसैनिक व मराठी माणूस शिवसेनेबरोबरच आहे.
शिवसेनेचे एकत्रीकरण करणे असे ज्या चळवळ्यांना वाटते. त्यांनी काही
प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

१) शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी
माणसाच्या कल्याणासाठीच शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना मराठी माणसापासून
दूर गेली. मराठी माणसाचे नुकसान शिवसेनेने केल्याचे एकतरी उदाहरण समोर आहे
काय?

२) शिवसेनेचे फक्त मराठी मराठी केले तेव्हा शिवसेना
मुंबई-ठाणे महानगरपालिकेच्या पुढे सरकली नाही. मराठी माणूस अठरापगढ जातीतच
विखुरलेला राहिला. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची गर्जना करताच जातीभेद
विसरून सर्व मराठी एक झाले व महाराष्ट्राची सत्ता, दिल्लीचे तख्तही
शिवसेनेला काबीज करता आहे. हिंदुत्वाची गर्जना करीत मिळवलेल्या सत्तेमुळे
महाराष्ट्रात कल्याण झाले ते ‘मराठी’ माणसाचेच ना?

३) शिवसेना ‘मराठी’पासून दूर गेल्याची टीका करीत जे बाहेर
पडले त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्वामुळे मिळालेल्या सत्तेमुळेच
त्या सगळ्यांची भरभराट झाली. आर्थिक स्थिती सुधारली. कोट्यवधी रुपयांच्या
जमिनीचे व्यवहार त्यांना करता आले. ‘हिंदुत्व’ यशस्वी झाले नसते तरया
सगळ्यांचे उद्योग, व्यापार शिखरावर गेले असते काय?

४) नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते हिंदुत्वाने दिलेल्या सत्तेमुळेच. हे सत्य नाही काह?

५) मुंबईची वाटा कॉंग्रेसच्या महाराष्ट्रद्वेष्ट्या धोरणांनी
लावली. मुंबईवरील लोंढे व बांगलदेशांचे आक्रमण हाच खरा धोका आहे.
शिवसेनेतून काही नेते बाहेर पडून कॉंग्रेस पक्षात गेल्याने हे लोंढे थांबले
काय? ‘मनसे’सारख्या पक्षांनी दोन रिक्षावाले व टॅक्सीवाल्यांना मारल्याने
मराठीजनांचे सर्व प्रश्न मार्गी लागले काय? मराठीची लढाई अखंड आहे. ती
कधीही न संपणारी लढाई शिवसेना सदैव लढत आहे हे खरे नाही काय?

६) महाष्ट्रात शिवसेनेचे खच्चीकरण करून देशातील हिंदुत्वाची
मान पिळायची हे कारस्थान आहे व त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी
कॉंग्रेससारख्या पक्षाची आहे. देशविरोधी शक्तींना भीती शिवसेनेचीच आहे.
शिवसेना मजबूत राहिली तर धर्मांध, राष्ट्रद्रोही शक्तींना हिंदुस्थानात
डोके वर काढता येणार नाही. त्यामुळे शिवसेनाच फोडायची सध्या ते घडताना दिसत
नाही काय?

७) कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्यांची पूजा होते असे
एकमेव हिंदू नेते फक्त शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे व ते ‘मराठी’
आहेत याचा अभिमन बाळगायचा नाही काय?

८) अमरनाथ यातेकरूवर हल्ले होताच अतिरेक्यांना जशास तसे-(तेव्हा बाळासाहेबांनी गर्जना केली कि जर अमरनाथ यात्रेकरूना धोका झाला तर मुंबईतून एकही यात्रेकरू हजला जावून देणार नाही.)
उत्तर देऊन यात्रा सुरळीत पार पाडणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता
कश्मीरातील हिंदूंच्या अमरनाथ यात्रेवर जबर करवाढ केली व अमरनाथ यात्रेचे
दिवस कमी करावेत अशी मागणी फुटीरवादी कश्मीरी पुढाऱ्यांनी केली. हिंदुत्व
कमजोर पडत असल्याचे हे लक्षण नाही काय?

९) राज ठाकरे यांच्यासाठी कुराणाचे भाषांतर ‘मराठी’त झाले व
मुसलमानांनी हे मराठी कुराण त्यांना भेट दिले. एका बाजूला हिंदूंच्या
यात्रांवर कारवाई होत असताना मराठी मुसलमानांना हज यात्रेसाठी जादा अनुदान
मिळाले यासाठी राज ठाकरे यांच्या पक्षाने आंदोलन केले. अशा पक्षाचे
शिवसेनेत विलीन व्हावे असे करंच कुणाला वाटते काय?

१०) शिवसेनेने मराठी माणसांचे अहित चिंतले नाही व मराठी
माणसांच्या कल्याणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सतत खस्ता खाल्ल्या. शिवसेना
सोडून वेगळा पक्ष काढणाऱ्यांनी हा विचार कधी केला काय? उद्धव ठाकरे
यांच्या नेतृत्त्वाचा व कार्यपद्धतीचा विषय उकरून काढला व बाहेर पडण्याचे
कारन शोधले. त्यात काही अतिशययोक्ती आहे काय?

११) संपूर्ण विदर्भात कॉंग्रसने शेतकऱ्यांच्या जीवनाचे
स्मशान केले. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्माहत्याग्रस्त
शेतकऱ्यांच्या कुंटुबीयांना आधार देण्यासाठी सावकारी पाशातून त्यांची
मुक्तता व्हावी. त्यांचे कर्ज माफ व्हावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी
विदर्भासह महाराष्ट्रात अक्षरशः रान उठविले, झंझावती दौरे केले. हे सर्व
शेतकरी बांधव मराठी नव्हते काय?

Saturday, January 22, 2011

महाराष्ट्राला बाळासाहेबांचेच नेतृत्व हवेय!



महाराष्ट्रात अनेक महान नेते होऊन गेले, ज्यांनी देशासाठी आपले आयुष्य पणाला लावले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखे नेते हे तमाम जनतेच्या गळ्यातील ताईत बनून राहिले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला शूर-वीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध केले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच शिवरायांचे भक्त बनून अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार करताना इंग्रजी राजवटीला हलवून सोडले, त्याच शिवबाच्या मातीत त्याच शिवबाचा भक्त बनून आज जर कोणी महाराष्ट्राला किंबहुना मराठी माणसाला मान-सन्मानाने जगायला शिकवले असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनीच!


व्यंगचित्रकार एवढा मोठा नेता बनू शकतो हे कदाचित जगातील एकमेव उदाहरण असेल. इतर नेत्यांवर व्यंगात्मक कला चितारुन त्याच क्षेत्रात काम करणे हे फारच कठीण आहे. पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांच्यासारखे नेते भरात असताना त्यांच्यावर व्यंगचित्र काढणे हे सोप्पे नव्हते, पण शिवरायांच्या भूमीत जन्माला आलेला मराठी माणूसच हे करु शकतो हे बाळासाहेबांनी दाखवून दिले. ‘मार्मिक’ या व्यगंचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून ‘शिवसेना’ नावाची मर्दांची संघटना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केली. शिवसेनेचे वय आज ४५ वर्षे जरी असले आणि स्थापनेपासून काम करणारे शिवसैनिक हे कायम तरुणच असतात, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

४५ वर्षांपैकी जवळ जवळ ४० वर्षे सत्ता नसतानाही आक्रमक संघटना कशी टिकू शकते हे अनेकांना पडलेले कोडे आहे. तात्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनीही शिवसेना संपविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले असे आजही वाचनात येते, एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी शिवसेना संपू शकली नाही याचा अर्थ यात कुठेतरी दैवी शक्ती असलीच पाहिजे असे मानले तरी हरकत नाही. आजही काहीजण शिवसेना संपविण्याची कोल्हेकुही करत असतात पण या चिटपाखरांना ४२ पिढ्याही शक्य होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे.

बाळासाहेबांनी शिवसेनेत नुसती माणसांची भरती केली नाही तर निष्ठावान मावळ्यांची फौज स्वत:च्या जादुई नेतृत्वाने उभी केली. बाळासाहेब वयाने थकले असले तरी त्यांची जादु आम्हा तरुणांवर कायम आहे. अनेकजणांना साहेबांची भाषण ऐकता आली नाहीत परंतु जे काही वाचून कळते त्यावरुन साहेबांचे मोल आम्हा तरुणांसाठी फार मोठे आहे. ‘जिथे पिकते, तिथे विकले जात नाही’ ही म्हण मराठी माणसासाठी चपखल लागू पडते. शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते दादोजी कोंडदेवांपर्यंत आपण इतिहास जगण्यापेक्षा त्यावर वादच करत बसलो. बाळासाहेबांसारखे आधुनिक आणि प्रगतीशिल नेतृत्व असतानाही आमच्या महाराष्ट्राने संधी दिली ती केवळ साडेचार वर्षासाठीच! त्याही साडेचार वर्ष मिळालेल्या संधीचे सोने करुन साहेबांनी अनेक विकासकामे करुन दाखविली. शिवशाही सरकारच्या कामांमध्ये प्रामुख्याने मुंबईतील ५५ उड्डाणपुल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वरळी सागरीसेतू ही कामे आहेतच, तसेच सर्वसामान्यापर्यंत सरकार पोहचले पाहिजे यासाठी अनेक सरकारी उपक्रम कोकणासारख्या मागासलेल्या भागात आणले. आजच्या तरुणाला प्रगती आणि विकास या दोन गोष्टी महत्वाच्या वाटतात, बाळासाहेबांनी मुळात त्या शिवसेनेत यापूर्वीच राबविलेल्या आहेत. मुंबईमध्ये मागची अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर असल्याने सिद्ध करुन दाखविले आहे. महानगरपालिकेकडे असलेले मर्यादित अधिकार बघता देशातील इतर महानगरपालिकांमध्ये मुंबई कैक पट पुढे आहे.

बाळासाहेब हे तरुणांचे आदर्श नेते आहेत आणि कायमस्वरुपी राहणार आहेत. स्पष्ट बोलणारा माणूस राजकारणात स्वकर्तुत्वावर टिकू शकतो हे साहेबांनी दाखवून दिलेय पण त्यामुळे अनेकांची गोचीही झालेली आहे. बाळासाहेबांचेच जुने मित्र शरद पवार हे एकेकाळी साहेबांच्या स्पष्टवक्तेपणामुळे साहेबांपासून लांब गेले होते. अनेकजण साहेबांच्या याच स्वभावामुळे जवळ यायला तयार होत नाहीत. साहेबांनी शिवसैनिकांवर जेवढे प्रेम केले तेवढे कुणावरच केले नसेल. जगातील कुठल्याही पक्षातील कार्यकर्त्याला समाजात मान नसेल इतके मान शिवसैनिक म्हणून मिळते हा आम्हा शिवसैनिकांचा अनुभव आहे. पैसा-संपत्ती या मोहात न पडता केवळ मराठी अस्मितेचे जतन झाले पाहिजे यासाठी अनेक मोठ्या लोकांशी साहेबांनी पंगा घेतला. परंतु स्वत:च्या विचारांशी आजही कायम प्रामाणिक राहिले आहेत.

बाळासाहेबांसारखे नेतृत्व हे अनेक वर्षांनी जन्माला येते. बाळासाहेबांच्या भाषणाची नक्कल करुन, वेगळे दुकान मांडून, मराठी माणसाच्या विश्वासाचा वापर स्वत:चे पोट भरण्यासाठी केलेले काही स्वयंभू नेते साहेबांच्या कुटूंबातच जन्माला आले हे सर्वांचे दुर्भाग्य आहे. परंतु बाळासाहेबांनी दिलेला विचार आचरणात आणण्याचे काम केवळ शिवसैनिकालाच जमते. घरदार सोडून शिवसेनेसाठी झोकून देणारे शिवसैनिक साहेबांना मिळाले एवढे भाग्य लाभलेला नेता क्वचित असेल.

आज बाळासाहेबांचा वाढदिवस, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अनेकजण लिखाण करत असतात, वर्तमानपत्रांमध्ये पुरवण्या निघतात. माझाही तसाच मोडक्या-तोडक्या भाषेतील हा लेख माझ्या ब्लॉगवर लिहित आहे. आमच्या साहेबांना अखंड निरोगी आयुष्य लाभो, ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Wednesday, January 12, 2011

शिवसेना-एक नजर


र्याच लोकांना हल्ली स्वप्न पडत असतात कि शिवसेना संपली.काल एक पावटा आमच्यातून गेला मग हि मळमळ अजून बहरून येते.त्या पावस्काराना काय कमी केल होत?विधान परिषदेवर आमदार केल होत.४ वर्ष आमदारकी बाकी होती तरी सोडून गेला? का गेला हे आम्हाला ह्या पीत पत्रकारांकडून समजले.म्हणे त्यांच्या कामगार सेनेत त्यांचे पंख छाटत होते.
आता आमदारांचे नुकतेच पगार वाढले.सोयी सवलती तर चिकार असतात तरी पण हे सोडून जातात का तर म्हणे कामगार सेनेत वर्चस्व कमी केल होत. म्हणजे पहा जेवढ्या थैल्या कामगार सेनेत ह्याने कमावल्या तेवढा पैसा आमदारकी मध्ये नाही असा अर्थ काढू का आम्ही?

राज ह्यांनी सोबत नेलेली विद्यार्थी सेना! एक बागुलबुवा

राज साहेब बाहेर पडले ते विद्यार्थी सेना सगळी सोबत घेवून हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं.विद्यार्थी सेना संपली अशी ओरड सर्व पत्रकार ओरडत होते. बरोबर ना?
फरक पडला. नाही पडला असे नाही.नंतरच्या सिनेट निवडणुकीत आम्ही ३ जागांवर घसरलो. एकूण जागा असतात १०.
पण आज आदित्य व अभिजित पानसे ह्यांच्या नेतृत्वात ३ च्या ८ जागा झाल्या हे लक्षात घ्या.

मिडिया ने ह्याला प्रसिद्धी दिली ती उलट कि आदित्यचे केवळ नाव आहे सगळी रणनीती जुन्या लोकांनी आखली.हो ना मान्य आहे आदित्य ने काय किंवा प्रबोधनकार ह्यांच्या पासून कोणाही ठाकर्यांनी कधीच यश आपले मानले नाही कायम सामान्य सैनिकाच यश आहे असे म्हणाले.
पण हीच मिडिया अशी बातमी का देत नाही राज ह्यांच्याबरोबर बाहेर पडलेली विद्यार्थी सेना सावरायला शिवसेना यशस्वी.का देत नाही?कारण उघड आहे आम्ही पाकीट देत नाही.मग कोणीतरी पावटे उठतात आमच दुकान एक एक खाली होतंय शटर बंद होणार अशी स्वाभिमानी बांग देतात पण त्या स्वाभिमान ची टपरी सिनेट मध्ये फुटली हे हि मिडिया ठळक पणे का सांगत नाही.
शिवसेनेचे ४५ आमदार आहेत.११ लोकसभा खासदार आहेत.मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली,संभाजीनगर,नाशिक,येथे महापौर आहेत.नागपूर मध्ये उप महापौर आहेत.हे सर्वांनाच माहिती आहे.आता पुढे जी माहिती देतो ती फार कमी लोकांना माहिती आहे.

शिवसेना महाराष्ट्राबाहेर!


शिवसेना हि केरळ मध्ये समाजकारण करीत आहे.त्याची हि लिंक.
http://shivsena-kerala.org/history.htm

इतर राज्याचे बोलायचे म्हणजे गुजरात,गोवा, मध्य प्रदेश,छत्तीसगढ,दिल्ली येथे शिवसेना हिंदू संघटना म्हणून ताकद ठेवून आहे.
वाराणसी(उत्तर प्रदेश) मध्ये वाटर चित्रपटाच्या निदर्शनात शिवसेनाच पुढे होती.
मोहाली(पंजाब) व दिल्ली ची खेळ पट्टी शिवसैनिकांनीच उखडली.
कर्नाटक च्या श्रीराम सेनेचा अध्यक्ष हा शिवसेनेत होता.आज जी झुंड शाही तो करतोय त्याचे ट्रेनिंग त्याने शिवसेनेकडूनच घेतलं. त्याने बेळगाव प्रश्नी कर्नाटक ची तळी उचलली म्हणून साहेबांनी त्याची हकालपट्टी केली.
नेपाळात माववाद्याना उत्तर द्यायला शिवसेनाच पुढे आहे.हे त्या चित्रावरून दिसतच आहे.
दिल्लीत आमदारकीला आमच्या उमेदवार साध्वी विजया समल ह्यांना दुसर्या क्रमांकाची मते होती.
हिमाचल प्रदेश भाजप प्रवक्ते मध्ये बोंब मारत होते कि विधानसभेला शिवसेनेने उमेदवार उभे करून सत्ता घालवली.दोन -चार जागा द्यायला हव्या होत्या थोड नुकसान वाचल असत.
कर्नाटक मध्ये पण शिवसेना राजकीय दृष्ट्या nusence का काय म्हणतात ती value ठेवून आहे.
भोपाल,जबलपूर (मध्य प्रदेश) महापालिकेत आमचे नगरसेवक आहेत.

शिवसेना संपली असे दिवास्वप्न कोणी हि पाहू नये, आम्ही का संपणार नाही?

>>>>>>>>>>>>>>>.
१)कारण आम्ही बँका बुडवत नाही.
२)आम्ही साखर कारखाने आजारी दाखवून प्याकेज मागत नाही.
३)आम्ही अजून अमुक अमुक दिवस अमुक जिन्नस मिळणे मुश्कील सांगून काळाबाजाराला प्रोत्साहन देत नाही.
४)कमुनिस्त व समाजवादी ह्यांना कधीच कामगार ह्या पलीकडे दृष्टी न्हवती.कथित अन्यायावर ते लढत होते.म्हणून ते संपले.
आम्ही कायमच समाजकारण केले.
५)मराठी आमचा श्वास आहे हिंदुत्व आमचा प्राण आहे.आमची हि दोन तत्व हजारो वर्ष आक्रमकांना तोंड देत उभी आहेत.व ती आता आमच्या हातात सुरक्षितआहेत.

शिवसेना काल आज आणि उद्या हे शिवसेना नेते खासदार डॉक्टर मनोहर जोशींचे पुस्तक वाचा.ह्या पुस्तकावर त्यांनी डोक्तारेत मिळवली,त्यात अजूनही मुद्दे मिळतील.
लेखन सीमा! जय महाराष्ट्र!

Friday, January 7, 2011

विद्रोही संघटना व वास्तव


सध्याच्या काळी स्वत:ला सुधारणावादी, समाजसुधारक, विद्रोही, परिवर्तनवादी, निधर्मी, चळवळवादी, बहुजनवादी अशाच नाना प्रकारची विषेशणे स्वत:ला लावुन घेणारी बरीच मंडळी सध्या आपल्या आजुबाजुला आढळतील. याचे कारण म्हणजे सध्या वारेच यांच्या विचारांच्या दिशेने वाहत आहे यांना हवी असलेली परिस्थिती सध्या महाराष्ट्रात चालू आहे. “आरोप” हे या लोकांचे क्रमांक एक चे अस्त्र आहे. याच अस्त्राच्या आधारावर हिंदु धर्मावर, संस्कृतीवर, शिवचरित्रावर, वेद-वेदांत, देश, संत-महंत, महापुरुष यांच्यावर अनेक आरोप ही मंडळी करायला मागेपुढे पाहत नाहीत. अगदी यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर सावरकर हे स्वातंत्र्यविर नसुन 'संडासविर' आहेत. हेडगेवार, टिळक ही देशद्रोही पिलावळे यांच्या दृष्टीने ठरतात, तर झांसीची राणी लक्ष्मीबाई या इंग्रजांच्या बटीक ठरता. ही झाली पहीली बाजू ज्यांनी या देशाची आजन्म सेवा केली ते यांच्या दृष्टीने देशद्रोही वगैरे ठरतात. दुसरी बाजू म्हणजे हे लोक कोणाला चांगले म्हणतात ?? तर ...औरंगजेबाला स्त्रि-दाक्षीण्यवादी असे विषेशण या लोकांनी लावले आहे. हिंदु-मुस्लिम दंगलीमध्ये हे नि:संकोचपणे मुसलमानांची बाजू उचलून धरतात. अफजलखान वधाचे चित्र लावण्यास विरोध करण्यामध्ये हेच लोक आग्रभागी असतात. म्हणजे सावरकर, हेडगेवार, राणि लक्ष्मिबाई, समर्थ रामदास, टिळक हे देशद्रोही आणि औरंगजेब, अफजलखान हे देशप्रेमी .. साधारण अशाप्रकारचे एक अभद्र समिकरण या स्वयंघोषीत समाजसुधारकांनी आज मांडलेले आहे. खरे तर यांच्या या समिकरणाला किती लोकांचा पाठिंबा आहे हा एक संशोधनाचा विषय आहे.

या लोकांकडे प्रसिद्धी हे एक हत्यार आहे . आमुक-आमुक या एखाद्या सभेला पच-पन्नास लोक उपस्थित असले की पाच-पन्नास चे पाचशे-पन्नास करुन आपल्या समविचारी प्रसिद्धी माध्यमामध्ये याची बातमी द्यायची . हा एक रोजचा भातुकलीचा खेळ असावा याप्रमाणे चालत आहे. या विद्रोही वादी लोकांच्या काही संघटना आहेत व या संघटनांवर कॉंग्रेस मधील काही 'बड्या' नेत्यांचा वरदहस्त आहे. अगदी लहानातल्या लहान सभेसाठी या नेत्यांकडून यांना आर्थिक ओघ येत असतो तसेच उपस्थितांची संख्या जास्त दिसण्यासाठी हे 'बडे' नेते आपल्या कार्यकर्त्यांना या संघटनांच्या कार्यक्रमांना पाठवत असतात व याचा मोबदला म्हणुन निवडणुकी वेळी या विद्रोही संघटनांचे कार्यकर्ते आपल्या 'बड्या' नेत्याचा प्रचार करण्याच दंग असतात. अर्थात पैसे, भ्रष्टाचार, लाच-खोरी अशाप्रकारच्या लोकशाहीला काळीमा फासणारे प्रकार यावेळी सर्रास केले जातात.

हिंदु समाजामजामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मोठी जन-जागृती होत आहे. मग त्याला कारण मिरज दंगली सारखी प्रकरणे असोत, धुळे दंगली सारखी प्रकरणे असोत, काश्मिर मध्ये हिंदुंचे हनन , इस्लामी दहशतवाद , आणि ना जाणो किती अशा अनेक प्रकरणांमुळे हिंदु समाज हळू-हळू जागृत होत आहे. बेगडी धर्मनिरपेक्षतेला लात मारुन ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करनारे हिंदु तरुण तयार होऊ लागले आहेत. हेच हिंदुत्व अशाचप्रकारे वाढू लागले तर आपल्या उद्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल असे या देशातील काही अहिंदुंना वाटू लागले. वेग-वेगळ्या माध्यमांतून अगदी प्रतिकूल परिस्थितिमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असलेली हिंदुजागृती पाहून काही लोकांची झोप उडाली आणि याच कारणामुळे वामन मेश्राम (नवबौद्ध), जैमिनी कडू (ख्रिश्चन), व रफिक कुरेश(मुसलमान) या त्रिकुटाने मिळून हिंदुधर्म, हिंदु संस्कृती, देशप्रेमी संत-महंत-महापुरुष, हिंदुधर्मग्रंथ तसेच हिंदुसमाज यांच्या विरोधात 'बामसेफ' ही संघटना स्थापण केली, सध्याची मराठा सेवा संघ या संघटनेमागील बाबसेफ ही सुत्रधार संघटना आहे. ती दलित संघटना असल्यामुळे तिला मराठा संघाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती म्हणुन सुरवातीला 'मराठा महासंघ' या मसाठा संघटनेचा वापर करून घेण्याचे प्रयत्न करुन घेण्यात आले. परंतु या प्रयत्नांना पुरेसे यश मिळत नसल्याचे दिसून आल्यावर या कटाच्या सुत्रधारांनी मराठा सेवा संघ या नावची वेगळी संघटना स्थापन केली आणि कळसूत्रीप्रमाणे पुरुशोत्तम खेडेकर यांस अध्यक्ष केले. या संघटनांच्या स्थापणे संबंधी मराठा विकास परिषदेने ऑगस्ट २००९ रोजी प्रकाशीत केलेल्या 'शिवरायांचा देशधर्म, पुरुषोत्तमांचा द्वेशधर्म' या पुस्तिकेमध्ये श्री अशोक राणे यांचा एक परिच्छेद उल्लेखनिय आहे , तो असा.. “अयोध्या आंदोलनामुळे देशामध्ये हिंदुत्व पुनर्जागरणाला सुरवात झाली आणि त्याचा प्रभाव समाजीवनाच्या विविध क्षेत्रावर जाणवून प्रचंड हिंदुत्व जागरण झाले. त्यामुळे हिंदुत्वविरोधी कळपामध्ये खळबळ माजली व हिंदु समाजामध्ये जातीय संघर्ष उभा करणार्‍या चळवळी देशामध्ये सक्रिय झाल्या किंवा हिंदू समाजामध्ये जातीय संघर्ष निर्माण करणार्‍या संघटनांना खतपाणी घालण्याचे काम सुरु झाले. वर्ष १९९९ ते २००० या काळात हिंदुत्व हिंदुत्व जागरणामुळे गुजरातमधील डांग मध्यप्रदेशातील झाबुआ, ओरिसातील आनंदपूर येथील कमजोर हिंदुंची ख्रिश्चन मिशनरिंनी बाटवाबाटवी केली होती. तो ख्रिश्चन झालेला हिंदु समाज घरवापसी करुन हिंदु धर्मात पुनप्रवेश करु लागला. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी जगतामध्ये खळबळ निर्माण झाली व हिंदु समाजातील कमजोर वर्गाचे धर्मांतर करण्याऐवजी हिंदू समाजामध्ये केवळ जातीय संघर्ष निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्याचवेळेस सन २००१ मध्ये डरबन येथे विश्वसंमेलन झाले. त्यामध्ये w.c.c संघटनेच्या (world church council) नेतृत्वाखाली भारतीय दलित नेत्यांनी हजेरी सुद्धा लावली. त्यामुळे विद्रोही साहीत्य संमेलनाला महत्व आले. आणि त्यामधून वहारू सोनावणे यांनी 'आदिवासी हिंदु नाहीत' अशी भूमिका जाहीर केली. दया पवार, लक्ष्मण माने यांना विदेशी पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाने 'मराठा जोडो' यात्रा काढून हिंदु धर्म सोडण्याचे आवाहन मराठा समाजाला केले.”

या संघटनांच्या कार्यपद्धतिविषयी संत श्री बाबुराव महाराज वाघ आपल्या 'हिंदुजागृती' या पुस्तकात म्हणतात , ''.....नंतर खोडेकर मराठा सेवा संघाचा अध्यक्ष होताच माने मराठा 'समाजाचे संघटन' या गोंडस नावाखाली सर्व मराठा समाजास ब्राम्हणद्वेष, हिंदद्वेष, हिंदूधर्मद्वेष, हिंदूधर्म ग्रंथांचा द्वेष, वारकरी सांप्रदायीक संतांचा द्वेष, वारकर्‍यांचा द्वेष, विठ्ठलाचा द्वेष इत्यादी शिकवण देण्यास आरंभ केला. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु, हिंदूधर्म, हिंदूस्थान यांच्या रक्षणाकरीता अहोरात्र ३६ वर्षे संग्राम केला त्या हिंदुधर्माच्या विरोधात बामसेफ प्रणित मराठा सेवा संघ आणि त्याच्या उपसंघटना यांनी काम करणे हा शिवाजी महाराजांचा घोर अपमाण होय.''

याचप्रमाणे प्राचार्य श्री अशोक बुद्धीवंत आपल्या एका लेखामध्ये मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा काढून आपली पोळी भाजू पाहणार्‍या तथाकथीत स्वयंघोषीत समाजसुधारकांबद्दल म्हणतात, ''ज्या नेत्यांच्या घरात अनेक टर्म आमदारक्या आहेत, जे निवडणुकांवर कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करतात, ज्यांच्याकडे आजच्या काळातही शेकडो एकर जमिनी आहेत, ज्यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत, ज्यांच्या संघटनांमध्ये हिशोब न दिल्यामुळे फुटी पडलेल्या आहेत ती मंडळी जेव्हा गरिबीबद्दल आणि गरिबांबद्दल खोटय़ा कळवळ्याने लिहितात तेव्हा ते अपराधभावातून आलेले लेखन आहे असेच म्हणावे लागते.'' तर श्री सुनिल चिंचोळकर आपल्या समर्थ चरित्र : आक्षेप व खंडन या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात, ''शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडॆ दुष्काळ. ''

Tuesday, December 14, 2010

लाल महाल,ब्रिगेड व दादोजी


सध्याचा लाल महाल ही मूळ वास्तु नाही
ब्रिगेडी लेखक कोकाटे म्हणाला,“लाल महाल पुरात्त्वखात्याकडे असला पाहीजे. तो पालीकेच्या अधिकारात का ?”
ब्रिगेडी कोळसे-पाटील म्हणाला, “२००२ मध्ये लाल महालात दादोजी कोंडदेवचा पुतळा बसवला आणि २००४ मध्ये जेम्स लेनने वादग्रस्त पुस्तक लिहीले. या दोन्ही ठरवून केलेल्या गोष्टी आहेत.”

लाल महालाची थोडक्यात माहिती – या वाडयाची जागा झांब्रे पाटीलकडून विकत घेतली होती आणि त्यावर लाल महाल हा वाडा बांधण्यात आला होता. त्याचा पाया ५२ ½' x ८२ ½' या व्यासाचा होता आणि उंची ३० ½' होती. त्यास १३ ½' खोलीची तळघरे होती. १६४६-४७ मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांची राजधानी राजगडला हलवली आणि लालमहालाचा उपयोग प्रशासकीय कामासाठी होऊ लागला. इ.स.१६८९ ते इ.स.१७०७ या धामधूमीच्या काळात लाल महालाची अगदी दुर्दशा झाली. मोडकळीस आलेल्या लाल महालाची १७३४-३५ मध्ये डागडूजी करून थोरल्या बाजीरावांनी तो राणोजी शिंदेंना आणि रामचंद्रपंतांना रहायला दिला.

राणोजी शिंदे गेल्यानंतर लाल महालाचा उपयोग गोदाम म्हणुन झाला. त्याला लोकांनी अंबरखाना या नावाने पुकारण्यास सुरुवात केली होती. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी तो पुर्ण उध्वस्त करून त्याची लाकडं व दगडी ` ३१५ ला विकली. या लाल महालाच्या प्रांगणात एक विहीर होती. दोन करंजे होते. इ.स.१९२५ मध्ये जिजामाता उद्यान बांधण्यात आले. आज जिथे हे जिजामाता उद्यान आहे तिथेच हा वाडा होता. दुर्दैवाने तो कसा दिसत होतो, त्याची रचना कशी होती या बाबत कुणालाच माहिती नाही.



१९५० मध्ये पुणे महानगरपालीकेने पुण्याचा सांस्कृतीक वारसा जपण्याचे ठरविले. त्यापैकी पुन्हा लाल महालाच्या प्रतीकृतीची उभारणी हा उपक्रम १९८४ मध्ये हाती घेतला. ही वास्तु इ.स.१९८८ बांधून पुर्ण तयार झाली. सोन्याच्या नांगरच्या प्रकरणामुळे लाल महालला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. म्हणुन त्या प्रसंगाला धरून बाळशिवबाची ब्राँझची प्रतिमा तयार केली. त्याच बरोबर नजर ठेवून देखरेख करणार्‍या राजमाता जिजाबाईसाहेब तसेच प्रशासकीय आणि शिवबाच्या प्रशिक्षणाची बाजू संभाळणारे दादोजी कोंडदेव लाल महालाशी निगडीत असल्या कारणाने त्यांचेही पुतळे उभारले.
२००४ मध्ये दादोजींचा पुतळा उभारला गेला हा कोळसे-पाटलाचा कपोलकल्पीत आरोप बिनबूडाचा आहे. हा मूळ लाल महाल नसल्याने पुरातत्त्वखात्याचा या वर काहीच अधिकार नाही. ती पालीकेची मालमत्ता आहे. स्वत:ला इतिहास लेखक म्हणुन प्रसिद्धी मिळवू पाहणार्‍या कोकाटयाला एवढेसुद्धा माहीत नाही ?

ब्रिगेडी आक्षेप व माझे मत.


तिथे दादोजी ह्यांचा पुतळा का?शहाजी राजांनी जिजाऊ बरोबर शिवरायांच्या शिक्षणासाठी विविध विषयात निपुण बरेच लोक दिले होते.(उत्तर:असतील.देणारच कि)
.मग दादोजी गुरु होते असे भट का ओरडतात? शिवाय सरकारने जी समिती ह्या प्रश्नी स्थापन केली होती तिने देखील दादोजी गुरु नाहीत असे म्हणाले व दादोजी ह्यांच्या नावाचा प्रशिक्षक पुरस्कार देखील मागे घेतला.त्या समिती मध्ये पण पुरंदरे आले नाहीत.
(उत्तर:इतिहास हा पूर्णपणे उलगडला जातोच असे नाही.बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी कोणत्या काळात चरित्र लिहिले व आता काय साल चालू आहे? इतक्या वर्षात नवीन उत्खनन झाले असेल तसेच नवीन कागद पत्रे हाती लागली असतील.असो.पण काही असो दादोजी हे पुण्याचे कारभारी होते ह्यात दुमत नसावे त्यामुळे सोन्यचा नांगर फिरवला त्यावेळी ते तिथे उपस्थित असणारच कि.मग सध्याच्या पुतळ्याला नावे द्या व वाद संपवा)

Saturday, December 11, 2010


अण्णा हजारे

आपल्याला हि व्यक्ती माहितीच असेल.वेगळी ओळख द्याची गरज नाही.तरीही देतो.हे सध्या महाराष्ट्रातील एकमेव समाज सुधारक आहेत(असे म्हणाले जाते).
त्यांचे खरे नाव किसान बाबुराव हजारे.
पूर्वी ते मुंबईत भायखळ्याला भाजी विकत.थोडीशी भाई गिरी पण करत.म्हणजे एकदा त्यांनी हफ्ता मागतो म्हणून एका पांडूला (हवालदार) ला फटकवला होता.मग जरा गायब झाले भायखळा मधून. मग ६२ ला चीनी आक्रमण झाले तेव्हा मोठ्या प्रमाणत सैन्य भरती चालू झाली. शारीरिक चाचणी निकष शिथिल झालेले म्हणून अण्णा लष्करात भरती झाले.६५ च्या युद्धात ते जायबंदी पण झाले.मग १८ वर्षाचे कमिशन पूर्ण करून ते राळेगण सिद्धी ला परत आले.
घरात मोठे पण लग्न नाही केल व काही काळातच घरातून बाहेर पडून ते गावातल्याच मंदिरात राहू लागले.आजही ते एकाच गावात असून कधीही घरी जात नाहीत.
नंतर त्यांनी राळेगण मध्ये सिंचन का काय बोलतात ते प्रकल्प केला।(आम्हाला कुठे शेतीतलं कळते.आम्ही शहरी बाबू) तिथे पाणी आलं.पिके उत्पादन वाढू लागली.मग अशीच प्रगती करत त्यांचे गाव "आदर्श"गाव झाले.(कुलाब्यचे आदर्श न्हवे)

दुसरी बाजू


अण्णा हजारे हे सुधा manage होणारे समाज सुधारक आहेत. लावासा बद्दल बोलताना ते पर्यावरणाचा विचार करतात तर दुसरी कडे जैतापूर प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवतात...ते स्वताच्या तत्वांना नेहमीच आदरांजली देत आले आहेत...

जि तत्परता युति शासनाच्या काळात सो called भ्रष्टाचार विरुद्ध जन आन्दोलन व उपोशन करुन दाखवलि ति नन्तर कुठे गेलि.तेव्ह जवळ जवळ प्रत्येक गावात त्यान्चे लोक साखळी उपोशनला बसले होते ते पन अगदि मोक्याच्या जागि जसे बस/रेल्वे स्थानक

माहिति अधिकार वर गले काढून त्यन्चि बाजु घेन्यात कहि अर्थ नाहि. हो माहितीच्या अधिकार बद्दल बोलाल तर त्या आंदोलनात अण्णा हजारे काही कालावधी नंतर दाखल झालेत कारण ह्या अधिकार बद्दल आधीच डाव्या विचार सारणीच्या लोकांचे आंदोलन चालू होते..त्या बद्दल तसे निवेदनेही सरकारला त्यावेळी देण्यात आले होते..अण्णांचा ह्या आंदोलनाला फक्त हात लागला असेही म्हणता येईल... जेव्हा सर्व भारतात हा कायदा लागु करावा असे विधेयक सन्सदेत आले तेव्हा बरेच दिवस चर्चा झालि. ह्या कायद्यातिल "प्रमुख अस्त्रे" अस्लेल्या तरतुदि वगळण्यात आल्या .हे तेव्हा काहि निवडक माध्यम सान्गत होति.अन्ना देखिल त्याबद्द्ल बोलले"जसा आहे तस विधेयक मन्जुर व्हायला हव होत पन ठीक आहे"

आता म्हने मि नव्या मुख्य मन्त्र्याना आदर्श व लव्हासा प्रकरनि वेळ देनार किति तर ३ महिने.म्हन्जे नवे चव्हान काय अन्गुथा बहाद्दर वाटले का ह्याना.ते तर पन्त प्रधान कार्यलय चे मन्त्रि होते.त्याना हे कळत नाहि असे कसे म्हणता येइल.

जिथ शिवसेनेचा पाठींबा तिथ हे विरोध कर्नार.म्हने जैतापुर मधे योग्य पुनर्व्सन होनर आहे.अरे बाबा तुला मच्छी मधल काय कळत?देणार का तु आमच्या मच्छी मार लोकाना दुसरा समुद्र?

त्यान्चा टॆनिस चेन्डु झालाय.जो दोन्हि कोन्ग्रेस व त्यांचे विविध गट सोयिनुसार टोलवत असते.
ते शिवसेना द्वेष्टे आहेतच फार त्रास दिला त्यांनी युती च्या सरकार च्या वेळेस. त्यांनी आरोप केले म्हणून युतीच्या ३ मंत्र्यांनी राजीनामे दिले.बाळासाहेबांनी त्यांचा वाकड्या तोंडाचा गांधी,आडव गेलेल मांजर असा समाचार घेतला. समाज सुधारक गांधीवादी हा बुरखा घालून त्यांचे जे धंदे चालतात ते बाळासाहेबांनी १३ वर्षापूर्वी ओळखून लोकांना इशारा दिला होता.तो धोका आता जाणवतोय.सरकारला पण असे विरोधक विधीमंडला बाहेर लागतात ज्यांची प्रतिमा स्वच असते(निदान लोकांना दाखवण्यापुरती) बाळासाहेब तेच सुचवत होते. आम्हाला फ़रक पड्त नाहि त्यांचा.

मला काही त्यांच्या बधल पडलेले प्रश्न व त्यांची उत्तरे(कंसात)

१) लव्हासा: पर्यावरणाची वाट लागली मग जैतापूर चे काय?
( फक्त पुणे व नगर मध्ये पर्यावरण असते असा नवीन शोध लागला मला)

२) मी आदर्श व लव्हासा प्रश्नी नव्या चव्हाण साहेबाना वेळ देणार.
(public memory is short.- तो पर्यंत लोक विसरतील.)

३) 2g स्पेक्ट्रम ,CWG तसेच कणकवलीचे संत नारायण राणे ह्यांच्या शाळेच्या नावावर लाटलेल्या व आता हॉटेल नीलम व जेल (मुंबई) असलेला भूखंड.महाबळेश्वर येथील भूखंड,विलासराव देशमुखांचा लातूर मधील भूखंड जो मूक बधीर शाळेसाठी होता आज तिथे व्यावसायिक गाळे व (देशमुखांची) विकास बँक आहे या सर्व घोटाळ्यावर काहीच का बोलत नाहीत.

४) तेव्हा गावा गावात स्वतःचे कार्यकर्ते बसवून "भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन" केल मग वर उल्लेख केलेले नेते काय हजारे परिवाराचे जावई लागतात का?

५)युतीच्या काळात ज्या 3 मंत्र्यांनी अण्णा ह्याच्या आरोपानुसार भ्रष्टाचार केला त्यांचे पेक्षा हे आदर्श 2g cwg लव्हासा व वरील भूखंड घोटाळे शेकडो पटीने गंभीर व मोठे आहेत.मग आता अण्णा ह्यांच्या आंदोलनाला ती धार का नाही?

भारतीय समाजाची एक मानसिकता आहे.आपण जेव्हा एखाद्याला १-२ वेळा आजमावतो तेव्हा त्यावर विश्वास ठेवतो. त्या-त्या व्यक्तीचे मग ती राजकारण सोडून कोणत्याही क्षेत्रातील असो त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला जातो.
त्याने म्हणलाय मग ते बरोबर असा एक विश्वास लोकांचा बसतो आणि हे लोक विश्वास कधी तोडून जातील हे आपल्याला काळात पण नाही.

राजकारणी, लोक प्रतिनिधी हे ५ वर्षांनी का असेना निवडणुका आहेत लोकांना सामोरे जायचे आहे हे ध्यानात ठेवून काही तरी काम करतातच.१० आश्वासन दिली असतील तर २-3 तरी पूर्ण करतीलच पण आण्णा सारख्या व्यक्तीला अस काही आहे का? आला मनात करयचे आंदोलन नाहीतर मागे घ्याचे.कोण जाब विचारणार.बर जर खरच त्यांना त्यांचा विचार वाढवायचा असता तर त्यांच्या बरोबरचे लोक हि वाढलेच असते आज अण्णा हजारे ह्यांचे शिवाय कोणाचे नाव त्यांच्या संस्थेतून/आंदोलनातून पुढे आले?म्हणजे आपल्याशिवाय कोणाला वाढू हि द्याचे नाही.

अण्णा ह्यांनी आज पर्यंत बरीच कामे चांगली.नेते नालयक आहेत भ्रष्ट आहेत पण जर कोणी समाज सेवक ह्या बुरख्या आड सत्ताधारी पक्षाची बाहुली बनणार असतील तर काय अर्थ आहे?
लोकांनी त्यांच्या बधल नीट डोळे उघड ठेवून मत बनवावं व माझ्या दृष्टीने विचार एकदा तरी करून पहा व मग आपले मत बनवा.


Saturday, August 28, 2010

दादोजी कोंडदेव पुतळ्याचे राजकारण

अनेकांच्या तप्त ठिणग्यांतून शिवरायांच्या इतिहासाची ज्वाला भडकली. त्यातील एक ठिणगी दादोजी कोंडदेवनामक पात्राचीदेखील आहे.


इतिहास म्हणजे बाजारचा भाजीपाला नव्हे!
दादोजी कोंडदेव
एक गाव आणि बारा भानगडी तसे सध्या आपल्या इतिहासाचे झाले आहे. ज्यास आम्ही किंवा आपण सारे प्रेरणादायी पुरुष म्हणून पुजतो किंवा एखाद्या प्रसंगापुढे नतमस्तक होतो तो पुरुष किंवा प्रसंग घडलाच नाही, इतिहासाच्या पानावरून अशा पुरुषांना आणि प्रसंगांना हटवा, अशा मागण्यांची उबळ महाराष्ट्रात अधूनमधून उठत असते. जातनिहाय जनगणना सुरू होण्यास वेळ आहे. मात्र इतिहास व समाजपुरुषांचे जातनिहाय वाटप महाराष्ट्रातील राजकीय पुढार्‍यांनी करून टाकले आहे व त्यानुसार युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘जात’ म्हणून मराठा समाजाच्या काही संघटनांनी शिक्का मारला आहे. अशा शिक्काबाजांना दादोजी कोंडदेवांच्या बाबतीत जो वात आला आहे व इतिहासाच्या पानांवरून दादोजींना हटविण्याची जी मागणी त्यांनी केली आहे तो निव्वळ मूर्खपणाच म्हणायला हवा. या चवचाल इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे की, इतिहासात, खासकरून शिवरायांच्या जीवनकार्यात दादोजी कोंडदेव हे पात्रच अस्तित्वात नव्हते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसारख्या मंडळींनी म्हणे मारून मुटकून दादोजींचे पात्र निर्माण करून त्यांना शिवरायांचे गुरू बनविले आहे. त्यामुळे इतिहासाच्या पानांवर कोंडदेवांचे नावही असता कामा नये. पुण्यातील लाल महालात दादोजी कोंडदेवांचा जो पुतळा आहे तो तेथून ताबडतोब हलवावा, नाहीतर मोठे आंदोलन करू, अशा धमक्या काही संघटनांनी दिल्या. पुण्याच्या महापालिकेत त्यावर गोंधळ झाला. परिणामी पुण्याच्या महापालिकेतही दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. पुण्यातील प्रतापाचे पडसाद महाराष्ट्राच्या मंत्रालयातही उमटले व शंकरराव चव्हाणांचे मुख्यमंत्री पुत्र अशोकराव चव्हाण यांनी या प्रश्‍नी कोणतीही ठोस भूमिका न घेता ‘हा प्रश्‍न पालिकेच्या अखत्यारीत येतो. दादोजींचा पुतळा हलवायचा की ठेवायचा याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यावा’ अशी मखलाशी करून स्वत:ची कातडी वाचवली आहे. कोंडदेवांचा पुतळा पालिकेच्या अखत्यारीत येतो हे मान्य. मग पुणे महापालिका व परिसर हे निजामाचे स्टेट असून त्यावर मुख्यमंत्र्यांचा अधिकार चालत नाही असे चव्हाणांना म्हणायचे आहे काय? शिवाजी महाराजांचा
इतिहास हा पोरखेळ नाही
व राजकारण्यांची टोलवाटोलवी नाही. शिवरायांच्या इतिहासातील सर्वच पात्रे ही जेथच्या तेथेच असायला हवीत. त्यांना हलविण्याचा अधिकार कुणालाही नाही. काही पात्रे व त्यांच्या विषयीच्या कथा दंतकथा कुणा टोळक्यास मान्य नसतील तर तो त्यांचा प्रश्‍न. गागा भट्ट, दादोजी कोंडदेव हे जन्माने ब्राह्मण म्हणून शिवरायांच्या इतिहासात त्यांना स्थान नाही असे सांगणारे हे टिकोजीराव कोण? इतिहास हा भाकडकथांनी बनत नाही, तर शौर्याने व चांगल्या आचरणाने बनत असतो. दादोजी कोंडदेव हे इतिहासातील असेच एक शक्तिस्थान आहे व ते राहणार. ज्याने शिवरायांचे जबरदस्त असे वर्णन केले तो उत्तर प्रदेशचा कवी कुलभूषणही ब्राह्मणच होता व त्याने शिवरायांबद्दल जे लिहिले ते पुढे कुणालाही जमले नाही.
काशी की कला जाती
मथुरा की मस्जीद होती
अगर शिवाजी न होता
तो सुन्नत सबकी होती
कवी भूषण यांनी शिवरायांच्या शौर्यावर हे कवन लिहिले, पण भूषण हा ब्राह्मण होता म्हणून त्याच्या लिहिण्यावर, बोलण्यावर विश्‍वास कसा ठेवायचा? असे जातपंचायतीच्या नव्या इतिहास संशोधकांना वाटते काय? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र लोकप्रिय केले, घराघरांत नेले, सातासमुद्रापलीकडे नेले. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. शिवशाहिरांनी ‘शिवचरित्र’ लिहिण्याआधीपासूनच दादोजी कोंडदेवांचे अस्तित्व शिवरायांच्या इतिहासात आहे. जन्माने ब्राह्मण असलेल्या लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली व त्यावेळच्या मेळ्यांतून होणार्‍या व्याख्यानांतही दादोजी कोंडदेवांच्या कथा सांगितल्या जात होत्या. बाबासाहेब पुरंदर्‍यांचा जन्म त्यानंतरचा आहे. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या हयातीत कधी जातीचे राजकारण केले नाही. शिवरायांच्या स्वराज्यात सर्वच होते, पठाणही होते. सर्वांना सोबत घेऊनच त्यांनी राज्यकारभार केला. म्हणूनच शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे महापुरुष ठरतात. शिवसेनेनेदेखील जात-पात, धर्म-पंथ असा भेद कधी केला नाही. ‘मराठा-मराठेतर, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, घाटी-कोकणी, शहाण्णव कुळी-ब्याण्णव कुळी हे वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारा’
हाच शिवसेनेचा विचार
सुरुवातीपासून राहिला आहे. आजही तोच विचार शिवसेना जपत आहे. किंबहुना सर्वांनीच तो जपायला हवा. मात्र दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. सध्याचे राज्यकर्ते शिवरायांचे नाव उठताबसता घेतात, पण कारभार नेमका त्या विपरीत करीत आहेत. शिवरायांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करणार्‍यांचे कान उपटण्याऐवजी गोलमाल भूमिका घेत आहेत. ब्राह्मणांचा द्वेष म्हणजे ‘शिवचरित्र’ नाही हे मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगायला हवे होते. पण मुख्यमंत्रीच लपाछपीचा खेळ करीत आहेत. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी तलवार गाजवली, शस्त्रे चालविली, बॉम्ब बनवले, क्रांतीच्या ज्वालेत स्वत:च्या आयुष्याचा होम केला ते बहुसंख्य ब्राह्मण किंवा दलित समाजातले वीर होते. 1857 च्या बंडाचा सेनानी तात्या टोपे, वीर नानासाहेब पेशवे, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बॉम्बचे तंत्र हिंदुस्थानात आणणारे सेनापती बापट, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेलेले एकाच घरातले तीन सख्खे चापेकर बंधू हेसुद्धा जातीने ब्राह्मण व कर्माने क्षत्रिय होते. हे सर्व क्रांतिकारक जातीने ब्राह्मण होते म्हणून इतिहासाच्या पानांवरून त्यांची नावे पुसायची व त्यांचे पुतळे कोणाला पाडायचे आहेत काय? झाशीची राणी ब्राह्मण म्हणून तिचे शौयर्र् काही लोकांना मान्य नाही. समर्थ रामदास यांना शिवरायांचे गुरू मानायला काही टोळभैरव तयार नाहीत. इतिहास म्हणजे बाजारचा भाजीपाला नसून जिद्द, रक्त व शौर्य यांच्या ठिणगीतून व बलिदानातून निर्माण झालेली ती जबरदस्त ज्वाला आहे. ती ज्वाला विझवता येणार नाही. अनेकांच्या तप्त ठिणग्यांतून शिवरायांच्या इतिहासाची ज्वाला भडकली. त्यातील एक ठिणगी दादोजी कोंडदेवनामक पात्राचीदेखील आहे. चंद्राला देव मानणार्‍यांना शेवटी तेथे दगडधोंडेच आढळले. म्हणून चंद्राची पूजा करायची कोणी थांबवले काय? ती सुरूच आहे. इतिहासातील अनेक पात्रांचे तसेच आहे. ज्यांना इतिहासाची इतकीच काळजी आहे त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी वाढणारे अफझलखानाचे थडगे व त्याचे उदात्तीकरण रोखावे. औरंगजेबाच्या थडग्यासमोर पढला जाणारा नमाज व हिरवा उत्सव थांबवावा. मराठ्यांच्या इतिहासाशी का खेळता?